Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पॉवर बँक… अविस्मरणीय विमानप्रवास
    ललित

    पॉवर बँक… अविस्मरणीय विमानप्रवास

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 9, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, आबांचा विमानप्रवास, विमानप्रवास पॉवर बँक, आबांचा घोळ, आहोंचा संताप, पॉवर बँकचा घोळ, पॉवर बँकवरून रामायण, लगेजमध्ये पॉवर बँक,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पराग गोडबोले

    आबा आणि आम्ही म्हणजे एक वेगळंच समीकरण. आबा घोळ घालणार आणि मग तो आम्ही निस्तरत बसणार, हा आमचा उंदरा-मांजराचा खेळ अव्याहत सुरू असतो. आबा कधी कुठे काय करतील आणि आम्ही गोत्यात येऊ… याचा नेम नसतो, कधीच. खूप सावध राहावं लागतं आम्हाला, नाहीतर, ‘नजर हटी, दुर्घटना घटी‘ याचा प्रत्यय कधी येईल, हे सांगणं कठीण!

    तसं तर अगदी शहाणे असतात ते. नीट विचार करून बोलतात आणि कृती करतात, फार विवेकाने वागतात. सकाळी फिरून येताना रिक्षावाले, सोसायटीचे रखवालदार, गाडी पुसणारे यांच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय त्यांचे पाय घराकडे वळतच नाहीत मुळी… प्रत्येकाला आवर्जून फराळाचे जिन्नस दिल्याशिवाय त्यांची दिवाळी साजरी होतच नाही कधी. चार नग  जास्त करावे लागतात मला त्यांच्या या सवयीपायी… पण ही जोडलेली माणसं म्हणजेच संपत्ती आहे त्यांची आणि आमची सुद्धा!

    मागे एकदा, संध्याकाळच्या वेळी ते रस्ता चुकले होते, अगदी सैरभैर झाले होते नुसते. त्यावेळी एका अशाच जोडलेल्या रिक्षावाल्याने त्यांना सुखरूप घरी आणून सोडलं होतं. सासूबाई गेल्यापासून, एकटेपणाच्या जाणीवेने ते हळवे होतात कधीकधी, पण एकटेपण झटकून परत आमच्या उत्साहात सामील होतात, मनापासून.

    हेही वाचा – दूरदर्शन… कृष्ण-धवल आठवणींना उजाळा!

    कधीकधी मात्र ते फार विचित्र वागतात, चिडचिड करतात, बडबड करतात आणि घरच्या मंडळींना वात आणतात. ऐकू कमी येतं, त्यामुळे कधी मजेशीर, तर कधी मनस्ताप देणारे प्रसंग घडतात आणि मग आम्ही कधी हसतो, तर कधी डोक्याला हात लावून बसतो.

    तशीच एक आठवण… मजेशीर.

    आमचे राजस्थानला फिरायला जायचे बेत सुरू होते. आबांना विचारलं, ‘येणार ना तुम्ही आमच्या सोबत?’ तर, एका पायावर तयार ते! का कोणास ठाऊक, पण त्यांचा तोवर विमान प्रवास झाला नव्हता, विविध कारणांमुळे. आबांना एक आगळीवेगळी भेट म्हणून आम्ही मुंबई जयपूर असा विमान प्रवास ठरवला होता. ते सोबत होते, त्यामुळे एका प्रसिद्ध पर्यटन कंपनीतर्फे जायचा आमचा बेत होता. चार पैसे जास्त जातात, पण डोक्याला ताप नसतो.

