Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    काय पण एकेक आठवणी असतात!

    October 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : घृताचें थिजलेंपण, न मोडितां घृतचि जाण

    October 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑक्टोबर 2026

    October 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, October 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आस्तिक
    ललित

    आस्तिक

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेOctober 26, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मी मराठी, अभिजात मराठी, अतुला प्रणव मेहेंदळे, अतुला मेहेंदळे, लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे, आस्तिक, नास्तिक, सकारात्मक ऊर्जा, दगडूशेठ हलवाई गणपती, गणपती बाप्पा, गणपती सकारात्मक ऊर्जा, विश्वास आणि श्रद्धा, नास्तिक प्रसाद, आस्तिक प्रसाद, संकष्ट चतुर्थी, आक्कांची श्रद्धा, मालिनी मधुकर अत्रे
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “नाथा चल रे! गाडी काढ. माझी तयारी झालीय,” असं आक्कांनी म्हणताच नाथा धावला गाडी काढायला. तशी गाडी तयारच होती. फक्त सुरू करून दाराशी आणायची होती. आक्का म्हणजेच, श्रीमती मालिनी मधुकर अत्रे, पुण्यामधलं नावाजलेलं प्रस्थ. मधुकरराव असताना त्यांनी अत्र्यांचं पूर्वापार चालत आलेलं घराणं जपलं होतं आणि तद्नंतर घराण्याचं नाव वाढवलं पण होतं. त्याकाळी ‘बायकांना व्यवसाय काय जमणार!’ अशा स्वभावाचे लोक असूनही त्यांची तोंडं आक्कांनी बंद केली होती. मधुकररावांनी त्यांना अगदी अथपासून इतिपर्यंत व्यवसाय शिकवला होता. त्यात त्यांना साथ द्यायला गणपती बाप्पा होताच! अत्र्यांची बाप्पावर कोण श्रद्धा. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला दगडूशेठ गणपतीला अभिषेक ठरलेला. पहिले पहिले गरिबीच्या दिवसांमध्ये चालू केलेला 11 मोदकांचा नैवेद्य आता 101पर्यंत पोहोचला होता. आक्का पण अगदी आनंदाने आणि मनापासून सगळं श्रद्धेने करायच्या.

    लग्न झाल्यावर वर्षभरातच गोड बातमी कानी आली आणि बाप्पाचा नैवेद्य म्हणून माघी गणेश चतुर्थीला जन्म झालेल्या मुलाचं नाव ठेवलं ‘प्रसाद’! हा प्रसाद आता डॉक्टर प्रसाद मधुकर अत्रे या नावाने स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून पुण्यामध्ये स्वतःचं हॉस्पिटल चालवत होता. पण आईबाबांची बाप्पावर असलेली अपार श्रद्धा याच्यामध्ये काही उतरली नाही. त्याचा देवावर अजिबातच विश्वास नाही. त्याचं एकच म्हणणं, “श्रद्धा ठेवायची असेल तर आपल्या कर्तृत्वावर ठेवा… देव वगैरे सगळं थोतांड आहे.”

    तर आज संकष्ट चतुर्थी, त्यामुळे आक्का छानशी हलक्या पिवळ्या रंगाची साडी, त्यावर मोहनमाळ, कानात मधुकररावांनी दिलेल्या मोत्याच्या कुड्या असं सगळं घालून स्वयंपाकघरात आल्या. स्वयंपाकाला असलेली मंजुळा आणि स्वतः खुद्द आक्का दोघींनी सकाळीच हाताने वळून तयार केलेल्या मोदकांचा नैवेद्य देवळात न्यायच्या तयारीला लागल्या. ते झाल्यावर त्यांनी प्रसादला हाक मारली…

    “प्रसाद, अरे येतोयस न खाली? चल नाश्ता करून घे. मग मला देवळात जायचंय रे. ये लवकर!”

