Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कडकलक्ष्मी… समाजातील एक अभागिनी!
    ललित

    कडकलक्ष्मी… समाजातील एक अभागिनी!

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 31, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, कडकलक्ष्मी, समाजातील अभागिनी, संघर्षातून घडलेली लक्ष्मी, लक्ष्मीवाली बाई, कष्ट करणारी लक्ष्मी, कष्टकरी स्त्री,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ॲड. कृष्णा पाटील

    रविवार होता. सकाळची वेळ होती. आठचा सुमार असावा… कोर्टाला सुट्टी असल्याने निवांत होतो. चहा घेता घेता वर्तमानपत्र वाचत होतो. नेहमीच्याच बटबटीत बातम्या. राजकारणी नेत्यांच्या एकमेकांना शिव्या, झोपडपट्टी परिसरातील खून, कुठे मारामारी, कुठे चोरी… रविवार असूनही वाचण्यासारखं वेगळं काही नव्हतं.

    एवढ्यात बाहेर कडकलक्ष्मीच्या ढोलक्याचा घाईंSS घुईंSS घाईंSS घुईंSS असा आवाज येऊ लागला. मी दरवाजा उघडला. गेटसमोर कडकलक्ष्मी घेऊन फिरणारी एक महिला उभी होती. मी पुढे गेलो. पत्नी आतल्या खोलीत काहीतरी झाडलोट करीत होती. मी पत्नीला हाक मारली. कडक लक्ष्मीच्या बाईला काहीतरी देण्यासाठी आण म्हणालो.

     मी त्या बाईला निरखून पाहिले. डोक्यावर देवी ठेवलेली वेताच्या काड्यांची नक्षीदार बुट्टी होती. हळद कुंकू आणि खणानारळांनी बुट्टी भरून गेली होती. अंगावर पूर्ण विटलेली रया गेलेली जुनाट साडी होती. हातात एकच साधी बांगडी होती… अनवाणी होती. चेहऱ्यावर कमालीचे दारिद्र्य पसरलेले होते.

    पत्नी येईपर्यंत मी तिची विचारपूस केली. तिला विचारलं, “तुझं नाव काय?”

    ती म्हणाली, “सरस्वती देशमुख. पण गावभर मला वळखतात ते लक्ष्मीवाली बाई म्हणून!”

    “कोणत्या गावची?”

    “आमी पार तिकडचं बेळंकीचं. पण आता इकडं गांधीनगरला राहतूय.”

    “मुलं किती?”

    “तीन मुली आणि दोन मुलगे हाईत.”

    “मुलं मोठी आहेत का?”

    “सगळीच साळंला जात्यात.”

    “नवरा काय करतो?”

    “एका पायानं लंगडा हाय. रोज दारू पितू. रोज माझ्याकडून दारूसाठी पैसं घीतू. दुसरं कायच करत न्हाय.”

    मनाला चरका बसला. खूप वाईट वाटलं. तरणीताठी पण म्हातारी दिसणारी अनवाणी चालणारी बाई, पाच मुलं आणि दारुड्या नवऱ्याची जबाबदारी सांभाळणारी बाई, कसले कसले भोग तिच्या वाट्याला आले आहेत!

    हेही वाचा – कामिनीने एवढा टोकाचा निर्णय घेणे गरजेचे होते का?

    मी म्हटलं, “बसून खातोय म्हटल्यानंतर पैसेच द्यायचे नाहीत. पोटाला घालते तोच उपकार समज असं म्हणायचं.”

    “तसं पण करून बघिटलं. दिवसभर रुसून बसतंय. रात्री-अपरात्री उठून दांडक्यानं मारतंय. एकदा तर रात्री कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने सपासप मारलं. हातावर वळ उठलं. अजून गेलं न्हाईत.”

    तिच्या हातावर माझी नजर गेली. दोन उभे काळसर खरबरीत पट्टे दिसत होते. ते पाहून माझं काळीज पिळवटून गेलं. पण ती मात्र निर्विकार चेहऱ्याने मला सांगत होती. कदाचित, दुःख पचवण्याची तिची ताकद आता निबार झाली असावी.