    सगळं नियोजन झाल्यावर आम्ही आबांना सांगितलं आणि अगदी हरखून गेले ते. पहिल्यांदाच विमान प्रवास म्हंटल्यावर जी बालसुलभ उत्सुकता असते, ती जाणवत होती त्यांच्या बोलण्यातून. सगळं ठरलं आणि माशी शिंकली. आमच्या अहोंच्या ऑफिसमध्ये नेमके त्याच सुमारास परदेशी पाहुणे येणार, अशी बातमी आली आणि त्यांनी अंग काढून घेतलं… साळसूदपणे. “तुम्ही तिघे जा आणि फिरून या,” म्हणत आबांची जबाबदारी माझ्या गळ्यात बांधून ते मोकळे झाले. आबा म्हणजे वळलं तर सूत, नाहीतर भूत. त्यांना सांभाळणं म्हणजे येरा-गबाळ्याचं काम नव्हे, पण मी आणि माझ्या लेकाने हे आव्हान स्वीकारलं, अहोंच्या नाकावर टिच्चून!

    त्यांना म्हणाले मी, तुम्ही फक्त विमानाची तिकीटं काढून द्या आमची, बाकी सगळं आम्ही बघतो. त्यांना काहीतरी सवलती असतात म्हणे. प्रवास थोडा स्वस्त पडतो इतकंच!

    तिकिटं झाली, पर्यटन कंपनीचे पैसे भरून झाले आणि सगळं पक्कं झालं. आबा, मी आणि माझा लेक आता प्रत्यक्ष प्रवासाची वाट पाहायला लागलो. चार दिवस आधी सामानसुमानाची बांधाबांध सुरू झाली आणि आबांची बॅग सगळ्यात आधी भरून तयार. खूप उत्साहात होते आबा!

    आमच्या आबांची ना, एक प्रेमळ सवय आहे. कोणीही त्यांना नमस्कार केला की, ते भरभरून आशीर्वाद तर देतातच, पण नमस्कार करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरून, खांद्यावरून आणि पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात. तशी निरुपद्रवी सवय, पण अहोंनी त्यांना बजावलं, “विमानात शिरताना दारात उभ्या असलेल्या मुली तुम्हाला नमस्कार करतील. त्यांच्या नमस्काराला नमस्कारानेच उत्तर द्या. उगीच पाठीवर वगैरे हात फिरवायला जाऊ नका, भलतं काहीतरी होऊन बसायचं आणि मग निस्तरणं कठीण जायचं!!”

    लेकाकडे मारक्या म्हशीसारखे बघत आबा उत्तरले, “कळतंय तेवढं मला. उगाच काहीतरी सांगू नकोस.” ही जुगलबंदी ऐकून मी खुसूखुसू हसले, आबांचा पारा आणखीनच चढला आणि निघून गेले ते तरातरा, त्यांच्या खोलीत.

    लेकाची सामान भरण्याची तयारी जायच्या दिवशी सकाळी आणि आबांची नुसती चिडचिड… जाताना अहो लेकाला बजावून गेले होते, “पॉवर बँक तुझ्या जवळच्या सामानात ठेव. पट्ट्यावरून जाणाऱ्या चेक इन सामानाच्या बॅगेत नको. तसे नियम आहेत.” लेकाने ते ऐकून, पॉवर बँक त्याच्या सॅकमध्ये ठेवली आणि तो आवरायला गेला.

    आम्ही निघालो, अगदी वेळेत विमानतळावर पोहोचलो. आमचं सामान पट्ट्यावर टाकलं. ते टाकताना तिथल्या मुलीने लेकाला विचारलं, ‘सामानात पॉवर बँक नाहीये ना?’ लेक अगदी छातीठोकपणे ‘नाहीये’ म्हणाला आणि बोर्डिंग पास घेऊन, आम्ही ‘सुरक्षा जांच’ नावाचा जाच सहन करायला निघालो… तिथे सगळं सामान काढून तपासणी झाली, पण लेकाला पॉवर बँक काही दिसली नाही सामानात. तो म्हणाला सुद्धा मला, ‘घरी राहिली असेल,’ म्हणून आम्ही त्याकडे काणाडोळा केला.

    बाकी सर्व व्यवस्थित पार पडलं आणि आम्ही जवळजवळ तासभर आधीच मोकळे होऊन, दिलेल्या द्वार क्रमांकापाशी जाऊन बसलो. मी छानपैकी मेथीचे ठेपले करून आणले होते. ते खायला आम्ही सुरुवात केली आणि तेवढ्यात माझा फोन वाजला. यांचा फोन होता. मला आश्चर्यच वाटलं, चक्क चौकशी करायला फोन? क्या बात!

