Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अष्टमी

    October 12, 2026

    एक टिंब…

    October 12, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – जीवनप्रवास, अदृश्य अडथळे

    October 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, October 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अष्टमी
    मैत्रीण

    अष्टमी

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेOctober 12, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मी मराठी, अभिजात मराठी, अतुला प्रणव मेहेंदळे, अतुला मेहेंदळे, लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे, नवरात्री उत्सव, नवरात्री अष्टमी, नवरात्रौत्सव, नवरात्रीचा उत्साह, अष्टमी पूजन, महालक्ष्मी पूजन, अबिराचा उत्साह, माहेरच्या प्रथा परंपरा, सुलक्षणा बाईंचा सासूपणा, कठोर सुलक्षणा बाई, अबिराचे नटणे, मुलीकडून प्रथापरंपरांचे पालन, अष्टमी महालक्ष्मी पूजा, अष्टमीला महालक्ष्मीची ओटी, श्रद्धा आणि भक्ती
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “वा अबिरा, आज एकदम सुंदर दिसतेयस. या सगळ्या पेहरावात तू म्हणजे एकदम माधुरी दीक्षितसारखी दिसतेस! साडी तुला छान कॅरी करता येते… आणि हे कानातले पण कित्ती छान मॅचिंग आहेत.” अबिराच्या ऑफिसमधल्या महिला सहकारी तिचं तोंडभरून कौतुक करत होत्या.

    अबिरा आज ऑफिसमध्ये जातानाच छान तयार होऊन गेली होती. आजचा दिवस तिच्यासाठी खास होता. आनंद आणि अबिराचं याचवर्षी दणक्यात लग्न झालं. ठाण्यातल्या शहनाईमध्ये वरचा आणि खालचा मजला घेतला होता लग्नाला… आणि त्यानंतरचे सगळे सणही छान साजरे केले तिने. लग्नानंतरची तिची ही नवरात्रमधली पहिलीच अष्टमी.

    मागच्या आठवड्यात तिने सासूबाईंना उत्साहात सकाळीच विचारलं, “आई, मी नवरात्रीत अष्टमीला देवीची ओटी भरू का? ही माझ्या आईकडची परंपरा आहे. आणि मला भाऊ नाही ना त्यामुळे मला माझ्या आईची प्रथा, परंपरा पुढे चालू ठेवायची इच्छा आहे. चालेल का तुम्हाला?” त्यावर सुलक्षणाबाईंनी चक्क नकार दिला. “अगं काही गरज नाही. आपल्याकडे देवाधर्माचं इतकं काही नसतं. त्यामुळे नाहीच गेलीस तर उत्तम.” असं म्हणून त्या तोऱ्यात निघून गेल्या. हे ऐकल्यावर अबिरा अवाक झाली. “या अशा काय विचित्र आहेत? एवढे तर सण करतो आपण आपल्या घरी. गणपती बाप्पा सुद्धा येतोच की घरी! मग या काय सांगतायत, आपण देवाचं इतकं काही करत नाही. कधीकधी जामच विचित्र असतं यांचं वागणं… आणि यात काय त्रास आहे का? की मी यांना काही करायला सांगत आहे? काही नाही मला कळतंय माझ्या आईच्या प्रथा परंपरा यांना नको असतील दुसरं काय?” असं मनातच म्हणत ती मुसमुसायला लागली.

    तिला अजूनही आठवतं दरवर्षी तिची आई, तिची आजी दरवर्षी नवरात्री अष्टमीला देवीची ओटी भरायला जातात. पहिले पहिले तिला वाटायचं अशा ओट्या भरून काय होतं? शिवाय, नारळ आणि बाकीचं सामान सगळं आपल्याकडून घ्यायचं आणि तेच पुन्हा बाहेर विकायला ठेवायचं. मग या सगळ्या प्रकाराला अर्थ काय? ती तिच्या आईला बोलून पण दाखवायची हे!