    प्रसाद हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या निमित्ताने तयार होऊन खाली आला तोच जरा चेहरा कसनुसा करतच. “आई काय ग हे तुझं? नेहमीप्रमाणे चाललीस वाटतं तू? अगं, मी कितीवेळा सांगितलं आहे, हे देव वगैरे काही नसतं गं… आपलं नशीब आपण घडवतो. उगीच नको त्या गोष्टीचा बाऊ करत जाऊ नकोस… आणि देवळात वगैरे जाऊन काही होत नाही. आपल्याला बरं नसलं की, फक्त डॉक्टरच आपल्याला बरं करतात, तो तुझा देव नाही गं!”

    हे संवाद आक्कांना आता दर वेळचेच झाले होते. दरवेळी आक्का मात्र त्याला त्याच मृदू स्वरात समजवायच्या… “अरे, मला माहितेय आपलं नशीब आपणच घडवतो. आपणच आपले शिल्पकार असतो. सगळं मान्य आहे. पण तुझे बाबा हेच म्हणायचे आणि मी पण की, देव आहे की नाही, हे मानायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण निदान आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा आहे, जी आपल्याला बळ देते. आपल्याला सावरते आणि हरभऱ्याच्या झाडावर चढलो असू तर, आपली जागा पण दाखवते. यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे. ते काही केल्या तुला पटत नाही. शिवाय आज तर मला सकाळपासून काहीतरी विचित्र होतंय. पण काय ते नाही सांगता येत आहे. दरवेळेस असणारा उत्साह आज नाहीये, असं वाटतंय….” असं आक्कांनी म्हणताच प्रसाद म्हणाला, “चला, माझ्या सान्निध्यात राहून वाण नाही पण गुण लागला म्हणायचा तुला आई.”

    हेही वाचा – आदर्श शिक्षिका

    त्याला तिथेच थांबवत त्या म्हणाल्या, “नाही हो! अजिबातच असं नाही… सध्या तू हरभऱ्याच्या झाडावर चाललायस तेव्हा ये खाली. नाहीतर काहीतरी विचित्र होऊन बसेल बरं!” आक्कांचे शब्द लगेच झेलत प्रसाद उद्गारला, “छे छे! काही होत नाही. जाऊदे! तुझ्याशी आणि त्या तुझ्या देवाशी कोण वाद घालणार. चल मी सोडतो तुला देवळात.” आक्कांनी मात्र नकार दिला, “नको रे बाबा! तू जा तुझा तुझा. मी नाथाला सांगितलं आहे गाडी काढायला. नाश्ता झाला की, तू निघ आणि सावकाश जा. उगीच तुझी इच्छा नसताना माझ्याकडून पातक नको घडायला देवळात नेल्याचं…”

    असा प्रेमळ संवाद करून आक्का हसतच बाहेर पडल्या. देवळात सुंदर आणि मनाजोगं दर्शन झालं. त्यांनी बाप्पाला हात जोडून विनवणी केली, “बाप्पा आज काही ठीक वाटत नाही. काही घडणार आहे का? सारखी मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. मला काही झालं तरी चालेल, पण माझ्या बाळाला सुखरूप ठेव रे बाबा.” असं मागणं मागून अर्पण केलेला नैवैद्य गुरुजींना सांगून भाविकांमध्ये वाटायला सांगितला आणि त्यांनी परतीची वाट धरली.

    इथे थोड्या वेळाने प्रसाद एका महिलेची अचानक आलेली सीझरची शस्त्रक्रिया करून मोकळा झाला. आल्यावर मोबाइल बघायला घ्यावा, तर त्याच्या मोबाइलवर 10 मिसकॉल होते नाथाच्या नंबरवरून! इतकं काय झालं असेल म्हणून फोन केला, तर त्याला एकदम धक्काच बसला. तो मटकन खुर्चीत बसला. त्याच्या लाडक्या आईला म्हणजेच आक्कांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि नाथा त्यांना मंगेशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता, इतकेच कळले त्याला. पुढे तो ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हता. तो लगोलग तिकडे धावला.

