मागच्या लेखात आपण तेलांबद्दलची माहिती पाहिली. आता आपण Hair wash routine बद्दल माहिती घेऊ. जसे आपण skin साठी skin care routine follow करतो, तसेच Hair wash routine सुद्धा follow केलेले चांगले. Hair wash करताना routine मध्ये Shampoo, conditioner आणि live in Serum याचा समावेश केला जातो.
आपल्याकडे विविध प्रकारचे shampoo बाजारात उपलब्ध आहेत, आपल्यासाठी कोणता shampoo योग्य हे कसे ठरवायचे? तर shampoo केल्यावर आपला scalp पूर्णपणे स्वच्छ झाला पाहिजे. जर तेल लावले असेल तर, ते तेल पूर्णपणे निघाले पाहिजे. प्रत्येक केस एकमेकांपासून वेगळा होणे गरजेचे आहे. जो shampoo लावल्यावर हे सगळे होईल, तो shampoo तुमच्यासाठी योग्य. Shampoo लावताना तो पाहिजे तेवढा घेऊन थोड्या पाण्यात mix करावा आणि केसांच्या मुळांना हलक्या हाताने लावावा. केसांना थोडे पाणी लावून हलक्या हाताने परत परत चोळावा, जोपर्यंत थोडा फेस येत नाही तोपर्यंत! नंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. जर केस तरीही तेलकट वाटत असतील तर, परत shampoo वापरावा. केसांच्या shaft ला वेगळा shampoo लावण्याची गरज नसते. जो फेस तयार होईल, त्याने shaft ला एखादवेळेस चोळून काम होते. Shampooचे मुख्य काम आहे Scalp स्वच्छ करणे.
हेही वाचा – Hair care : केसांची त्रिस्तरीय रचना…
Shampoo लावून झाला की, केसातील पाणी हलक्या हाताने पिळून काढून टाकावे म्हणजे केसातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. त्यानंतर हातावर conditioner घेऊन तो हाताच्या दोन्ही तळव्यावर चोकून मोकळा करून घ्यावा आणि नंतर तो केसांच्या shaft ला वरपासून केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थित लावून घ्यावा. Conditioner हा मुळांना अजिबात लावू नये. Conditioner हे थोडे तेलकट असतात आणि घट्ट असतात, ते मुळांना लावले तर केसांना तेलकटपणा येऊ शकतो. मुळाशी conditioner चा layer बसू शकतो, ज्यामुळे केसांची मुळे block होतात. आपण सुरवातीला बघितले होते की, केसांचा सगळ्यात बाहेरचा स्तर (layer) क्यूटिकल (cuticle) असतो आणि त्याची रचना कौलांसारखी असते. जेव्हा तुम्ही shampoo वापरता, तेव्हा कौलांसारखी ही रचना थोडी उघडते. जे तुम्ही जाहिरातीत बघता. Conditioner वापरल्याने cuticle बंद होण्यास मदत मिळते. केसांना एकप्रकारचा गुळगुळीतपणा येतो. Conditioner केसांना 2 ते 5 मिनिटे ठेवावे आणि नंतर स्वच्छ धुऊन टाकावे.
केस वाळवताना अजिबात झटकू नयेत. ते टॉवेलने हलक्या हाताने पुसावेत. केस ओले असताना कंगवा वापरू नये. कारण केस ओले असताना जरा नाजूक असतात. कंगव्यामुळे केस तुटू शकतात. केसातील जास्त असलेले पाणी टिपले गेले की, ओलसर केसांवर serum लावावे. Serum 2 ते 3 थेंब घेऊन सुद्धा पुरते. अर्थात, केस मोठे असतील तर, जास्त Serum घेण्याची गरज आहे. Serum हे सुद्धा मुळांना लावायचे नाही, ते केसांच्या shaft ला लावायचे असते. Serum मुळे केसांवर एकप्रकारचे आवरण तयार होते, ज्यामुळे केसांना संरक्षण मिळते.
हेही वाचा – Hair care : केसांना नियमितपणे तेल लावण्याची गरज आहे का?
सामान्यतः ज्या company चा shampoo आपण वापरू त्याच company चे conditioner आणि Serum वापरावे. कारण या उत्पादनातले Chemical component एकमेकांना पूरक असे बनवलेले असतात. ज्यामुळे आपल्याला उत्तम result मिळतो.
पुढच्या भागात आपण केसांबद्दल अधिक माहिती घेऊ.
(क्रमश:)


