Monday, December 8, 2025

banner 468x60

Homeफूड काॅर्नरKitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी…

Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी…

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी बनवताना वापरावयाच्या काही टीप्स पाहूयात –

  • केक केल्यानंतर थोडे दिवस ताजा ठेवायचा असेल, तेव्हा केकबॉक्समध्ये ठेवताना ब्रेडच्या दोन-तीन स्लाइस त्याबरोबर ठेवाव्यात. केक नरम आणि ताजा राहतो.
  • भजी करताना ज्यांची भजी करायची तो पदार्थ तुरटीच्या पाण्यात पंधरा ते वीस मिनिटे भिजवून ठेवावा. यामुळे भजी कुरकुरीत होतात.
  • आयत्या वेळी ढोकळा करायचा असल्यास एक वाटी डाळीच्या पिठाला सायट्रिक ॲसिड न वापरता दोन मध्यम आकाराच्या लिंबांचा रस कोमट पाण्यात (वाटीभर) मिसळून त्यात पीठ भिजवावे. मीठ, साखर अंदाजाने घ्यावे. हवा असल्यास हिरवा मसाला (आले, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची) घालावा. पिठावर अर्धा टी-स्पून सोडा टाकावा. वर लिंबू पिळावे, सोडा फसफसतो. पीठ भराभरा फेटावे. पीठ हलके होऊन त्याला जाळी पडते. मग कुकरमध्ये शिटी न ठेवता पंधरा मिनिटे ठेवावे. त्यावर खोबरे, कोथिंबीर, फोडणी घालावी. अतिशय हलका आणि छान ढोकळा होतो. सायट्रिक अॅसिडऐवजी ताज्या लिंबाचा रस तब्येतीला चांगला असतो.

हेही वाचा – Kitchen Tips : …तर सामोसे खुसखुशीत होतात!

  • दहीवडे करताना मिक्सरमधून डाळ काढल्यावर एका वाटीत पाणी घेऊन त्यात वाटलेले थोडेसे पीठ घालून बघावे. ते तरंगल्यास ते झाले असे समजावे आणि तरंगले नाही, तर परत एकदा मिक्सरमधून काढावे. अशा पिठाचे दहीवडे हलके होतात आणि दही आतपर्यंत जाते.
  • आंब्याची डाळ उरल्यास थोड्या जास्त तेलाची फोडणी करून, ही डाळ चांगली परतून गरमागरम खाल्ली तर फारच चविष्ट लागते. वाटली डाळ करतो तशीच, पण कैरीचा आंबटपणा असल्याने लिंबू पिळण्याचीही आवश्यकता नाही.
  • सोलाण्याची किंवा वाटाण्याची कचोरी भरून झाल्यावर आपण ती तळतो. परंतु ती न तळता निर्लेप पॅनमध्ये कचोरीला दोन्ही बाजूने एक स्पून तेल लावून चांगली लाल शेकावी आणि डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावी. पाहिजे त्या वेळी फ्रीजमधून 10 मिनिटं आधी बाहेर काढून ठेवावी आणि मग तळावी. तळताना तेल फारच कमी लागते. कचोरीही कुरकुरीत होते. तळली नाही, मंद गॅसवर दोन्ही बाजूने लाल शेकली, तरी कुरकुरीत होते.

हेही वाचा – Kitchen Tips : कोथिंबीर वडी, अळुवडी आणि केक करताना….

  • उपमा, सांजा किंवा उपीट करताना पाण्याऐवजी ताकाचा (एक वाटी) वापर करावा. हिरव्या मिरच्यांऐवजी लाल तिखट आणि लसूण एकत्र कुटून घ्यावे, चवीला थोडी साखर टाकावी आणि नेहमीप्रमाणे उपमा करावा. उपमा मऊ लुसलुशीत तर होतोच; पण आंबटगोड चवही छान लागते. ताक नसल्यास दोन चमचे आंबट दही घ्यावे.

(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!