Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026

    July 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home »  सार्थ ज्ञानेश्वरी : रथांगांचा मेळावा, जेवीं रथु म्हणिजे पांडवा 
    अध्यात्म

     सार्थ ज्ञानेश्वरी : रथांगांचा मेळावा, जेवीं रथु म्हणिजे पांडवा 

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 8, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकीं । एकेकातें पोखी । निजगुणें गा ॥147॥ ऐसें न मिळे तयां साजणें । चळे धैर्यें जेणें । तयां नांव म्हणें । धृती मी गा ॥148॥ आणि जीवेंसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा । तो हा एथ जाणावा । संघातु पैं गा ॥149॥ एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद । यया येतुलेयातें प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥150॥ रथांगांचा मेळावा । जेवीं रथु म्हणिजे पांडवा । कां अधोर्ध्व अवेवां । नांव देहो ॥151॥ करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे । कां वाक्यें म्हणिजती पुंजे । अक्षरांचे ॥152॥ कां जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा । नाना लोकां सकळां । नाम जग ॥153॥ कां स्नेहसूत्रवन्ही । मेळु एके स्थानीं । धरिजे तो जनीं । दीपु होय ॥154॥ तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें । तेणें समूहपरत्वें । क्षेत्र म्हणिपे ॥155॥ आणि वाहतेनि भौतिकें । पापपुण्य येथें पिके । म्हणोनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों ॥156॥ आणि एकाचेनि मतें । देह म्हणती ययातें । परि असो हें अनंतें । नामें यया ॥157॥ पैं परतत्त्वाअरौतें । आणि स्थावरांता आंतौतें । जें कांहीं होतें जातें । ते क्षेत्रचि हें ॥158॥ परि सुरनरउरगीं । घडत आहे योनिविभागीं । तें गुणकर्मसंगीं । पडिलेंसातें ॥159॥

    हेही वाचा –  सार्थ ज्ञानेश्वरी : जिये वृत्तीचिया आवडी, बुद्धी होय वेडी

    अर्थ

    म्हणजे वैराविषयी वादविवाद सोडून एकोप्याने रहातात; इतकेच नव्हे, तर अर्जुना, आपल्या गुणाने एक दुसर्‍याला पोशीत असतो. ॥147॥ याप्रमाणे ज्यांचे स्वभावत: एकमेकांशी पटत नाही, त्यांची एकमेकांशी मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते, त्याचे नाव धृति, असे मी म्हणतो ॥148॥ आणि अर्जुना, वर सांगितलेल्या या पस्तीस तत्वांचा जीवभावाने असणारा समुदाय, हा समुदाय येथे छत्तिसावे संचात नावाचे तत्व जाणावे ॥149॥ याप्रमाणे छत्तीसही प्रकार तुला स्पष्ट सांगितले. या एवढ्यांना क्षेत्र म्हणतात, हे प्रसिद्ध आहे. ॥150॥ चाक, जूं वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास, अर्जुना, ज्याप्रमाणे रथ म्हणावे, किंवा (शरीराच्या) वरच्या व खालच्या अवयवांस एकत्र मिळून जसे देह हे नाव येते, ॥151॥ हत्ती, घोडे वगैरेंच्या समुदायास जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्ये म्हणतात ॥152॥ अथवा ढगांचा समुदाय, आभाळ या नावाने बोलला जातो अथवा सर्व लोकांस मिळून जग हे नाव येते, ॥153॥ अथवा तेल, वात व अग्नि यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे, तोच लोकांत दिवा म्हणून प्रसिद्ध होतो, ॥154॥ त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे ज्या एकतत्त्वाने जमा होतात, त्या समुदायपरत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते. ॥155॥ लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे (शरीररूप शेतात) पापपुण्यरूप पीक पिकते, म्हणून आम्ही कौतुकाने ह्या देहाला क्षेत्र असे म्हणतो. ॥156॥ कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात. पण आता हे राहू दे. या क्षेत्राला अनंत नावे आहेत. ॥157॥ परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावराअखेरपर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते, ते सर्व क्षेत्रच होय. ॥158॥ परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव, मनुष्य, सर्प वगैरे जातींच्या वेगवेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते. ॥159॥

    क्रमश:

    हेही वाचा –  सार्थ ज्ञानेश्वरी : नाना भ्रामकाचें सन्निधान, लोहो करी सचेतन

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    July 11, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    By Team AvaantarJuly 13, 2026

     अध्याय तेरावा केळींचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसें…

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    July 11, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे

    July 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026

    July 13, 2026

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 358
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 487
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 776
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026

    July 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.