    शेवटी एकदा तिला तिच्या आईने सांगितलं, “अबिरा, अगं हे सौभाग्याचं वाण असतं. लग्नानंतर पहिली पाच वर्ष नवरात्रीमधल्या अष्टमीला अशी महालक्ष्मीची ओटी भरतात. घागर फुंकतात… आणि हे सर्व बायकांचं खूळ वगैरे नाहीये हो! आता हेच बघ ना, आपण आपल्याच विश्वात इतक्या रमतो की, तसंही आपल्याकडून कुठलाच दानधर्म होत नाही. मग निदान नवरात्रीत आपण मनापासून देवीची ओटी भरली की, एक मानसिक समाधान मिळतं. आपल्या आईची ओटी आपल्याला अधिक महिन्याशिवाय कधीच भरता येत नाही. पण या आईची ओटी आपण अगदी सर्रास दरवर्षी भरू शकतो. म्हणून मी दरवर्षी न चुकता ही ओटी भरते, यात अंधश्रद्धा काहीच नाही. माझी फक्त आईच्या चरणापाशी असलेली श्रद्धा आणि भक्ती आहे. आता आपण भरलेली ओटी त्यानंतर कुठे जाते, त्याचं काय होतं याच्याशी काय घेणं देणं आहे. आपण फक्त मनापासून चरणांशी लीन व्हायचं. आता तू म्हणशील घागर का फुंकतात मग? तर, त्यामागे शास्त्रीय कारणं आहेतच. जेव्हा जेव्हा ऋतुबदल होतो, तेव्हा सगळीकडे जीवजंतू बऱ्याच प्रमाणात सक्रिय असतात. साथीचे रोग येतात तेव्हा तर आपल्याला हे विशेष जाणवतं. पूर्वीच्या काळातल्या बायकांचं हेच तर निर्जंतुकीकरण आहे. आजकालच्या तुमच्या भाषेत fumigation का काय ते? कळलं का आता सगळं! आणि हो हे पटत नसेल तर नको करू तू हे, तुझं लग्न झाल्यावर. जबरदस्ती काहीच नाही.”

    हेही वाचा – इंद्रधनुष्य

    आत्ताही ऑफिसमध्ये हे सगळं आठवताना अबिराला आईच डोळ्यासमोर आली. ऑफिसच्या धांदलीत सुद्धा तिने सासूबाईंशी बोलायच्या आधीच एक- दोन आठवड्यापूर्वीच चौकशी करून ठेवली होती. नवरात्रीत अष्टमीला कुठे ओटी भरतात आणि घागर फुंकतात याची! आणि तिला ब्राह्मण सेवा संघाचा पत्ता एका मैत्रिणीने दिला. या सगळ्या उत्साहावर सासूबाईंनी हा असा मोडता घातला, त्यामुळे ती फुरंगटली. दोन-चार दिवस तिचं घरातलं वागणं बदललं. बोलणंही कमी झालं. फक्त कामापुरतं बोलत होती ती. आनंद कामानिमित्त बाहेरगावी गेलाय, त्यात त्याला कुठे हे छोटे छोटे खटके सांगायचे म्हणून ती गप्प बसली.

    एकदा जेवणं होऊन निजानीज झाल्यावर ती अशीच पडलेल्या चेहऱ्याने बाल्कनीत विचार करत उभी होती. तेवढ्यात सासूबाईंनी मागून खांद्यावर हात ठेवला. तिने मागे वळून बघितलं, “अरे आई तुम्ही! अजून जाग्या कशा?” त्यावर त्या म्हणाल्या, “तुझ्याशी बोलायचं म्हणूनच थांबले झोपायची…”

    अबिरा शांतच आहे बघून त्याच पुढे बोलल्या, “अबिरा, माझं थोडं चुकलंच. तू जा ओटी भरायला.” आता तर अबिरा चक्रावलीच. या अशा काय? आधी नको म्हणतात मग जा म्हणतात. तिचा प्रश्नार्थक चेहरा बघून सासूबाई पुन्हा म्हणाल्या, “हो अगं, मी खरंच सांगतेय हे. मी न आजकाल मेनोपॉजच्या त्रासामुळे विचित्र वागते आहे. कधी कधी माझं मलाच कळत नाही. मी पटकन समोरच्याचा अपमान काय करते, लागेल असं काय बोलते, कधी खूप रडते, तर कधी मनात हुरहूर दाटते. डॉक्टरांनी सांगितलं आहे, असं होणारच. पण तुला परवा मी खूप दुखावलं ना? आणि त्याचा पश्चात्ताप मला खूप होतोय.

