Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Hair care :  केसांना नियमितपणे तेल लावण्याची गरज आहे का?
    आरोग्य

    Hair care :  केसांना नियमितपणे तेल लावण्याची गरज आहे का?

    लीना परुळेकरBy लीना परुळेकरOctober 24, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, त्वचा, केसांची निगा, हेअर केअर, सौंदर्य, केस तेल, हेड मसाज, हेअर ऑइल, हेअर ऑईल,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    जशी आपण आपल्या त्वचेची काळजी घेतो, तशीच काळजी केसांची सुद्धा घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे केस मऊ, मुलायम आणि तजेलदार दिसतील. जेव्हा आपण केसांची काळजी कशी घ्यावी, याचा विचार करतो तेव्हा, आपल्या मनात खूप प्रश्न निर्माण होतात… खूप शंका उत्पन्न होतात.

    सर्वात प्रथम केसांना लावायच्या तेलांबद्दल विचार येतो. तेल लावावे का? त्याचा खरंच फायदा होतो का? तेल कसे लावावे? कुठले तेल वापरावे?

    आता आपण याबद्दल थोडी माहिती बघू. आपल्याकडे केसांना लावण्यासाठी भरपूर प्रकारची तेले उपलब्ध आहेत. जसे की, खोबरेल तेल, बदामाचे तेल, एरंडेल तेल इत्यादी. केसांना तेल लावणे, या मागे एक शास्त्र आहे, ते समजून घेऊया. केसांना तेल लावणे म्हणजेच केसांच्या मुळांना तेल लावणे. केसांना खूप तेल लावण्याची गरज नसते. कारण, त्वचेची तेल शोषण्याची क्षमता ही कमी असते, उगाचच भरपूर तेल लावले तर, थोडेच तेल शोषले जाते. बाकी तेल वाया जाते. म्हणूनच तेल Overnight नाही ठेवले तरी चालते. नहाण्याच्या तासभर आधी लावले तरी चालते. तेल लावून जास्त बाहेर पडू नये, कारण तेल हवेतून धूळ आकर्षित करते.

    तेल थोडे कोमट करून लावावे. कोमट तेलाने मुळांना थोडी उष्णता मिळते, ज्यामुळे त्वचेची रंध्रे प्रसरण पावतात आणि रक्ताभिसरण वाढते. परिणामी, मुळांना त्यावाटे अजून छान पोषण मिळते.

    हेही वाचा – Hair care : केसांची त्रिस्तरीय रचना…

    कुठले तेल वापरावे हे ठरवताना प्रत्येक तेलाचा आपल्या केसांवर काय परिणाम होतो, हे बघून आलटून पालटून ते वापरावे. तेल लावताना बोटांनी सर्व मुळांना छान चोळून लावावे. तेल लावून झाले की, टॉवेल गरम पाण्यात (मुळांना जेवढा गरमपणा सहन होईल, तेवढे गरम पाणी घ्यावे. खूप गरम पाणी वापरू नये.) बुडवून व्यवस्थित पिळून घ्यावा आणि डोक्याला गुंडाळावा, जेणेकरून वाफेमुळे गरमपणा मिळेल आणि रक्ताभिसरण वाढेल. तसेच, केसांना अजून पोषण मिळेल.

    हेही वाचा – Hair care :  अनावश्यक केसांसाठी… Epilation

    तुम्ही केसांना तेल लावले नसले तरीही, तुम्ही बघितले असेल की, 2-3 दिवसांनी  तुमच्या केसांना एक प्रकारचा तेलकटपणा दिसतो. आपण जेव्हा त्वचेबद्दलची माहिती घेतली होती, तेव्हा आपण बघितले होते की, त्वचेमध्ये sebaceous glands असतात आणि त्यातून Sebum secret होते. हे केसांनाही लागू होते. कारण या ग्रंथी केसांच्या मुळांशीसुद्धा असतात. त्यामुळेच केस तेल न लावता सुद्धा तेलकट दिसतात. आता तेल कधी कधी लावावे? तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा जर केस धुणार असाल तर, 1 वेळ तेल लावलेले चालेल किंवा 15 दिवसांतून एकदा लावले तरी चालेल. प्रत्येक वेळी तेल लावण्याची गरज नसते. पण हा शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक चॉइस आहे. तुम्ही जेव्हा केसांना तेल लावून मसाज कराल तेव्हा 10 किंवा 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ करू नये. कारण, जास्तवेळ मसाज केल्यामुळे muscle fatigue होऊ शकतो. त्यामुळेच तुम्ही जेव्हा सलूनमध्ये जाऊन head massage करून घेता तेव्हा तो 15 मिनिटांचा केला जातो. बाकी वेळ वाफ, hair wash हे केले जाते.

    काही वेळा असाही प्रश्न पडतो की, तेल लावले नाही तर काय? तेल लावल्याने, जेव्हा तुम्ही मसाज करता, तेव्हा त्वचेवर अतिघर्षण होत नाही आणि बोटे खूप सहजपणे त्वचेवर फिरतात. पण तेल लावले नाही तर, काहीवेळा त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते.

    पुढच्या भागात आपण केसांची अजून कशा प्रकारे काळजी घ्यावी, ते बघू.

    (क्रमश:)

    lee.parulekar@gmail.com

    Avatar photo
    लीना परुळेकर

    I have completed my beauty certification from BUTIC COLLEGE OF BEAUTY OF MAYA PARAJAPYE FROM PUNE. PASSED "CIDESCO EXAMINATION" IN 2003. It is an international examination for Beauty. Worked in BUTIC SALON AS AN OPERATOR AND WORKED AS AN INSTRUCTOR IN BUTIC COLLEGE OF BEAUTY.

    Related Posts

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026 आरोग्य

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरApril 16, 2026

    “डॉक्टर एक काम करता का? थेट फुफ्फुसात इंजेक्शन द्या की, वाफ घेऊन, गोळ्या खाऊन, औषधं…

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 101
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026
    Most Popular

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.