    ती पुढं म्हणाली, “मग रोज सकाळी आठ वाजल्या की, पन्नास रुपय द्याचं. तेवढ्या पैशात दीशी दारूची बारकी बाटली यीतीया. मग दिवसभर त्याच तंद्रित पडून राहतंय.”

    मी विषय बदलायचा म्हणून विचारले, “तुला लक्ष्मीची बाई म्हणून का ओळखतात?”

    “कारण काय तर, घराघरांत फिरत मी कडकलक्ष्मी घीऊन जाती. तिच्या नावानं लक्ष्मीपूजन करती. उद्यापन मांडती. नवस-साखरपूजा घडवती.”

    मी विचारले, “हे काम तू कधीपासून निवडलं?”

    “निवडतिया कशाला ओ? आविष्यानं माझ्या हातात दिलं. त्याला मी तर काय करणार? नवरा असा लुळापांगळा भेटल्यावर पोराबाळांचा संसार कसा चालवायचा? ना घर, ना दार, ना शेतीवाडी, पैसं कुठनं आणायचं? सुरवातीला तर भिकच मागत हुती. पण नंतर माझी कर्नाटकातली मावशी आली. म्हणाली “बाई, कडकलक्ष्मी घीऊन फिर. सरदा तरी हाय ना लोकांत. मिळतील चार पैसं.!”

    ती पुढे सांगू लागली, “पैल्यापैल्यांदा कडकलक्ष्मी डोस्क्यावर घीऊन गावभर फिरताना छातीत गोळा उठायचा. लोकं पाहतील का? हसतील का? वात्रट बुलतील का? पण मी मनात म्हणायची, “ही माझी लाज न्हाय, ही माझी जगण्याची झुंज हाय!” आणि तिथूनच माझा प्रवास सुरू झाला.”

    “दर गुरुवारी पाटचं उठती. लक्ष्मीची मखर सजवती. फुलं लावती. तीळ-चमचमीत-साखर खोबऱ्याची पुरचुंडी भरती. नंतर बाहेर पडती… “कडकलक्ष्मी आली हो… उद्यापन करायचंय का?”

    “कधी कुणी हसतं. कुणी स्वागत करतं. कधी एकांदी नवी नवरी डोळं पुसत लक्ष्मीपुढं बसती. कधी एखादी बाई कुजबुजती, “हिच्या हातचं पूजन केलं की, पैशाची चणचण कमी हुती!” पण मला म्हायती हाय, मी काय चमत्कार करत न्हाय. मी नुसता धीर दीती. आधाराचं बुलती. एकदा तर गळाभर दागिनं घालून एक गुरीपान बाई दीवीपुढं बसली. अंगावर लय म्हागडी साडी हुती. हातात सोन्याच्या बांगड्या हुत्या. लई श्रीमंत घराण्यातली हुती. म्हणाली, ‘देवीला नवस लाव. माझ्या नवऱ्यात काहीच दम नाही. त्याला रोज फॅक्टरी आणि पैसा एवढंच दिसतंय. आमच्या मावस सासऱ्याचा एक मुलगा आहे. तो लांबच्या गावात राहतोय. पैलवान गडी आहे. माझा त्याच्यावर जीव आहे. तुला काय पण देते. पण मला तेवढा गडी मिळू दे.’ तिनं दागिना काढण्यासाठी गळ्यात हात घाटला. पण मी म्हणाली, ‘तायडे, आज दीवीला अडचण हाय. दोन दिवसांनी यीती. चांगला कौल लावूया. मी तिथून काढता पाय घेटला. पुन्हा त्या घराकडं फिरकली पण न्हाय.”

    तिचं ऐकून सर्द झालो. कसले कसले विचित्र अनुभव हिला आले असतील… पण तरीही ती ताठ उभा आहे… कुठल्याही फालतू मोहाला बळी न पडता… स्वतःचा स्वाभिमान न विकता… संकटांनी घेरलेलं असलं तरी न डगमगता… मला तर वाटलं, ती लोकांच्या घरामध्ये लक्ष्मी नेत नाही. ती त्यांच्या मनातली आशा नेत आहे. त्यांच्या कडवट जगण्याला कडकलक्ष्मीचं गोड रूप देत आहे. खरं म्हणजे ती लुळ्यापांगळ्या नवऱ्याची अबला बायको नाही. स्वतःच्या पायावर उभे राहून कष्टाने जगणारी स्त्री आहे. श्रद्धेला श्रमाशी जोडून कष्ट करणारी लक्ष्मी आहे. आज लोक तिला म्हणतात, “लक्ष्मीवाली बाई आली!” पण ती मनात हसते. कारण, ती कडकलक्ष्मी नाही. ती संघर्षातून घडलेली खरीखुरी लक्ष्मी आहे.

