Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 13 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    ऑपरेशन

    September 12, 2026

    माझा मित्र आणि कोथिंबीर वडी…

    September 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, September 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माझा मित्र आणि कोथिंबीर वडी…
    ललित

    माझा मित्र आणि कोथिंबीर वडी…

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेSeptember 12, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, पराग गोडबोले, लेखक पराग गोडबोले, मित्राच्या आवडीनिवडी, कोथिंबीर आणि मित्र, कोथिंबीर न आवडणारा मित्र, कोथिंबीर न खाणारा मित्र, कोथिंबीर वडी खाणारा मित्र, कोथिंबीर वडी, पालक वडी, खाण्याच्या आवडीनिवडी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रत्येक व्यक्तीच्या काही खास आवडीनिवडी असतात. त्यांना काही गोष्टी मनापसून आवडतात तर काही मनापासून नावडतात आणि ही नावड, मग कधीतरी काहीतरी घडतं आणि आवडीत बदलून जाते…

    माझा एक मित्र आहे, बराच जुना. अगदी शाळासोबती नाही, पण नोकरीच्या ठिकाणी भेटलेला आणि मग त्यानंतर बरीच वर्षे सोबत राहिलेला सुहृदय. त्याच्याही काही अद्भूत आवडीनिवडी. त्यातलीच एक म्हणजे त्याला असलेला कोथिंबीरीचा आत्यंतिक तिटकारा! आता, कोथिंबीर न आवडणारा माणूस तसा विरळाच, पण त्याच्या डोक्यावरचे केस जसे विरळ होत गेले, तसा हा तिटकारा वाढतच गेला…

    विदर्भातून आलेला म्हणून कोथिंबीरीला धनिया म्हणायची सवय. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर ऑर्डर देताना आधीच सांगणार. नो धनिया, म्हणजे एकतर भाजीत कोथिंबीर नको आणि वर पसरलेली तर नकोच नको! भाजीत असलेली कोथिंबीर लपून जायची. ठोक करून ठेवलेल्या मसाल्यांमध्ये याच्यासाठी वेगळा मसाला कोण करणार? पण जर चुकून ताटलीतल्या भाजीवर पसरून कोथिंबीर आली, तर मात्र आणणाऱ्या माणसाची खैर नसायची. साहेब जमदग्नीचा अवतार धारण करायचे आणि ती भाजी आल्या पावली परत घेऊन जायला त्या बिचाऱ्या वेटरला भाग पाडलं जायचं.

    त्या वेटरची गत मात्र ‘ना लेना ना देना, गिलास तोडा बारा आना’ अशी केविलवाणी होऊन जायची. तोंड पाडून तो परत जायचा आणि कोथिंबीर काढून भाजी घेऊन यायचा.

    कोथिंबीरीचा वासही सहन न होणारा हा नमूना एकमेवाद्वितीय. आमच्या घरी जेवायला आल्यावर, आम्हाला हा इतिहास इत्यंभूत ठाऊक असल्याने कोथिंबीरीची काडीही त्याच्या नजरेस पडू नये, याची आम्ही आटोकाट खबरदारी घेत असू.

    त्याच्या बायकोचं आम्हाला भारी कौतुक वाटत राहायचं. हे असं कोथिंबीरीशी अतिरेकी शत्रूत्व ती कसं निभावून नेत असेल कोणास ठाऊक? त्याची बायको, माझ्या प्रमाणेच, पोहे, उपमा, उकड, खिचडी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पखरलेली नसेल तर ते पदार्थ खाऊच नयेत, या पंथात मोडणारी आणि याचं कोथिंबीरीशी असलेलं जन्मजात शत्रूत्व यांच्या द्वंद्वात ती मात्र हकनाक भरडली जायची. हिरवीगार जुडी दिसली बाजारात, तरी मान फिरवून, दुर्लक्ष करून, ती न घेता काढता पाय घ्यायला लागायचा तिला.

    हेही वाचा – शोध कळणाच्या भाकरीचा!

    आता यावर उपाय काय अशी चर्चा कायम तिच्यात आणि माझ्या बायकोमध्ये सुरू असायची, पण उत्तर काही सापडत नव्हतं. दुखणं समूळ नष्ट करणारा उतारा हवा होता.

    एकदा असेच मुबलक कोथिंबीर असण्याचे दिवस होते. सगळीकडे नुसती लयलूट चालू होती त्या, प्रसन्न हिरव्या रंगाची. आमचा मित्र आणि त्याची बायको या अवर्णनीय आनंदाला मुकत होते. अशातच, काही कारणाने त्याच्या बायकोला माहेरी जाणं भाग पडलं.

    बायको नसली की, कधीतरी हे महाराज आमच्याकडे भोजनाला येणार हा बऱ्याच वर्षांचा प्रघात. यावेळीही एका संध्याकाळी त्यांना घरी बोलावलं. कोथिंबीर आणि तिचा तिटकारा हे घरी सगळ्यांना ठाऊक, त्याप्रमाणे कोथिंबीर टाळून जेवणाची तयारी हे अध्याहृत… मी ही सरावलेला याला…

    सगळ्यांनाच बेसावध ठेऊन बायकोच्या मनात मात्र भलताच बेत शिजत होता. आम्ही सगळेच अनभिज्ञ त्या गनिमी काव्याबद्दल.

