दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 11 ऑगस्ट 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 20 श्रावण शके 1948; तिथि : चतुर्दशी 25:53; नक्षत्र : पुनर्वसु 10:09;
- योग : सिद्धि 18:51; करण : विष्टि 15:22;
- सूर्य : कर्क; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:10;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
शिवरात्री
अमावस्या प्रारंभ उत्तर रात्रौ 01:53
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
लेखक, संपादक वि. स. वाळिंबे
टीम अवांतर
विचारवंत पत्रकार, लेखक, संपादक अशी ओळख असणाऱ्या वि.स.वाळिंबे यांचा जन्म 11 ऑगस्ट 1928 रोजी झाला. विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. इ.स. 1948 साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंबे सहभागी झाले होते. परिणामी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी म्हणून ठेवण्यात आले. मात्र या सगळ्यात त्यांचे शिक्षण मागे पडले. आपल्या उमेदवारीच्या काळात त्यांनी अग्रणी नावाचे दैनिक, तसेच रोहिणी नावाच्या मासिकात काम केले. पुढे ते प्रभात या वृत्तपत्रात नोकरीला लागले. त्यानंतक्र ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ त्यांनी नोकरी केली.
1962-63 च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते. इतिहास आणि तो घडवण्यात अग्रेसर असणारी मोठी माणसे यांचे जबरदस्त आकर्षण वि.स.वाळिंबे यांना होते आणि तीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. यातूनच त्यांची साहित्य निर्मिती झाली. 1968 साली ‘व्होल्गा जेव्हा लाल होतो’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले.
हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश
इतिहासासारखा काहीसा दुर्लक्षित विषय जरी त्यांनी निवडला असला तरी त्यांचे लेखन कधीही अवघड, कोरडे किंवा बोजड झाले नाही. इतिहास जिवंत, थरारक करण्याच्या नादात ते कधीही भावविवश झाले नाहीत की उगाचच गौरवार्थ लिखाण केले नाही.
वाचनीयता आणि रसवत्ता जराही उणावू न देता अभ्यास आणि कष्ट यांनी निवडून, पारखून दिलेला तपशील उत्तम रीतीने मांडण्याचे कौशल्य वाळिंबे यांच्या जवळ होते. त्यांच्या लेखणीला ती एक सिध्दीच होती. प्रसंगातले नाट्य अचूक टिपण्याच्या त्यांच्या मार्मिकतेमुळे वाचकाला अपूर्व समाधान मिळते. त्यांचा हिटलर किंवा त्यांचे सावरकर किंवा त्यांचे नेताजी वाचताना त्यातले प्रसंगनाट्य अक्षरश: खिळवून ठेवते. ‘अत्यंत वाचनीय लेखक’ अशा शब्दांत पु. ल. देशपांडे यांनी त्यांचा गौरव केला होता.
वाळिंबे यांनी अनेकांची चरित्रे लिहिली त्यांपैकी राजमाता (विजयाराजे शिंदे यांचे आत्मकथन) आणि युवराज (रणजितसिंग यांचा मुलगा दुलिपसिंग याच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी) विशेष उल्लेखनीय आहेत. वाळिंबे यांनी 45 पुस्तके लिहिली. याशिवाय नानी पालखीवाला यांच्या ‘फ्रीडम ॲट मिडनाइट’ या पुस्तकाचा ‘मध्यरात्रीचा स्वातंत्र्यसूर्य’ या नावाने अनुवाद केला. कुलदीप नायर यांच्या ‘इन जेल’ या पुस्तकाच्या वाळिंबे यांनी केलेल्या अनुवादाने साहित्य विश्वात मोठी खळबळ उडाली होती. हे पुस्तक प्रचंड गाजले. वाळिंबे यांच्यावर ‘उमदा लेखक, उमदा माणूस’ नावाचा लेखसंग्रह प्रकाशित झाला. याचे संपादन अरुणा ढेरे यांनी केले आहे. 22 फेब्रुवारी 2000 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – तुमचा आतला आवाज आणि मनोधैर्य आज निर्माण होणारी कठीण परिस्थितीही तुमच्या बाजूने वळवण्यासाठी उपयुक्त ठरेल. नवीन व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारासोबतचे भावनिक नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. शारीरिक ऊर्जा टिकून राहील. जड वस्तू उचलताना विशेष काळजी घ्या.
वृषभ – आर्थिक गुंतवणुकीसाठी घेतलेल्या निर्णयामुळे भविष्यात चांगला परतावा मिळेल. तुमच्या गोड शब्दांनी प्रलंबित कामे आज सहजपणे पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडण्यात यशस्वी व्हाल. जोडीदारासोबतची संध्याकाळ अत्यंत आनंददायी ठरेल. डोळ्यांची आणि घशाची काळजी घ्या. मोबाईलचा अति वापर आणि थंड पेये टाळा.
