Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: MANOJ JOSHI
प्रदीप केळुस्कर गोरेगावच्या सत्कार हॉटेलमध्ये अनंता जेवायला बसला होता. समोर मस्त सरांग्याचे ताट होते. चपाती आमटीत बुडवून तोंडात घालताना त्याला जयंत आतमध्ये येताना दिसला. आपल्या वर्गातील जया दिसताच अनंताला आनंद झाला. त्याने हाक मारली… “जयाSS” जयंतने चमकून बघितले. अनंताला पहाताच जया त्याच्या टेबलाकडे आला आणि समोर बसला. “अरे, तू हय कसो? वैनी भावाकडे गेली की काय?” जयंतचा प्रश्न. “अरे पुण्याक गेलीया. तिची भाची असता थय, तिचा डोहाळे जेवण… तिच्या माहेरची सगळीच गेलीत…” “पण तू हय कसो काय?” अनंताने विचारलं. “अरे, माझो झील अमेरिकेक आसता ना, तेना गोगटेवाडीत प्लॅट घेतल्यानं. बिल्डिंगचा काम सुरू आसा… ता काम कितपत इला ता बघुक इल्लाय.…
कुमार चोप्रा / सुनील इनामदार सकाळी उठल्यापासूनच आपल्या डोक्यात ऑफिसच्या कामांची यादी सुरू होते. घरातील कामं आवरून ऑफिसला पोहोचेपर्यंत आज दिवसभरात कोणती, किती कामं पूर्ण करायची याचं नियोजन मनात सुरू असतं. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर लगेच कामाला सुरुवात होते. कामाच्या गडबडीत अनेकदा पाणी प्यायचंही भान राहत नाही! कधी कामाचा इतका लोड असतो की, दुपार झाली आणि जेवणाची वेळ झाली, हेही लक्षात येत नाही. सतत खुर्चीत बसल्यामुळे डोळे, हात, पाठ आणि मान यांच्यावर ताण येतो आणि शरीराला शीण जाणवतो. हा शीण घालवण्यासाठी आपण चहा-कॉफी किंवा कँटीन ब्रेक घेतो. पण त्याऐवजी काही सोप्या आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास अधिक फ्रेश वाटण्यास मदत होऊ शकते. हेही…