    मी सकाळी ऑफिसला गेल्यानंतर ही बाजारात गेली आणि कोथिंबीरीची सणसणीत गड्डी घेऊन आली. मला फोटो पाठवला आणि मी विचारात पडलो. कोथिंबीरद्वेष्टे मित्रवर्य जेवायला आणि घरात कोथिंबीरीचा प्रवेश या 180 अंशातल्या गोष्टी. तरी विचारलं तिला, विचार काय आहे?

    तोंडावर बोट ठेवलेलं चिन्ह अवतरलं आणि त्या मागोमाग फोन… “बोलू नको काही त्याला, आज गंमत आहे. तोंडात तीळ भिजत नाही तुझ्या म्हणून आधीच सांगून ठेवतेय.”

    आयला, स्वतःचा स्वभावविशेष मला चिकटवून ही मोकळी झाली… माझ्या डोक्यात कीडा सोडून. मी मग, कधी एकदा घरी जातोय आणि काय नक्की चाललंय, हे बघायला उतावीळ झालो.

    घरी पोहोचलो, मित्र यायला थोडा अवकाश होता. स्वयंपाकघरात डोकावलो आणि नुकतेच उकडलेले उंडे दृष्टिपथास पडले आणि मी चक्क हादरलो… “अगं हे काय? कळेल ना त्याला.”

    हिला खात्री – “काही काळजी करू नकोस. गंमत बघ.”

    मित्र आला, बसला, गप्पा झाल्या आणि जेवायची वेळ झाली. ही म्हणाली, “थांबा तळण तळून घेते, मग बसू.” माझ्या चर्येवर चिंतेचे ढग. एक घाणा तळून झाला, खरपूस दरवळ घरात पसरला. मित्राने पण छाती भरून गंध घेतला.

    पानं घेतली आम्ही आणि जेवायला बसलो. कोथिंबीरीच्या चार वड्या त्याच्या पानात पडल्या आणि पहिली तोंडात टाकताच… “छान, मस्त, सुरेख” असा अभिप्राय आला. म्हणाला, “मस्त आहेत. पालक आहे का?”

    माझ्या काळजात धस्स झालं!

    ही हजरजबाबी, म्हणाली – “आप आम खाओ, पेड क्यों गिनते हो?”

    पडत्या फळाची, का पडत्या आंब्याची आज्ञा घेऊन का कोणास ठाऊक, पण मित्राने कोथिंबीर वडीवर आडवा हात मारला.

    मागचा ताकभात झाल्यावर, थोडे निवांत झाल्यावर बायको साळसूदपणे विचारती झाली, “भावजी कशा होत्या कोथिंबीरीच्या वड्या?”

    भावजींच्या चेहेऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले आणि विस्मय दाटला चेहेऱ्यावर… “मी कोथिंबीरीच्या वड्या खाल्ल्या!”

    “हो तर, गेल्या सुद्धा पोटात…”

    “अशक्य, त्रिवार अशक्य!”

    हेही वाचा – मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    पुरावा म्हणून ठेवलेल्या,  उरलेल्या काड्यांची रास त्याला दाखवली तेव्हा कुठे त्याचा विश्वास बसला की, आपल्याला कात्रजचा घाट दाखवला गेलाय!

    स्वतःचा पराभव सपशेल मान्य करून, त्याने माझ्या बायकोची मनमोकळी तारीफ केली आणि मगच प्रस्थान केलं.

    त्यानंतर, हा प्रसंग सगळ्या मित्रांमध्ये कोरोना विषाणूसारखा पसरला आणि मित्राला तोंड लपवणं मुश्किल झालं. आजही आम्ही त्याला बोचकारण्यासाठी हा प्रसंग आठवतो आणि मनमुराद हसतो.

    यानंतर एक मात्र झालं, त्याचा कोथिंबीरीचा तिटकारा काही नाहीसा नाही झाला, पण आमच्याकडे यायच्या आधी, कोथिंबिरीच्या वड्यांची फर्माईश मात्र आवर्जून होऊ लागली.

    असे मित्र आणि असे प्रसंग, अविस्मरणीय!

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    ऑपरेशन

    September 12, 2026 ललित

    ‘कदंब’… एक दैवी अनुभूती!

    September 12, 2026 ललित

    शर्वाय आणि आराध्याला प्रतीक्षा उद्याची

    September 11, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ऑपरेशन

    By प्रदीप केळुस्करSeptember 12, 2026

    शाळा सुटली तसा गणेश आपल्या मोपेडवरून घरी निघाला. आज येताना काय आणायला घरून सांगितले आहे,…

    ‘कदंब’… एक दैवी अनुभूती!

    September 12, 2026

    शर्वाय आणि आराध्याला प्रतीक्षा उद्याची

    September 11, 2026

    उमाने दरवाज्यात महेशरावांना पाहिले अन्…

    September 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 13 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    ऑपरेशन

    September 12, 2026

    माझा मित्र आणि कोथिंबीर वडी…

    September 12, 2026

    शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!

    September 12, 2026

    ‘कदंब’… एक दैवी अनुभूती!

    September 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तेंचि कारण ठाकावया, जें सूत्र धरणें उपाया

    September 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 431
    • अवांतर 208
    • आरोग्य 146
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 578
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 915
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 13 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    ऑपरेशन

    September 12, 2026

    माझा मित्र आणि कोथिंबीर वडी…

    September 12, 2026
    Most Popular

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.