मिथुन – आज तुमची निर्णयक्षमता वाढेल, ज्रामुळे अचूक परिणाम मिळतील. अत्यंत सकारात्मक विचार आणि ऊर्जा कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांना प्रेरणा देईल. घाईगडबडीत किंवा अतिउत्साहात कठोर शब्द वापरणे टाळा. कौटुंबिक जीवन सर्वसामान्य असेल. तुमची ऊर्जा पातळी उच्च राहील; प्राणायामाने मानसिक संतुलन राखा.
कर्क – समाजात तुमच्याबद्दलचे आकर्षण आणि प्रभाव वाढेल. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे योग्य मार्गदर्शन तुमच्या कारकिर्दीसाठी मैलाचा दगड ठरेल. बजेटपेक्षा जास्त खरेदी करण्याच्या सवयीला आळा घाला. वैवाहिक जीवनातील जोडीदाराबरोबर सामंजस्य आणि आदर अधिक दृढ होईल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन दिनचर्येत योगाचा समावेश करा.
सिंह – उत्पन्नाच्या जुन्या स्रोतांसोबतच आज काही नवीन मार्गही खुले होतील. सामाजिक कार्यांमधील सक्रिय सहभागामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात प्रलंबित महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. जोडीदाराबद्दलच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आरोग्यदायी आहार घ्या. छातीत जळजळ किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो.
कन्या – आज तुमचे व्यक्तिमत्व आणि बोलण्याची शैली अधिक खुलून दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन ग्राहकांना भेटण्याची संधी मिळेल, जे फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत एखाद्या खास ठिकाणी सहलीचे नियोजन करू शकता. दिवसभर ताजेतवाने वाटेल. नियमितपणे फिरायला जाणे आरोग्यासाठी उत्तम ठरेल.
तुळ – विस्कळीत झालेली कामे आज पुन्हा मार्गी लागतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक शांती मिळेल. उच्च शिक्षण किंवा परराष्ट्र व्यवहार यांच्याशी संबंधित कामात अपेक्षित प्रगती होईल. जोडीदारासोबतचे संबंध उत्तम राहतील. तुमचे मन अत्यंत आनंदी असेल. आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या हलके वाटेल. आरोग्य सामान्य राहील.
वृश्चिक – अचानक आर्थिक लाभ किंवा मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. संशोधन, अभ्यास किंवा विश्लेषणात्मक कामात गुंतलेल्यांना यश मिळेल. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवणे टाळा. वैवाहिक जीवनात पारदर्शकता आणि संवाद ठेवा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घ्या.
हेही वाचा – माणुसकीची फुले
धनु – व्यवसाय आणि भागीदारीशी संबंधित बाबींसाठी आजचा दिवस खूप फलदायी ठरेल. सांघिक वातावरणात काम केल्याने कार्यालयाची मोठी उद्दिष्ट्ये साध्य करणे सोपे जाईल. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची आणि आपले नेटवर्क वाढवण्याची उत्तम संधी आज मिळेल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे सर्व चिंता दूर होण्यास मदत होईल. स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा दाखवू नका. वेळेवर जेवण करा.
मकर – तुमची मेहनत आणि सातत्य यामुळे विरोधकही तुमची प्रशंसा करतील. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हानांना दृढनिश्चयाने सामोरे जाल. यात विजय तुमचाच होईल. पैसे देणे किंवा घेणे आज पुरते पुढे ढकलणे उत्तम राहील. वैवाहिक जीवनात परिपक्वता आणि परस्पर आदर वाढेल. आज पाठदुखी किंवा सांध्यांमध्ये ताठरपणा जाणवू शकतो; डॉक्टरी सल्ल्याने स्ट्रेचिंग करून पहा.
कुंभ – सृजनशील आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. शेअर किंवा म्युच्युअल फंडांमधील विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळेल. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि चांगले यश मिळवतील. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने भूतकाळातील कटुता दूर होण्यास मदत होईल. आरोग्य उत्तम राहील; खेळ किंवा शारीरिक हालचालींमध्ये अवश्य सहभागी व्हा.
मीन – आज प्रत्येक काम अत्यंत संयमाने आणि अचूकतेने करा. घराची सजावट किंवा नूतनीकरण करणे हे तुमचे आज मुख्य लक्ष्य असेल. पालकांचा सल्ला तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. कौटुंबिक बाबींमध्ये जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. छातीत जळजळ होणे किंवा हवामानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कोमट पाणी अवश्य प्या.


