Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गणेशोत्सव आणि आयुर्वेद

    September 15, 2026

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!
    मैत्रीण

    ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 18, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, स्त्रीचे अस्तित्व, स्त्रीची ओळख, स्त्रीचे स्वातंत्र्य, स्त्रीची नक्कल, बाळाचे हुबेहुब दिसणे, बाळाची तुलना, बाळाचे दिसणे, तिचे दिसणे, रुढी परंपरा, वेगळेपणावर टीका,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रेवती निलेश पांडे

    अगदी मागच्याच आठवड्यातली गोष्ट. माझी जवळची मैत्रीण स्नेहा दुसऱ्यांदा आत्या झाली. हॉस्पिटल माझ्या घराच्या अगदी जवळच असल्यामुळे, त्या इवल्याशा परीला बघण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी तडक तिथे पोहोचले…

    मी रूममध्ये शिरले, तेव्हा स्नेहा अगदी कौतुकाने आपल्या भाचीला मांडीवर घेऊन बसली होती. मला बघताच ती आनंदाने ओरडली, “अग बघ बघ,  ‘डिट्टो’ माझ्यावर गेली आहे! डोळे, नाक… अगदी माझ्यासारखेच आहेत ना गं?” मी हसून म्हटलं, “अगं, आत्ता कुठे दोन-तीन दिवसांचं बाळ आहे हे, आणि तुला इतक्यात कळलंही, ही कोणासारखी दिसते ते?”

    तितक्यात बाळाची आजी मागून उत्साहाने म्हणाली, “अगं, तिची आई सुद्धा लहानपणी हुबेहूब अशीच दिसायची!” आणि मग काय… तिथे बसलेल्या सगळ्यांमध्ये जणू चढाओढच सुरू झाली. “डोळे वडिलांसारखे आहेत,” “बोटं आईसारखी,” “नाक आत्यासारखं…” अशा अनेक चर्चा रंगू लागल्या.

    हेही वाचा – Poetry : अपूर्ण अन् रातराणी…

    त्या गप्पा ऐकताना मला राहून राहून एकच विचार येत होता — खरंच, कोणासारखं तरी दिसणं इतकं आवश्यक आहे का?

    विशेषतः, मुलींच्या बाबतीत हे ‘कोणासारखं तरी असणं’ जन्मापासूनच सुरू होतं. कोणासारखं तरी दिसणं, कोणासारखं तरी वागणं आणि कोणासारखं तरी जगणं… ही ‘कोणासारखं’ची शेपूट आयुष्यभर साथ सोडत नाही. खरंतर, एखादा गुळगुळीत धोपटमार्ग न स्वीकारता बिकटवाट वहिवाट निवडणाऱ्या प्रत्येकालाच अडचणी येतात, पण पुरुषांपेक्षा स्त्रीला जरा जास्तच! तिने आयुष्यभर कोणाची तरी ‘नक्कल’च करावी, हे जणू गृहितच धरलेलं असतं. पिढ्यानपिढ्या ज्या मार्गावर अनेक स्त्रिया निमूटपणे चालत राहिल्या, तोच मार्ग तिने निवडावा असं ‘रूढी’ आणि ‘परंपरा’ या गोंडस नावाखाली तिच्या मनावर बिंबवलं जातं.

    माझ्या मनात आलं, त्या ‘पहिल्यांदा’ वेगळं काहीतरी करणाऱ्या स्त्रीला किती संघर्ष करावा लागला असेल? पहिली महिला डॉक्टर, पहिली महिला शिक्षिका… इतकंच काय, पहिली महिला जिने गोल साडी नेसायला सुरुवात केली, पहिली जिने स्लीव्हलेस ब्लाऊज घातला किंवा पहिली जिने पैसे कमवण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकलं. गोष्ट कितीही छोटी असो वा मोठी, स्वतःचं ‘अस्सल’ रूप समोर आणणं हे महिलांसाठी पूर्वीपासून आजतागत कठीणच आहे.  इतर स्त्रियाही या नवीन बदलाला, “आता हे काय नवीन?” असं म्हणून हिणवताना जास्त दिसतात हे नवल.

    काही सेकंदात माझ्या डोक्यात हे इतके विचार आले आणि अचानक त्या छोट्या बाळाच्या रडण्याने माझी तंद्री तुटली! बाळाचा तो खणखणीत आवाज ऐकून स्नेहाची आजी कौतुकाने म्हणाली, “बघितलं का? आवाज कसा खणखणीत आहे, अगदी आजोबांसारखा!”

    मी हसले आणि हळूच म्हटलं, “आवाज असू दे ग कोणासारखाही… पण त्या आवाजात किमान तिचे ‘स्वतःचे’ शब्द गुंफावेत आपल्यासारख कोणासारखं तरी होण्यात तिने धन्यता मानू नयेआणि नक्कल करण्यात जर अवघा जन्म वाया घालवू नये!”

    हेही वाचा – स्त्री… एक आई आणि मुलगी


    इवलंसं आकाश

    परीकथेपलीकडलं वेगळं जग तिला पाहायचं होतं

    चौकटीबाहेरची एक तिरकी रेघ बनून राहायचं होतं

    लोकांचा काय विचार करतेस

    मनासारखं घे जगून

    ती म्हणायची, नक्कल करण्यात

    अवघा जन्म जाईल निघून

    सगळ्यांनी जे केलं

    तेच आपण का करायला हवं?

    दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन

    त्याला काय म्हणायचं नवं?

    “ती” जशी होती आधीच्या अनंत पिढ्या

    आपणही अगदी तसंच व्हायचं का?

    त्यांचा पिंजरा सोन्याचा म्हणून आपणही तोच घ्यायचा का?

    स्वतःच्या पंखावर विश्वास ठेव

    सारेच हैराण होतील तुझी झेप बघून

    ती म्हणायची, नक्कल करण्यात अवघा जन्म जाईल निघून

    सूर्याचा प्रकाश उसना घेऊन चंद्रासारखं काय मिरवायचं?

    तेच ते शेवाळलेले शब्द

    रोज त्यांनाच काय गिरवायचं

    त्यापेक्षा काजवा हो

    तुझा स्वतःचा असेल प्रकाश

    आणि उजळून टाक

    तुझं हक्काचं इवलंसं आकाश

    जिंकायला शिक जरा

    सगळंच मिळत नसतं मागून

    ती म्हणायची, नक्कल करण्यात अवघा

    जन्म जाईल निघून


    मोबाइल – 8552893399

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    इंद्रधनुष्य

    August 17, 2026 मैत्रीण

    वारसा

    August 10, 2026 मैत्रीण

    सार्थक

    August 3, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    इंद्रधनुष्य

    By अतुला प्रणव मेहेंदळेAugust 17, 2026

    “अनया, अगं आज आपल्याला जायचं आहे ना अप्पूकडे. तू थांब जरा मी येते तुझ्याकडे आणि…

    वारसा

    August 10, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    लेडीज स्पेशल

    July 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गणेशोत्सव आणि आयुर्वेद

    September 15, 2026

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 435
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 582
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 919
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गणेशोत्सव आणि आयुर्वेद

    September 15, 2026

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.