दोघांनाही एका समारंभाला जायचं होतं. त्यासाठी लगबग सुरू होती… विशेषत: तिची! त्याने घालण्यासाठी काढलेले कपडे तिने पुन्हा कपाटात ठेवून दिले. तो दाखवत असलेला प्रत्येक शर्ट नाकारत ती म्हणाली, “आहेत ना भरपूर नवीन शर्ट… मग त्यातला घाला ना एक!”
तिने कपाटातून एक छानसा शर्ट काढला आणि समोर ठेवून म्हटलं, “हं… हा शर्ट घाला!”
नंतर, स्वतःच्या तयारीसाठी ती तिच्या खोलीत गेली. त्याला सरप्राइज देण्यासाठी कालच एक ड्रेस विकत आणला होता… त्याला न दाखवता तिने कपाटातच लपवून ठेवला होता. तो ड्रेस तिने कपाटातून बाहेर काढला. त्यावरील टॅग वगैरे काढून, ड्रेस घालून चार चारदा आरशासमोर ठुमकून, मनपसंत जामानिमा करून ती बाहेर आली.
हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
तो तयार होऊन बसलाच होता. मोठ्या अपेक्षेने ती त्याच्या समोर उभी राहिली… तो नक्कीच कौतुक करणार… खात्री होती तिची! मस्तच होता ड्रेस!!
त्याने तिच्याकडे पाहिलं… आणि पाहातच राहिला…
त्याने काहीतरी कौतुक करावं, असं तिला वाटत होतं.
अचंबित होऊन म्हणाला, “हे काय? मला नवीन शर्ट घालायला लावलास… आणि तू?… तू का हा जुना ड्रेस घातला आहेस? तुझ्याकडे नाहीये का नवीन ड्रेस?”
तिचा हात आपोआपच वर गेला… या हाताचं काय करावं, हे न कळल्याने तो स्वतःच्याच कपाळाला लावला.
हेही वाचा – …असाही विचार करता येतो!
उघडलेल्या तोंडात करोडों शब्द साठले होते, पण आता नेमकं बाहेर पडताना भांडण नको म्हणून तिने ते सगळे गिळले आणि ती एवढंच म्हणाली… “चला निघूया!”
असेच कानावर पडलेले संवाद…
तुम्ही ओळखता का या जोडप्याला? कोण कोणाला म्हणालं असेल बरं? येईल का ओळखता?
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


