Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरावया मृगजळाची गंगा, डोणीलागीं धांवतां दांगा-

    November 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 22 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, November 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : तरावया मृगजळाची गंगा, डोणीलागीं धांवतां दांगा-
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरावया मृगजळाची गंगा, डोणीलागीं धांवतां दांगा-

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 22, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Fifteen, पंधरावा अध्याय, अध्याय पंधरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप, पुरुषोत्तम योग
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय पंधरावा

    एऱ्हवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा । तो वावोचि भारु गा । केला होय ॥251॥ तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागीं धांवतां दांगा- । माजीं वोहळें बुडिजे पैं गा । साच जेवीं ॥252॥ तेवीं नाथिलिया संसारा । उपायी जाचतया वीरा । आपणपें लोपे वारा । विकोपीं जाय ॥253॥ म्हणोनि स्वप्नींचेया भया । ओखद चेवोचि धनंजया । तेवीं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खइग ॥254॥ परि तेचि लीला परजवे । तैसें वैराग्याचें नीच नवें । अभंगबळ होआवें । बुद्धीसी गा ॥255॥ उठलेनि वैराग्यें जेणें । हा त्रिवर्गु ऐसा सांडणें । जैसें वमुनियां सुणें । आतांचि गेलें ॥256॥ हा ठायवरी पांडवा । पदार्थजातीं आघवा । विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ॥257॥ मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यग्बुद्धी करतळें । हातवसावें ॥258॥ निसिलें विवेकसाहणें । जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें । मग पुरतेनि बोधें उटणें । एकलेंचि ॥259॥ परि निश्चयाचें मुष्टिबळ । पाहावें एकदोनी वेळ । मग तुळावें अति चोखाळ । मननवेरी ॥260॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    अर्थ

    सहज विचार करून पाहिले तर, दोरीवर भासणार्‍या सर्पाला मारण्याकरिता लांब काठ्या गोळा केल्या तर त्याचे व्यर्थच ओझे गोळा केल्यासारखे होते. ॥251॥ मृगजळाची नदी उतरून जाण्याकरिता नावेसाठी कोणी रानोमाळ धावत असता, त्याने खर्‍या ओढ्यात सापडून जसे बुडावे, ॥252॥ अर्जुना, त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायांमध्ये खटपट करणाराला साधनांचे जिवापाड श्रम होऊन, तो आपण स्वत: मरतो. ॥253॥ म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच जसे औषध आहे, त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या याला (या संसारवृक्षाला) नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे. ॥254॥ परंतु अरे, तेच ज्ञानरूपी खड्ग सहज फिरविता येईल, तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नवे पाहिजे. ॥255॥ ज्या वैराग्याचा उठाव झाला असता, ह्या त्रिवर्गाचा (स्वर्ग, मृत्यू,पाताळ यांचा) असा त्याग होतो की, जसे काही कुत्रे आताच ओकून गेले आहे. ॥256॥ अर्जुना, येथपर्यंत सर्व पदार्थमात्रसंबंधाने वीट उत्पन्न करील, असे हे दांडगे वैराग्य पाहिजे. ॥257॥ मग त्या ज्ञानखड्गावरील देहाभिमानरूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे ॥258॥ ते ज्ञानरूपी खड्ग विवेकरूपी सहाणेवर पाजळलेले असावे व ‘मी ब्रह्म आहे’ अशा बोधाची त्यास तीक्ष्ण अशी धार असावी व मग ते एकट्या पूर्णबोधाने घासावे. ॥259॥ परंतु (मी ब्रह्म आहे अशा) निश्चयरूपी मुठीचे बळ एकदोन वेळ पाहून (आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले की) मग ते अति शुद्ध मननापर्यंत तोलून धरावे (म्हणजे अद्वैतबोधाचे अति शुद्ध असे चिंतन करावे.) ॥260॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : देखतां आहे आवडें, घेऊं जाइजे तरी नातुडे

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    चातुर्मास : केवळ व्रत नव्हे, तर….

    November 21, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : देखतां आहे आवडें, घेऊं जाइजे तरी नातुडे

    November 21, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    November 20, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    चातुर्मास : केवळ व्रत नव्हे, तर….

    By प्रणाली मंगेश महाशब्देNovember 21, 2026

    देवशयनी ते देवउठनी एकादशी हा चार महिन्यांचा काळ म्हणजे भक्ती, संयमाची साधना आणि पुन्हा नव्या…

    सार्थ ज्ञानेश्वरी : देखतां आहे आवडें, घेऊं जाइजे तरी नातुडे

    November 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    November 20, 2026

    माया आणि ब्रह्मानुभव यांच्यात नाते काय?

    November 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरावया मृगजळाची गंगा, डोणीलागीं धांवतां दांगा-

    November 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 22 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026

    सगेसोयरे…

    November 21, 2026

    चातुर्मास : केवळ व्रत नव्हे, तर….

    November 21, 2026

    ऑफिसमध्ये काम करून थकलात? ताण आला?

    November 21, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरावया मृगजळाची गंगा, डोणीलागीं धांवतां दांगा-

    November 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 22 नोव्हेंबर 2026

    November 22, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.