Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, November 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मिता आवडत होती, पण…
    ललित

    मिता आवडत होती, पण…

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करOctober 31, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रदीप केळुस्कर, लेखक प्रदीप केळुसकर, दोष ना कुणाचा, मिता वल्लभ प्रेमकहाणी, मिताचे लग्न, वल्लभचे दु:ख, व्हीजेटीआय,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    “आई, उद्या मी बेंगलोरला निघतो…”

    डायनिंग टेबलावर जेवायला बसलो असताना मी म्हणालो. आई आश्चर्यचकित झाली…

    ‘‘अरे काल तर आलास बेंगलोरहून… आठ दिवसांची रजा घेऊन आलोय, असे म्हणालास?’’

    मी गप्प. हळूच म्हणालो, ‘‘कंपनीचे ईमेल आलाय. परवा जॉबवर यायला कळवलेय.’’

    “पण तुझी बँकेची कामे राहिली होती ना?”

    “ती उद्या पुरी होतील आणि रात्रीच्या प्लेनने निघणार.’

    “शुक्रवारचे मिताचे लग्न…” आई पुटपुटली.

    मला एकदम ठसका बसला. आई म्हणाली, “अरे! हळू हळू… पाणी पी… कुणीतरी आठवण काढली.”

    आई आणि मी अन्न फक्त चिवडत होतो. दोघांचेही जेवणात लक्ष नव्हते. हसतमुख मिताचा चेहरा डोळ्यासमोर आला. मी हात धुवायला उठलोच. पाठोपाठ आईपण ताटे आवरत उठली. मी म्हणालो, “बॅग भरतो उद्याची. दिवसभर खूप कामे आहेत.”

    मी माझ्या खोलीत आलो. पाठोपाठ आई पदराला हात पुसत आली.

    ‘‘मिता आलेली परवा. वल्लभला लग्नाचे कळले काय? हे विचारत होती. तशी ती येत असते नेहमीच… आली की, घराची सर्व आवराआवर करून देते. मुन्नीची खोली स्वच्छ करते. तुझीही खोली ठीकठाक करते. मला स्वयंपाकात मदत करते. आता चालली लग्न करून.’’

    मी गप्प.

    “वल्लभ, मिताला तुझ्याबद्दल फार वाटायचं रे, मलाही वाटायचं मिता या घरची सून होईल. तशी बातमी तू किंवा मिता द्याल अशी वाट पाहत होते. पण शनिवारी मुन्नीचा फोन आला. ती म्हणाली, मिताचे लग्न ठरले. मिताने तिला पहिला फोन केला. शेवटी गेली दहा वर्षे त्यांची मैत्री. मुन्नी फोनवर म्हणाली, दादाने बहुतेक मिताला लग्नाचे विचारले नाही शेवटी! या दादाच्या मनातले काही कळत नाही. स्पष्ट काही बोलत नाही. माणूस घाणा आहे नुसता. मुन्नीला पण वाटत होते, तुझे आणि मिताचे लग्न होईल. तिला पण आश्चर्य वाटले. तुझ्या मनात मिताबद्दल होतं ना वल्लभ? तसं मला तर वाटत होतं. मग का नाही विचारलंस तिला?” आईचे एकापाठोपाठ एक प्रश्न.

    मी काहीही न बोलता बॅग भरायला सुरुवात केली. आईला काय उत्तर द्यावे कळेना. माझे चित्त कुठे ठिकाणावर होते? मिताच्या लग्नाची बातमी ऐकली आणि वाटले सार्‍या स्वप्नांची राखरांगोळी झाली. चार वर्षांत कंपनीत जीव तोडून मेहनत केली. गेली दोन वर्षे एक्सटर्नल एमबीए सुरू होतं. ते दोन महिन्यांत संपले की, मग मी कंपनीचा असिस्टंट मॅनेजर होईन… आणि मिताला लग्नाचे विचारीन, असे मनात मांडे घातलेला मी, मिताच्या लग्नाच्या बातमीने उद्ध्वस्त झालो.

    बॅगेत थोडे कपडे, लॅपटॉप टाकून मी बॅग बंद केली. लाइट बंद करून बेडवर पडलो. डोळे मिटले तरी झोप कुठली यायला. डोळ्यासमोर 16 वर्षांची मिता दिसायला लागली. इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात अ‍ॅडमिशन मिळाली तो दिवस. व्हीजेटीआयसारख्या मुंबईतील प्रख्यात इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सहज अ‍ॅडमिशन मिळाली म्हणून आईबाबा खूश. मुंबईत जेमतेम दोन इंजिनीअरिंग कॉलेज. त्यात व्हीजेटीआयचे नाव मोठे. आमच्या कॉलनीत गेल्या कित्येक वर्षांत व्हीजेटीआयमध्ये कोणाला अ‍ॅडमिशन मिळाले नव्हते. पण यंदा मला अ‍ॅडमिशन मिळाली म्हणून कॉलनीतले सर्वजण माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. सकाळपासून फुले आणि पेढे घेऊन लोक येत होते. आई आणि मी ते आनंदाने स्वीकारत होतो. लोक थोडी कमी झाली, आई आणि मी माझी आवडती कडक कॉफी घ्यायला बसलो. एवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. आई म्हणाली, मुन्नी आली बहुतेक जा दार उघड. मी उठून दार उघडले. बाहेर मुन्नी होती…

