Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय

    August 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 ऑगस्ट 2026

    August 11, 2026

    माझे आजी-आजोबा आणि गणगोत

    August 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 11, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    पैं गा जो ययापरी । जन्मेंचि जन्म निवारी । मरणें मृत्यु मारी । आपण उरे ॥552॥ तया घरीं ज्ञानाचें । सांकडें नाहीं साचें । जया जन्ममृत्यूचें । हृदयी शल्य ॥553॥ आणि तयाचिपरी जरा । न टेंकतां शरीरा । तारुण्याचिया भरा- । माजीं देखे ॥554॥ म्हणे आजिचां अवसरीं । पुष्टि जे शरीरीं । ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥555॥ निदैव्याचे व्यवसाय । तैसे ठाकती हातपाय । अमंत्रिया राज्याची परी आहे । बळा यया ॥556॥ फुलांचिया भोगा- । लागीं प्रेम टांगा । तें करेयाचा गुडघा । तैसें होईल ॥557॥ वोढाळाचां खुरीं । आखरु आतें बुरी । ते दशा माझां शिरीं । पावेल गा ॥558॥ पद्मदळेंसी इसाळे । भांडताति जे हे डोळे । ते होती पडवळें । पिकलीं जैसीं ॥559॥ भंवईचीं पडळें । वोमथती सिनसाळे । उरु कुहिजैल जळें । आंसुवांचेनि ॥560॥ जैसें बाभुळीचें खोड । गिरबडूनि जाती सरड । तैसें पिचडीं तोंड । सरकटिजेल ॥561॥ रांधवणी वोलीपुढें । पऱ्हे उन्मादती खातवडे । तैसींचि यें नाकाडें । बिडबिडती ॥562॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : मद्यपाआंगींचें वस्त्र, लेपाहातींचें शस्त्र

    अर्थ

    अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्यजन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्यदेहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यु नाहीसा करतो व आपण (जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने) उरतो ॥552॥ अशा रीतीने ज्याच्या अंत:करणात जन्ममृत्यु हे काट्यासारखे सलत राहतात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते. ॥553॥ आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच, ऐन उमेदीत असतांनाच जो पुढे येणार्‍या म्हातारपणाबद्दल विचार करतो. ॥554॥ तो म्हणतो, पाहा, आजच्या वेळी (भर तारुण्यात) ही जी शरीरात पुष्टी आहे, ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल ॥555॥ दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात, तसे हातपायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती, प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे. ॥556॥ फुलांच्या (सुवासाच्या) भोगाकरता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते (नाक) उंटाचा गुडघा जसा असतो, तसे विद्रूप व वास घेण्याला असमर्थ असे होईल. ॥557॥ ओढाळ गुरांच्या खुरांनी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते, त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल. ॥558॥ कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात, तसे होतील. ॥559॥ भुवयांचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल. ॥560॥ ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरड गिरबिडून टाकतात, त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल. ॥561॥ स्वयंपाकाच्या चुलीपुढे खाचेत अगर चरात (उष्टे पाणी वगैरे साचून) जसे दुर्गंधियुक्त बुडबुडे उसळतात, त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील. ॥562॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    August 10, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : मद्यपाआंगींचें वस्त्र, लेपाहातींचें शस्त्र

    August 9, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव

    August 8, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    By Team AvaantarAugust 10, 2026

    अध्याय तेरावा हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया । कीं वैरा बापाचेया । पुत्र…

    सार्थ ज्ञानेश्वरी : मद्यपाआंगींचें वस्त्र, लेपाहातींचें शस्त्र

    August 9, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव

    August 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें

    August 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय

    August 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 ऑगस्ट 2026

    August 11, 2026

    माझे आजी-आजोबा आणि गणगोत

    August 10, 2026

    हलकल्लोळ

    August 10, 2026

    वारसा

    August 10, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 391
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 529
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 841
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय

    August 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 ऑगस्ट 2026

    August 11, 2026

    माझे आजी-आजोबा आणि गणगोत

    August 10, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.