Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    नऊ रंगाच्या साड्या, सण आणि शेंदूर!!!

    October 8, 2026

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026

    तुज आहे तुजपाशी

    October 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » फक्त आपण… आणि आपला शोध!
    ललित

    फक्त आपण… आणि आपला शोध!

    रेवती निलेश पांडेBy रेवती निलेश पांडेJune 25, 2026Updated:June 29, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, आयुष्य काढणे, आयुष्य जगणे, स्वत:चा मार्ग, स्वत:ची ओळख, स्वत:चा शोध, स्वत: शोधलेली पाऊलवाट, स्वत:चे वेगळेपण, फक्त आपण, आपला शोध, स्वत:चे वेगळेपण, ना तो कारवाँ की तलाश, ना तो कारवां की तलाश
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वर्नर हर्झॉग यांची Encounters at the End of the World ही जवळपास पावणे दोन तासांची डॉक्युमेंटरी आहे. पण त्यातला एक छोटासा प्रसंग जगभरात खूप व्हायरल झाला. त्या दृश्यात अनेक पेंग्विन्स अन्नाच्या शोधात समुद्राकडे चाललेले असतात. अचानक त्यांच्यातला एक पेंग्विन थांबतो… जणू काही क्षणभर विचार करतो… आणि मग बाकी सगळ्यांच्या विरुद्ध दिशेने— एका निर्जन पर्वताच्या दिशेने चालायला लागतो.

    हा प्रसंग पाहून वर्नर हर्झॉग यांनी पेंग्विन्सवर वीस वर्षे संशोधन केलेल्या शास्त्रज्ञ डेव्हिड एन्ली यांना विचारले —

    “तो असं का करतो?”

    त्यावर डेव्हिड एन्ली यांनी सांगितले की, कधी कधी काही पेंग्विन दिशाहीन होतात. त्यांच्या दिशाज्ञानाच्या यंत्रणेत बिघाड होतो. अशा पेंग्विनला उचलून पुन्हा कॉलनीत आणले, तरी तो पुन्हा त्याच दिशेने चालायला लागतो. विज्ञानाकडे या वर्तनाचे स्पष्टीकरण आहे — दिशाभ्रम आणि मेंदूतील गोंधळ!

    हेही वाचा – सहेला रे…

    परंतु ही छोटी क्लिप इतकी लोकांच्या मनाला भिडली, याचं कारण केवळ वैज्ञानिक स्पष्टीकरणात सापडत नाही. अनेकांनी त्या पेंग्विनमध्ये स्वतःचा एक भाग पाहिला — तो भाग जो त्याला त्याच्या आजूबाजूच्या लोकांपासून वेगळा करतो. जो सगळ्यांसोबत चालत नाही; जो स्वतःची वाट शोधतो.

    अनंत फंदी यांची कविता ऐकत ऐकत मोठे झालेले आम्ही —

    “बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको”

    हे इतकं घोकून घोकून मनात बिंबवलं आहे की, स्वतःची अशी वेगळी वाट शोधणे ही कल्पनाच सहज वाटत नाही. कारण धोपट मार्ग सुरक्षित वाटतो. त्या वाटेवर आधी चाललेले लोक असतात, अनुभव असतो, मार्गदर्शन असतं. त्यामुळे त्या मार्गावर चालताना भीती कमी वाटते.

    पण प्रत्येक मनुष्य सारखा नसतो. कधी कधी माणसाचा आतला आवाज हा बाहेरच्या आवाजांपेक्षा मोठा होतो… आणि जेव्हा अंतर्मनाची हाक तीव्र होते, तेव्हा तो माणूस स्वतःची वेगळी वाट निवडतो.

    स्वतःच्या वेगळ्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींना नक्की काय मिळत असेल?

    कदाचित ते बाहेर काही शोधत नसतील; ते स्वतःलाच शोधत असतील. काही लोक समाजाच्या चौकटीत घुसमटतात. त्यांना फक्त गरजा पूर्ण व्हाव्यात असं वाटत नाही; त्यांना स्वतःमधील सर्वोच्च शक्यता जगायची असते. सगळ्यांनी चालून गुळगुळीत केलेला मार्ग नक्कीच सुकर असतो. पण स्वतःचा मार्ग शोधणे कठीण असते. कारण तिथे वाटाड्या नसतो. नकाशा नसतो.

    फक्त आपण… आणि आपला शोध.

    म्हणून त्या पेंग्विनची गोष्ट फक्त एका दिशाहीन पक्ष्याची राहत नाही. ती माणसाची गोष्ट बनते.

    ना कारवाँ की तलाश है, ना हमसफर की तलाश है…

    एकटा, मस्तमौला, स्वतःचं गाणं गात चालणारा…

    आणि कदाचित म्हणूनच तो पेंग्विन आपल्याला इतका जवळचा वाटतो— कारण त्याच्यात आपल्याला आपलाच आतला ‘धुरंधर’ दिसतो; तो भाग, जो गर्दीत असूनही वेगळा असतो, जो हरवण्यासाठी नाही, तर स्वतःला शोधण्यासाठी भटकत असतो.

    हेही वाचा – …तर इतरांकडे पाहण्याची घाई कमी होते!


    समांतर

    इतरांनी चालून गुळगुळीत केलेला धोपटमार्ग

    आणि स्वतः शोधलेली नवखी पाऊलवाट

    दोन्ही वाटा समांतर…

    आयुष्य काढणे

    आणि आयुष्य जगणे

    यामध्ये इतकंच काय ते अंतर

    Avatar photo
    रेवती निलेश पांडे

    विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399

    Related Posts

    नऊ रंगाच्या साड्या, सण आणि शेंदूर!!!

    October 8, 2026 ललित

    चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…

    October 7, 2026 ललित

    मी, शबीना, राखी आणि मोदक

    October 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    नऊ रंगाच्या साड्या, सण आणि शेंदूर!!!

    By रेवती निलेश पांडेOctober 8, 2026

    झालं! पुढच्या आठवड्यात नवरात्र येणार म्हणून मी आत्ताच नऊ दिवसांच्या नऊ रंगाच्या साड्या काढून ठेवल्या.…

    चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…

    October 7, 2026

    मी, शबीना, राखी आणि मोदक

    October 7, 2026

    उंचावरचं जग

    October 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    नऊ रंगाच्या साड्या, सण आणि शेंदूर!!!

    October 8, 2026

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026

    तुज आहे तुजपाशी

    October 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आपणचि ज्ञानस्वरूप आहे, तें गेलें हें दुःख न वाहे

    October 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑक्टोबर 2026

    October 8, 2026

    चव्हाणांना मिळाला प्रेमाचा ओलावा…

    October 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 463
    • अवांतर 216
    • आरोग्य 156
    • पंचांग आणि भविष्य 619
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 979
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    नऊ रंगाच्या साड्या, सण आणि शेंदूर!!!

    October 8, 2026

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026

    तुज आहे तुजपाशी

    October 8, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.