    त्याला अचानक आक्कांचे आजचे सकाळचे शब्द आठवले. सकाळीच आई म्हणत होती ‘कसंतरी होतंय.’ आपण तेव्हाच लक्ष द्यायला हवं होतं. तो लगेचच त्याच्या लाडक्या आणि जीवापेक्षाही महत्वाच्या आक्कांना बघायला हॉस्पिटलमध्ये पोहोचला, तेव्हा त्याला कळलं की, अजून डॉक्टरच आले नाहीत. तिथले जे डॉक्टर हार्ट सर्जन होते, डॉक्टर पाटील, ते प्रसादच्याही ओळखीचे होते आणि ते कालच अमेरिकेला गेले होते. तिथले असिस्टंट डॉक्टर बरेच प्रयत्न करत होते. पण आक्का म्हणाव्या तितक्या प्रतिसाद देत नव्हत्या. प्रसादला आता काय करावं, ते सुचत नव्हतं. त्याने अजून ओळखीच्या एक-दोन डॉक्टर मित्रांना बोलावण्याचा प्रयत्न केला, पण ते ही ‘आऊट ऑफ टाऊन’ होते. तो बराच वेळ हताश बसला होता.

    तिथेच समोर एक गणपती बाप्पाची सुरेख आखीव-रेखीव आणि लक्ष वेधून घेईल, अशी सुबक मूर्ती होती. बाप्पाचे डोळे तर जणू प्रसादला जवळ येण्यासाठी खुणावतच होते. तो उठून तिकडे गेला… आणि त्याने नकळतपणे हात जोडले. “माझ्या वडिलांची तुझ्यावर खूप श्रद्धा… आई तर कित्येक वर्षं न चुकता तुझं सगळं मनापासून करतेय. मी मानत नसलो म्हणून काय झालं, तू निदान तिच्यासाठी तरी काहीतरी कर. तुला जशी तुझी आई अत्यंत प्रिय आहे, तशीच माझी आई माझा जीव की प्राण आहे. तिला काही झालं तर मला सहन होणार नाही. आई म्हणते ते आज कुठेतरी पटतंय मला. ती नेहमी म्हणते, देवाची लीला अगाध असते. बघ ना, मी डॉक्टर असूनही आज तिच्यासाठी काहीच करू शकत नाही… आणि तिच्या उपचारासाठी पण इथे कुणी हजर नाही. हा तुझाच खेळ आहे ना? मला हरभऱ्याच्या झाडावरून खाली आणण्यासाठी हे सगळं करतोयस ना? मग नको बघू आता परीक्षा. मी आज तुझं सकारात्मक अस्तित्व मान्य करतो, पण माझ्या आईला बरं कर. तिच्यावर उपचार होऊदेत आणि ती सुखरूप घरी येऊदेत.” अशी त्याने मनोमन देवाला प्रार्थना केली.

    आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागले… आणि चमत्कार व्हावा तशी नर्स धावत आली. “पाटील डॉक्टरांच्या ओळखीचे हार्ट सर्जन मुंबईहून एका सेमिनारसाठी आले होते, ते इथे आले आहेत. आता ते तुमच्या आईवर उपचार करतील. हा फॉर्म तेवढा भरून द्या.” हे ऐकून प्रसाद खूप खूश झाला. मग भरभर सगळं व्यवस्थित घडत गेलं. आठवड्याभराने आक्का घरी आल्या. प्रसाद त्यांची खूप मनापासून काळजी घेत होता.

    हेही वाचा – अट

    महिन्याभराने एका रविवारी सकाळी आक्कांनी बसून यादी करायला घेतली. तेवढ्यात प्रसाद आला. “काय करतेस आई? नाश्ता झाला का?” त्यावर आक्का म्हणाल्या, “काही नाही रे. यादी करतेय. 15 दिवसांवर गणपती बाप्पा आले की! तयारी करायला हवी ना? दादाला बोलवायला हवं. तोच आणतो न आपल्याकडे बाप्पा… आणि दुसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठा पण तोच करतो.” असं त्या म्हणाल्यावर लगेचच प्रसाद म्हणाला, “ मामाला येऊदेत नेहमीप्रमाणे. पण यावर्षीपासून पुढे मीच आणणार बाप्पाला आणि मीच करणार प्राणप्रतिष्ठा. त्याला नको सांगू.” यावर आक्का चकित झाल्या. त्यावर मंद हसून प्रसाद म्हणाला, “एवढं काही तोंड उघडायची गरज नाही… आई, अगं बाबा गेले तेव्हा मला एवढं कळत नव्हतं. तेव्हा तुझा खंबीर आधार होता मला. तुला काही होऊ शकतं, हे मन मान्य करतच नव्हतं. त्यात, मी माझाच टेंभा मिरवत बसलो होतो. पण तू आणि बाबा काय सांगायचात, ते तुझ्या आजारपणात मला पुरेपूर कळलं आहे. आपल्या आजूबाजूला खरंच एक सकारात्मक ऊर्जा असते, जी आपल्या मनावर अधिराज्य गाजवत असते. तिचा मान राखायलाच हवा. तिच्यापुढे नतमस्तक व्हायलाच हवं. शेवटी तो एक सिनेमातला हीरो म्हणतो ना ते खरं आहे. “अगर किसी चीज को बडी शिद्दत से चाहो, तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है…” आणि कायनात म्हणजेच तुझा सॉरी! ‘आपला’ बाप्पा. हो ना?” असं म्हणून तो आक्कांना आनंदाने मिठी मारतो. त्यावर आक्का नुसतंच ‘हो’ म्हणतात.. आणि त्याच्या केसातून हात फिरवत म्हणतात,

    “गुणी माझं बाळ ते. बाप्पाने शेवटी सद्बुध्दी दिली म्हणायची तुझ्यासारख्या नास्तिकाला..” असं म्हणून दोघे खो-खो हसतात आणि आक्का मनानेच बाप्पाला भावपूर्ण हात जोडतात आणि मनात म्हणतात,

    ll तूच कर्ता आणि करविता,
    शरण तुला भगवंता,
    शरण तुला भगवंता ll

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.

    Related Posts

    काय पण एकेक आठवणी असतात!

    October 27, 2026 ललित

    कोजागरी पौर्णिमा… गेले ते दिन गेले!

    October 26, 2026 ललित

    सदू आणि त्याची दु:ख

    October 26, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    काय पण एकेक आठवणी असतात!

    By सुरेखा मोंडकरOctober 27, 2026

    पंधरा दिवस धुवांधार कोसळत होता, त्यात आकाशवाणीवरील रेकॉर्डिंग!  दिवस, वेळ मी माझ्या  सोयीप्रमाणे… ‘हा नको…

    कोजागरी पौर्णिमा… गेले ते दिन गेले!

    October 26, 2026

    सदू आणि त्याची दु:ख

    October 26, 2026

    Bookshelf : ‘ॲनिमल फार्म’… लेखणीची ताकद असलेली कादंबरी

    October 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    काय पण एकेक आठवणी असतात!

    October 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : घृताचें थिजलेंपण, न मोडितां घृतचि जाण

    October 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑक्टोबर 2026

    October 27, 2026

    कोजागरी पौर्णिमा… गेले ते दिन गेले!

    October 26, 2026

    आस्तिक

    October 26, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – पूर्वजांचे आशीर्वाद, गुंतवणूक

    October 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 484
    • अवांतर 217
    • आरोग्य 164
    • पंचांग आणि भविष्य 649
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 33
    • ललित 1020
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    काय पण एकेक आठवणी असतात!

    October 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : घृताचें थिजलेंपण, न मोडितां घृतचि जाण

    October 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 ऑक्टोबर 2026

    October 27, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.