    काय आहे न माझ्या सासूबाईंनी मला हवं ते कधीच करू दिलं नाही. कायम त्यांच्या धाकात होते मी इतकी वर्ष. आत्ता दोन वर्षांपूर्वी त्या गेल्या. त्यानंतर तुमचं लग्न ठरलं आणि माझ्यातली सासू ही भावना जागी झाली. त्यात माझी आई माझ्या लहानपणीच सोडून देवाघरी गेली. त्यामुळे आईच्या मायेचा पदर मिळालाच नाही. शिवाय, आईकडून आलेल्या प्रथा परंपरा मुलींनी पण सांभाळल्या तर काहीच हरकत नाही, हे कळतच नव्हतं मला. पण परवा तुला बोलले आणि माझंच मन मला खायला लागलं आणि हे तुझ्या सासऱ्यांनी अगदी अचूक ओळखलं. त्यांनी मला खूप छान समजावलं. ते म्हणाले, “सुलक्षणा, अगं प्रत्येक बाई ही सासू झाली की, खडूस आणि त्रासिक असलीच पाहिजे, असं काही नाही. ती ‘अगं’ आई नसली तरी ‘अहो’ आई नक्कीच होऊ शकते.” तेव्हाच खरंतर माझं मन मोकळं झालं होतं.

    त्यानंतर काल तू ऑफिसला गेलीस आणि चक्क तुझ्या आईचाही फोन आला. त्यांनीही मला या प्रथा समजावल्या. त्यांचं एक वाक्य तर, माझ्या अगदी मनावर कोरल गेलं. त्या म्हणाल्या, “मी आई आहे हा विचार सोडून द्या. मी एक स्त्री आहे, असं समजा म्हणजे सगळा गुंता आपोआप सुटेल.” तेव्हा तर माझा विचार अगदीच पक्का झाला की, प्रथा कुठल्याही आणि कुणाच्याही असो, त्या आपल्याला मानसिक बळ देणाऱ्या असतील तर काहीच हरकत नाही… आणि त्यामुळे आता फक्त तूच काय, मी पण येणार आहे, देवीच्या दर्शनाला.”

    हेही वाचा – वारसा

    एवढं बोलून त्या थोड्या थांबल्या आणि त्यांनी अबिराच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून म्हटलं, “तू हसत रहा गं कायम! तुझं खळखळून हसणं, अखंड बडबड करणं हेच आपल्या घराचं चैतन्य आहे… तूच लक्ष्मी आहेस घरची. अशी कोमेजलेल्या फुलासारखी राहिलीस ना की, घर पण कोमेजतं बघ.” असं म्हणून त्या स्मितहास्य करत आपल्या खोलीत गेल्या.

    अबिरा मनोमन सुखावली. संध्याकाळी ऑफिसनंतर ती सुलक्षणा बाईंसोबत अष्टमीच्या देवीच्या दर्शनाला गेली अगदी मुक्तपणे. तिने देवीला हात जोडून सांगितलं, “आई महालक्ष्मी, माझं माहेर आणि सासर दोन्हीकडच्या प्रथा परंपरा जपण्याचं आणि पुढे नेण्याचं बळ मला मिळूदेत… आणि हो, सासूबाईंसारखी सुबुद्धी मी जर सासू झाले, तर मला आधीच होऊदे बरं का! कारण मी काही माझ्या विहिणीचं ऐकेन असं वाटत नाही.” असं म्हणून ती मनातच हसली आणि हळूच तिने देवीकडे बघून डोळे मिचकावले.

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.

    Related Posts

    तीन पिढ्या आणि ज्येष्ठा गौरी

    September 18, 2026 मैत्रीण

    ललिताची गीता

    September 16, 2026 मैत्रीण

    इंद्रधनुष्य

    August 17, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    तीन पिढ्या आणि ज्येष्ठा गौरी

    By प्रणाली मंगेश महाशब्देSeptember 18, 2026

    “आई, यंदा गौरी थोड्या साध्या पद्धतीने करूया का?” मधुराचा प्रश्न ऐकून आजीने हातातले तांदूळ खाली…

    ललिताची गीता

    September 16, 2026

    इंद्रधनुष्य

    August 17, 2026

    वारसा

    August 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अष्टमी

    October 12, 2026

    एक टिंब…

    October 12, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – जीवनप्रवास, अदृश्य अडथळे

    October 12, 2026

    शारदीय नवरात्र, पेशवाई थाट आणि सुगंधी ‘केशरी भात’!

    October 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : त्रिगुणवृद्धिनिरूपण, तीं श्लोकीं सांगितलें जाण

    October 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑक्टोबर 2026

    October 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 467
    • अवांतर 217
    • आरोग्य 158
    • पंचांग आणि भविष्य 626
    • फिल्मी 72
    • फूड काॅर्नर 259
    • मैत्रीण 31
    • ललित 987
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अष्टमी

    October 12, 2026

    एक टिंब…

    October 12, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – जीवनप्रवास, अदृश्य अडथळे

    October 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.