    हेही वाचा – निपाणीच्या उरुसात हरवलेली गंगी…

    ‘‘अरे दादा, किती वेळ बेल वाजवतेय मी, ऐकायला येत नाही काय?’’ असे नेहमीप्रमाणे बडबडत मुन्नी आत येताना मागे वळून म्हणाली, “अगं, ये गं, आत ये.”

    मी बाहेर पाहिलं. एक मुलगी उभी होती. मुन्नीच्याच वयाची… निमगोरी, लाजाळू… खाली मान घालून वह्यापुस्तके सावरत होतील. मुन्नीने हात धरून तिला आत घेतले. आईला ओरडून म्हणाली, ‘‘आई ही बघ मिता, अगं ही शेजारच्या रामनगरमध्ये राहते. गेल्या आठवड्यात माझी ओळख झाली.’’

    मुन्नी आणि तिची मैत्रीण माझ्या समोरच बसल्या. आईने कॉफीचे कप त्यांच्या हातात दिले. आई मुन्नीला आज कोण कोण माझे अभिनंदन करून गेले ते सांगत सुटली. मुन्नी कॉफी घेता घेता आणि कौतुकाने माझ्याकडे पाहात होती. एवढ्यात मुन्नीच्या काहीतरी लक्षात आले. ती तिच्या मैत्रिणीला म्हणाली, “मिता, तू काय आणलस दादाला?”

    मिताने हळूच पर्समधून गुलाबकळी काढली आणि माझ्या हातात ठेवली… ‘‘अभिनंदन’’ म्हणाली. हे म्हणताना किती घाबरली होती, हे तिच्या चेहर्‍यावरून आणि थरथरणार्‍या हातावरुन समजत होते. मिताला पहिल्यांदा बोलताना मी पाहिले ते असे. मग मिता मुन्नीबरोबर वारंवार घरी येत राहिली. दोन महिन्यानंतर आलेल्या माझ्या वाढदिवसाला आई, मुन्नी आणि मिता यांनी मोठा बार उडवून दिला. त्या दिवशी रोज आपल्या व्यवसायात अडकलेल्या वडिलांना सक्तीने घरी थांबविले…

    मी कॉलेजमधून आलो, तर माझी खोली फुलांनी सुशोभित केली होती. माझ्या टेबलावर ‘हॅपी बर्थ-डे’चे ग्रीटिंग चिकटवलेले होते. माझ्या शाळेतील, कॉलेजमधील वेगवेगळे फोटो भिंतीवर चिकटविलेले होते. खोलीत माझ्या प्रिय किशोरी ताईंची कॅसेट मंद आवाजात सुरू होती आणि माझ्या आवडीचा गोड शिरा आणि कडक कॉफी तयार होती… मी आश्चर्यचकित झालो. एवढे वाढदिवस झाले माझे, पण अशी वाढदिवसाची तयारी पाहिली नव्हती. मी आईला म्हणालो, “अगं केवढं हे कौतुक माझे? एवढ्या वर्षांत कधी नाही आणि आज…”

    मुन्नी म्हणाली, “अरे दादा – ही सगळी मिताने केलेली तयारी. तिनेच बाबांना घरी थांबायला लावले आणि तुझ्या खोलीची सर्व तयारीपण तिचीच. तिने लवकर येऊन मला उठवले. आणि हे सर्व तुझे फोटो वगैरे मागून घेतले. नाहीतरी आपल्या घरात कुणाचे वाढदिवस असे साजरे करतो का आपण? आणि बाबा कधी दुकान सोडून वाढदिवसाला थांबतात का?” मी मिताकडे पाहिले… ती हळूच हसली आणि मला प्रचंड आवडून गेली.

    कोजागरी साजरी करायला जुहू बीचवर मी, मुन्नी आणि मिता गेलेलो, तेव्हा मी आणि मिता जास्त जवळ आलो. मी घरी असलो आणि माझ्या खोलीत अभ्यास सुरू असला तर, मुन्नी कधीकधी मोठ्याने बोलायची. मग मिता मुन्नीला ओरडायची, “मुन्नी! दादांचा इंजिनीअरिंगचा अभ्यास सुरू आहे, हळू बोल.” मग मुन्नी तिच्यावर चिडायची. “माहिती आहे गं, चार महिन्यांपूर्वी या घरात यायला लागली आणि दादाच्या अभ्यासाची काळजी करायला लागली.”

