Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026

    Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    November 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    November 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, November 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » एक मॉर्निंग वॉक असाही….
    ललित

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरNovember 20, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    Avaantar, अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, अभिजात मराठी, सुधीर करंदीकर, लेखक सुधीर करंदीकर, Sudhir Karandikar, मॉर्निंग वॉक, Morning Walk
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    बरेच जण सकाळी फिरायला बाहेर पडतात, त्यावेळी सगळ्यांच्या एका हातात मोबाईल हा असतोच असतो. आधी मोबाईल पर्समध्ये किंवा खिशात असायचा. आता ते पण अंतर जास्त वाटतं म्हणून सगळ्यांचेच मोबाईल आता कायम हातामध्येच असतात.

    चालताना अधेमधे थांबून सगळेचजण हात वर करून बघत असतात,  मोबाइलमध्ये, नवा काही मेसेज आला आहे का? काही आहे का? आणि लगेच उभं राहून किंवा चालत चालत रिप्लाय पण करत असतात. अशावेळेस आपण रस्त्यावर आहोत, रस्ता क्रॉस करत आहोत, आजूबाजूने वाहने जात आहेत, याची पण त्यांना शुद्ध नसते.

    परवाचीच गोष्ट आहे. मी नेहेमीप्रमाणे एकटाच फिरायला बाहेर पडलो. मी फिरायला जाताना मोबाईल कधीच बरोबर नेत नाही. इकडे तिकडे बघत बघत फिरणे मस्त एन्जॉय करत होतो. फूटपाथवर माझ्या बाजूनेच चालणाऱ्या एका आजींची आणि समोरून चालत येणाऱ्या आजोबांची हलकी टक्कर झाली. दोघंही मोबाईलवर होते. दोघांचं ‘सॉरी सॉरी’ झालं, दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि दोघंही आश्चर्यचकित झाले.

    हेही वाचा –रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…

    आजोबा म्हणाले : अरे, चक्क तुम्ही? मी तुमच्याच मेसेजला उत्तर लिहीत होतो.

    आजी म्हणाल्या : आश्चर्यच आहे. अहो, मी तुम्हालाच तुमच्या आवडीचं तलतचं जुनं गाणं “ऐ मेरे दिल कही और चल” पाठवत होते.

    कुणाला काही लागलं नाही ना? हे बघायला मी थांबलो होतोच. मी दोघांनाही म्हणालो – इथे बाजूलाच चहाचं छोटं दुकान आहे. तिथे बाक आहेत, त्यावर पाच मिनिटं बसा. आजोबा तुमचा रिप्लाय आमने सामने आजींना सांगा, आणि आजी, “ऐ मेरे दिल कही और चल ” हे गाणं आता पाठवायच्या ऐवजी, ते तुमच्या आवाजात आजोबांना गाