Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: लीना परुळेकर
I have completed my beauty certification from BUTIC COLLEGE OF BEAUTY OF MAYA PARAJAPYE FROM PUNE. PASSED "CIDESCO EXAMINATION" IN 2003. It is an international examination for Beauty. Worked in BUTIC SALON AS AN OPERATOR AND WORKED AS AN INSTRUCTOR IN BUTIC COLLEGE OF BEAUTY.
आजच्या भागात आपण केस रंगवताना केसांमध्ये काय बदल होतो, ते बघू. जेव्हा तुम्ही केसांना रंग लावता तेव्हा त्यातील रसायनांमुळे (chemicals) क्यूटिकल (cuticle) उघडते आणि हे रसायन केसांमध्ये शिरते. तुम्ही सुरुवातीच्या लेखांत केसांना रंग melanin मुळे मिळतो, हे वाचले असेलच. तर हे chemicals melanin bleach करतात आणि तेव्हा melanin चा स्वत:चा रंग हा फिक्कट होतो. जेव्हा हा रंग फिक्कट होतो, तेव्हा त्यावर तुम्ही लावलेला रंग चढतो आणि तो कॉर्टेक्समध्ये (cortex) फिक्स होतो. जेव्हा तुम्ही लावलेला ओला रंग धुता तेव्हा क्यूटिकल बंद होतात आणि नवीन रंग केसांच्या बाहेर येत नाही. केसांना मेंदी लावताना सुद्धा हेच घडत असते, फक्त मेंदीमध्ये नैसर्गिक रसायने असतात.…
मागच्या भागात आपण केसांच्या अंतर्गत भागाची माहिती पाहिली. त्यात आपण Hair Bonds बद्दल बघितले. त्यात आपण केसातील weakest bond बघितले, जे आहेत Hydrogen आणि salt . आज आपण Sulphur Bond कशामुळे relax होतात? आणि त्यामुळे काय होते? ते बघू. जेव्हा आपल्याला आपल्या केसांची रचना (structure) बदलायची असते म्हणजे सरळ केस कुरळे करणे किंवा कुरळे केस सरळ करणे… तेव्हा तुम्हाला केमिकलचा (Chemical) वापर करायला लागतो. हा बदल कायमस्वरुपी (Permanent) नसतो; म्हणजेच तुमचे नवीन केस जोपर्यंत येत नाहीत तसेच, वातावरणाचा केसांवर परिणाम होऊन ते पूर्वस्थितीत हळूहळू येत नाहीत, तोपर्यंत हा बदल राहतो. साधारणत: 8 ते 10 महिने तो राहतो. व्यक्तिश: हा काळ…
आजच्या भागात आपण केसांच्या अंतर्गत रचनेबद्दल थोडी माहिती घेऊ. ही माहिती अशासाठी गरजेची आहे कारण, आपल्या केसांमध्ये काय काय घडत असते, हे आपल्याला समजले पाहिजे. ही माहिती थोडी किचकट वाटू शकते. आपल्या केसांची अंतर्गत रचना खूप गुंतागुंतीची (Complex) आहे. आपण आधीच्या भागात केसांचे स्तर (Layers) पाहिले. त्यातील Cortex मध्ये ही रचना असते. आपल्या केसांमध्ये fibers असतात, ते अमाइनो ॲसिडने (Amino acid) बनलेले असतात. हे amino acid 22 प्रकारचे असते. त्या ॲसिडचा प्रत्येक रेणू (Molecule) हा काही घटकांनी (Elements) बनलेला असतो. हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात असतात. जसे – हेही वाचा – Hair care : केसांची त्रिस्तरीय रचना… या amino acids च्या chain…
मागील लेखात आपण Hair wash routine बद्दल माहिती घेतली होती. जसे आपण skin साठी skin care routine follow करतो, तसेच Hair wash routine सुद्धा follow केलेले चांगले असते. Hair wash करताना routine मध्ये Shampoo, conditioner आणि live in Serum याचा समावेश केला जातो. आजच्या लेखात आपण काही केसांच्या समस्यांबद्दल माहिती घेऊ. केसांत होणारा कोंडा (Dandruff) हा दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे कोरडा कोंडा (Dry Dandruff) आणि दुसरा म्हणजे तेलकट कोंडा (oily Dandruff). कोरडा कोंडा म्हणजे असा कोंडा जो केसांपासून वेगळा होऊन कपड्यांवर, चेहऱ्यावर पडलेला दिसतो. या कोंड्याचे कारण हे scalp वर येणारा अतिरीक्त कोरडेपणा. कोंड्याचा हा प्रकार सामान्यत: जास्त आढळतो.…
मागच्या लेखात आपण तेलांबद्दलची माहिती पाहिली. आता आपण Hair wash routine बद्दल माहिती घेऊ. जसे आपण skin साठी skin care routine follow करतो, तसेच Hair wash routine सुद्धा follow केलेले चांगले. Hair wash करताना routine मध्ये Shampoo, conditioner आणि live in Serum याचा समावेश केला जातो. आपल्याकडे विविध प्रकारचे shampoo बाजारात उपलब्ध आहेत, आपल्यासाठी कोणता shampoo योग्य हे कसे ठरवायचे? तर shampoo केल्यावर आपला scalp पूर्णपणे स्वच्छ झाला पाहिजे. जर तेल लावले असेल तर, ते तेल पूर्णपणे निघाले पाहिजे. प्रत्येक केस एकमेकांपासून वेगळा होणे गरजेचे आहे. जो shampoo लावल्यावर हे सगळे होईल, तो shampoo तुमच्यासाठी योग्य. Shampoo लावताना तो पाहिजे…
जशी आपण आपल्या त्वचेची काळजी घेतो, तशीच काळजी केसांची सुद्धा घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे केस मऊ, मुलायम आणि तजेलदार दिसतील. जेव्हा आपण केसांची काळजी कशी घ्यावी, याचा विचार करतो तेव्हा, आपल्या मनात खूप प्रश्न निर्माण होतात… खूप शंका उत्पन्न होतात. सर्वात प्रथम केसांना लावायच्या तेलांबद्दल विचार येतो. तेल लावावे का? त्याचा खरंच फायदा होतो का? तेल कसे लावावे? कुठले तेल वापरावे? आता आपण याबद्दल थोडी माहिती बघू. आपल्याकडे केसांना लावण्यासाठी भरपूर प्रकारची तेले उपलब्ध आहेत. जसे की, खोबरेल तेल, बदामाचे तेल, एरंडेल तेल इत्यादी. केसांना तेल लावणे, या मागे एक शास्त्र आहे, ते समजून घेऊया. केसांना तेल लावणे म्हणजेच केसांच्या…

