Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टर
    ललित

    लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टर

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरApril 1, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, डॉक्टर लिओनिद रोगोजोव्ह, रोगोजोव्हचे ॲपेंडिक्स ऑपरेशन, रोगोजोव्हची ॲपेंडिक्स शस्त्रक्रिया, स्वत:वर शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर, सर्वात साहसी शस्त्रक्रिया, अविश्वसनीय शस्त्रक्रिया, साहसी डॉक्टर लिओनिद रोगोजोव्ह,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सर्दी झालेलं एक बच्चू आपल्या पालकांसह ओपीडीत आलं होतं. त्याला तपासताना मला अचानक शिंक आली आणि मी भिंतीकडं तोंड करत तोंडावर एल्बो ठेऊन सलग तीनदा शिंकलो…

    “डॅाक्टर, आता तुम्ही कुणाकडून औषध घेणार?” पोट्ट्यानं अचानकच खट्याळपणे प्रश्न केला.

    “कुणाकडून कशाला माझं मीच घेईन की!” मीही चटकन उत्तर दिलं… त्यावर हातानं ‘सुई’ दाखवत “टुच्चूपण तुमचं तुम्हीच घ्याल का?” त्यानं चटकन हसत प्रतिप्रश्न केला… पण यावेळी त्याची आई त्याला रागावली.

    मी औषध देऊन त्याला रवाना केलं खरं, तरी “खरोखरच टुच्चू घ्यायची वेळ आली तर?” या प्रश्नानं डोकं क्षणभर भंजाळलं, पण “देईल की कुणीही असिस्टंट, ब्रदर वगैरे… त्यात काय?” हे उत्तरही आपसुकच गवसलं; पण या सगळ्यात मला अचानक डॉक्टर रोगोजोव्हची आठवण आली.

    साल 1961 असावं. स्थळ होतं थेट दक्षिण ध्रुवावरील नोव्होलाझारेव्हस्काया हे सोव्हिएत संशोधन केंद्र… बाहेर प्रचंड बर्फ पडला होता. सूर्य जणू कायमचा रजेवर गेल्यागत परिस्थिती होती आणि वाऱ्याचा वेग इतका की, घराबाहेर निघालेला माणूस कधीही उडून जावा…

    या तळावर केवळ बाराच जण शिल्लक होते आणि त्यांच्यातही एकच डॉक्टर होता; 27 वर्षीय डॉ. लिओनिद रोगोजोव्ह!

    एका अतिशय थंडगार सकाळी डॉक्टर स्वतःच पांढर्‍या पडलेल्या चेहऱ्यानं जागा झाला, त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होत होत्या, भयंकर मळमळत होतं, अंगात खूप ताप भरला होता आणि हालचाल अक्षरश: अशक्य झाली होती… लक्षणं स्पष्ट होती आंत्रपृच्छशोथ अर्थातच ॲपेंडिसायटिस! सामान्य लोकांच्या भाषेत ॲपेडिक्सचं दुखणं… पण इथं दक्षिण ध्रुवावर दुसरा कुणी डॉक्टर नव्हता… बाहेर जोरदार चक्रीवादळ सुरू होतं आणि कुठूनही बचावपथक येणं निव्वळ अशक्य होतं. या वातावरणात विमान काय, हेलिकॅाप्टरही तळावर उतरणं शक्य नव्हतं… इथं उपचार करण्यासाठी एकच डॉक्टर होता आणि तोच पेशंटही होता..

    हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!

    स्थिती प्रचंड गंभीर होत होती. ॲपेंडिक्स जागेवर फुटलं तर मृत्यू निश्चित होता! संपूर्ण टीम त्याच्याकडं असहाय्य नजरेनं पाहात होती अन् तेव्हाच रोगोजोव्ह हळूच पुटपूटला, “बहुतेक मला स्वतःवरच शस्त्रक्रिया करावी लागेल. जीव वाचवण्याचा दुसरा मार्ग नाही.”

    सर्व जण अवाक् होऊन जागीच थिजले!

    खुर्च्या, टेबलं, दिवे… तळावर जे मिळेल ते वापरून एक तात्पुरतं शस्रक्रियागृह अर्थात ऑपरेशन थिएटर तयार झालं. एक अभियंता आणि एक हवामानतज्ज्ञ दोघं जण ओटी असिस्टंट अर्थात सहाय्यक बनले, ज्यांना शस्त्रक्रियेची मुळाक्षरंही माहीत नव्हती… पण त्यांचं काम होतं साधनं हातात देणं, धागा धरून ठेवणं, दिवा लावून देणं…

    डॉ. रोगोजोव्हनं स्वतःच पोटावर जंतुनाशक लावलं आणि मग स्थानिक भूल देऊन स्वतःचं पोट सुरीनं चिरलं… आरशात बघत तो स्वतःच पोटाचे स्नायू बाजूला करत होता. कधी उलटीची भावना होती तर, कधी आत्यंतिक वेदना… मधेच दृश्य धूसर होत होतं तर, मधेच अचानक मूर्च्छित झाल्यासारखं वाटत होतं; स्वतःला सावरत, जागं ठेवत… “आता थांबलो तर मरेन, काम पूर्ण करायलाच हवं,” असं बजावत काम सुरू ठेवलं!

    हेही वाचा – कर्तव्य, करुणा आणि बलिदानाचं प्रतीक… डॉ. कार्लो उर्बानी

    सरतेशेवटी एकदाचा त्याला सुजलेलं ॲपेंडिक्स दिसलं आणि त्यानं ते झटकन कापून बाहेर काढलं अन् कशीबशी जखम शिवली… शेवटचा टाका झाला आणि थकव्यानं बसल्या जागी तो कोसळला…

    पुढच्या केवळ पंधरा दिवसांत तो तळावरच्या लोकांच्या सेवेसाठी पुन्हा तंदुरुस्त झाला, अगदी एखाद्या देवदूतासारखा!

    आजही वैद्यकीय इतिहासात ही शस्त्रक्रिया सर्वात साहसी आणि अविश्वसनीय शस्त्रक्रिया म्हणून ओळखली जाते!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026 ललित

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026 ललित

    चमचम

    August 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    By प्रणाली मंगेश महाशब्देAugust 22, 2026

    I Love You! तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर, झालं असं की, काल आम्ही सगळे…

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.