    मग तिने माझ्याकडे मोर्चा वळवला. लाजत लाजत विचारले, “तुम्ही काय करता?

    मी गेटवरच्या पाटीकडे बोट करून दाखवलं. म्हणालो, “मी वकील आहे. कोर्टात जातो.”

    “मजी नुकरीला हाय म्हणा की.”

    “नोकरी वेगळी. मी कोर्टात जाऊन न्यायदान देण्यासाठी मदत करतो.”

    “म्हंजे काय असतं?”

    “म्हणजे कोर्टात येणाऱ्या लोकांना न्याय मिळतो.”

    “न्याय मिळाल्यावर काय हुतं?”

    मी म्हणालो, “न्याय मिळाल्यावर माणसाला सुख, समाधान मिळतं. माणूस आनंदाने राहतो.”

    “मी कोर्टात आली तर मला न्याय मिळंल का? किती पैसं लागत्यात कोर्टात याला? तेवढं मी जमवीन कुठनं तरी.”

    तोंडात मारल्यासारखं झालं राव. माझी बोलतीच बंद झाली. ज्या व्यवस्थेत मी काम करतो ती व्यवस्था खरंच हिला न्याय देऊ शकेल का? मी कोणासाठी काम करत आहे? हिच्यासारख्या असंख्य पिचलेल्या बायांसाठी मी काम करत असलेली व्यवस्था काय करते? माझ्यासमोर असंख्य प्रश्न उभे राहिले.

    हेही वाचा – सूरजच्या आयुष्यात नवा ‘उष:काल’!

    ज्या समाजात ती जन्माला आली, तो समाजच अन्यायग्रस्त आहे. देशाच्या स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाली, तरी सुद्धा दारोदारी भीक मागायला लागावी, ही व्यवस्था आपण बदलली नाही. या व्यवस्थेने ज्यांच्यावर अन्याय केला, त्यांनी कोणत्या कोर्टात दाद मागायची? त्यांच्या वाट्याला जे दुःख आणि भोग आले त्याला कोण कारणीभूत आहे?  त्यांनी कोणत्या व्यवस्थेला जाब विचारायचा? भोळ्या समजुतीने आपण असेही म्हणू शकतो की, त्यांच्या नशिबाने त्यांच्या वाट्याला हे सर्व आले आहे. परंतु लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये लोकांचे नशीब बदलण्याचे काम संसद करत असते. संसदेमध्ये एखादा कायदा मंजूर झाला तर, कोटी कोटी लोकांचे जीवनमान बदलून जाते. परंतु सामान्य माणसाच्या, गोरगरीब जनतेच्या बाजूने कायदे करण्याची सुबुद्धी राज्यकर्त्यांना यायला हवी. त्यांची तशी इच्छाशक्ती असायला हवी!

    मी विचारात हरवलो होतो. एवढ्यात पत्नी आली. तिने आणलेली वीस रुपयची नोट सरस्वती बाईला दिली. तिने उजव्या हाताने घेतली. वर बुट्टीत टाकून दिली. पाठमोरी होऊन ती चालू लागली.

    स्वातंत्र्यानंतरच्या कुठल्याच अर्थव्यवस्थेने दखल न घेतलेल्या समाजातील एका पाठमोऱ्या अभागिनीकडे मी असहाय्यपणे पहात राहिलो!!!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026 ललित

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026 ललित

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    By डॉ. अस्मिता हवालदारMay 19, 2026

    लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि…

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 303
    • अवांतर 186
    • आरोग्य 112
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 425
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 211
    • मैत्रीण 19
    • ललित 637
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026
    Most Popular

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.