    मी फोन घेतला आणि थेट खेकसणंच सुरू झालं पलीकडून… “काही अक्कल आहे का तुम्हाला? मी बजावून सांगितलं होतं ना की, पॉवर बँक स्वतःजवळ ठेवा म्हणून, मग ती तुमच्या चेक इन सामानात कशी गेली? काय घोळ घालून ठेवता यार तुम्ही! मी काम करू, का हे निस्तरत बसू आता?” नुसत्या फैरी सटासट… “माझ्या ID वरून तिकिटं काढली आहेत, मला फोन येतायत सारखे. कुठे आहेत चिरंजीव? द्या त्यांना फोन,” वगैरे वगैरे वगैरे…

    लेकाशी बोलणं झालं आणि लेक धावला सुरक्षा अधिकाऱ्याकडे. तिथे पन्नास प्रश्नांना तोंड देत, त्यांना कसंबसं समजावत, तो वेळेच्या अगदी काही मिनिटं आधी आला धावतपळत, पॉवर बँक घेऊन आणि आम्ही विमानात चढलो. आबांना कळतच नव्हतं, काय चाललंय नक्की ते! तो येईपर्यंत माझा जीव मात्र टांगणीला. घरी असते, तर नक्कीच देव पाण्यात घालून बसले असते.

    लेक जाम हैराण. पॉवर बँक तिकडे गेलीच कशी, हा प्रश्न त्याला सतावत होता, पण उत्तर सापडत नव्हतं. मांडीवर पॉवर बँक ठेवून, मान मागे टाकून त्याने डोळे मिटले आणि तेवढ्यात आबांनी विचारलं, “हे काय आहे आणि तुझ्याकडे कसं आलं?”

    “मी तुझ्या सॅकमधून काढून बॅगेत टाकलं होतं, निघताना! मला वाटलं महाग वस्तू असेल, उगाच का वागवत बसा सोबत. हरवली, गहाळ झाली, तर ताप नको…”

    हेही वाचा – पुस्तकांमध्ये रमलेला माणूस

    हे ऐकलं मात्र, आम्हा दोघांनाही हसावं का रडावं कळेना. त्यांना ओरडावसं खूप वाटत होतं, पण त्यांचा निष्पाप आणि निरागस चेहरा बघून, सगळा राग मुकाट्याने गिळला आम्ही. एवढं सगळं रामायण झालं आणि ते आपल्यामुळे झालं, याचा यत्किंचितही लवलेश त्यांच्या मुखावर नव्हता… मी लेकाचा हात दाबून त्याला शांत केलं आणि मग त्याने आबांना कोपरापासून नमस्कार करत, बुचं कानात घालून विषय संपवला.

    नंतर मात्र एक केलं मी. ते मार्गिकेच्या बाजूला बसले होते, त्यांना उठवून, खिडकीची लालूच दाखवून,  जागांची अदलाबदल केली आणि निश्चिन्त झाले… न जाणो, एखाद्या लाल कपड्यांमधल्या, त्यांच्या नाती एवढ्या वयाच्या मुलीने त्यांना नमस्कार करावा आणि परत नको ते रामायण घडावं…!

    एकदा तोंड पोळल्यावर, काळजी घेणं हाच पर्याय होता माझ्याकडे, नाही का?

    आबांचा हा पहिलावहिला प्रवास त्यांच्या नसेल, पण आम्हा सगळ्यांच्या मात्र आयुष्यभर लक्षात राहिला… अनुभवांची पॉवर बँक चार्ज करत…


    मोबाइल – 9323277620

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026 ललित

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026 ललित

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    By Team AvaantarJune 18, 2026

    तृप्ती देव “आई, आज पण वरण-भात?” – चिडून मी विचारलं. कॉलेजातून नुकताच आलेलो. ताटात गरम …

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 332
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 458
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 712
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.