    या सर्व गोष्टी मी आणि मिता एकमेकांच्या जवळ यायला कारण होत होत्या. पण माझे मन म्हणत होते – प्रेम, लग्न हे नंतरचे आधी करिअर महत्त्वाचे. नुसते इंजिनीअरिंग नाही, पोस्ट ग्रॅज्युएशनही करायचे. लहान वयात मोठ्या पदावर पोहोचायचे. त्याकरिता मनावर लगाम हवा. तेव्हा प्रेम वगैरे सर्व काही मनात…

    इंजिनीअरिंग पूर्ण झाले आणि कॅम्पसमधून बेंगलोरमधील कंपनीत माझी निवड झाली. आमच्या घरातून मुंबईबाहेर कोणी राहिले नव्हते. त्यामुळे आईबाबा नर्व्हस झाले. पण माझा बेंगलोरला जायचा निर्णय पक्का होता. एकतर बेंगलोर आयटीचे मुख्य केंद्र बनत होते. त्यामुळे बेंगलोरमध्ये एक से एक हुशार माणसे जमा झाली होती. दुसरं म्हणजे, बेंगलोरमध्ये पुढील शिक्षणासाठी चांगली सोय होती… आणि अतिशय महत्त्वाचे कारण – मुंबईच्या घामट हवेपेक्षा बेंगलोरची थंड हवा मला मानवणारी होती.

    हेही वाचा – निपाणीच्या उरुसात हरवलेली गंगी ‘आईविना भिकारी’

    शेवटी बेंगलोरला जायचा दिवस उजाडला. माझी सायंकाळची 6ची ट्रेन होती. सकाळपासून मिता आमच्याकडेच होती. आईला जेवणात मदत कर, माझी कपडे इस्त्री करून दे, माझ्या बुटांना पॉलिश कर… मिता नुसती धावत होती. शेवटी दुपारी ४ वाजता मी, आई, मुन्नी आणि मिता टॅक्सी करून निघालो. बाबा परस्पर सीएसएमटी स्टेशनवर येणार होते… टॅक्सीत सर्वजण गप्प गप्प होते. टॅक्सी स्टेशनवर पोहोचली, मिताने माझ्या दोन्ही हॅण्डबॅग खांद्याला लावल्या. मी एक सुटकेस घेतली… मिताने आईला आणि मुन्नीला घ्यायला काहीच सामान ठेवले नाही. गाडी लागलेली होती. माझ्या आधी मिता गाडीत चढली आणि बर्थ नंबर शोधून माझे सामान बर्थवर लावलेसुद्धा!

    आई म्हणाली, “मुन्नी ती मिता किती चटपटीत बघ, नाहीतर तू.” मुन्नीला पण लटका राग आला… “हो, हो, मिता चटपटीत आणि मी आळशी. बसवून ठेव मिताला मांडीवर.” आम्ही सर्वजण खूप हसलो.

    गाडी सुटायची वेळ झाली आणि मी सोडून सर्वजण खोली उतरले. मला सर्वजण खिडकीतून हात दाखवत होते. मी पाहिलं, मिता रडवेली झाली होती. पर्समधील छोटा रुमाल हलवत होती, परत डोळ्यांना लावत होती. मी मुन्नीला आणि मिताला म्हणालो, “आईबाबांना सांभाळा गं…” आणि गाडी सुटली. गाडीबरोबर मिता धावत धावत रुमाल दाखवत होती. गाडीचा स्पीड वाढला आणि प्लॅटफॉर्मवर आई, मुन्नी आणि मिता लांब लांब दिसायला लागली…

    क्रमश:
    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    तूप मेतकूट भात

    October 31, 2026 ललित

    एका मुठीतील आनंद…

    October 31, 2026 ललित

    शर्वाय आणि आराध्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात…

    October 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    तूप मेतकूट भात

    By पराग गोडबोलेOctober 31, 2026

    शाळेत असताना मजा असायची खूप. सायनहून दादरला ‘राजा शिवाजी विद्यालयात’ बेस्ट बसने जायचं आणि यायचं.…

    एका मुठीतील आनंद…

    October 31, 2026

    शर्वाय आणि आराध्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात…

    October 30, 2026

    सत्याचा विजय होतोच, पण…

    October 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 01 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    मिता आवडत होती, पण…

    October 31, 2026

    तूप मेतकूट भात

    October 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 490
    • अवांतर 217
    • आरोग्य 167
    • पंचांग आणि भविष्य 657
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 263
    • मैत्रीण 34
    • ललित 1031
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Homeopathy : मटेरिया मेडिका अर्थात औषधी द्रव्यांचे संकलित ज्ञान

    November 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 नोव्हेंबर 2026

    November 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढें एक सौभग, वळघे वाचेचें आंग

    November 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.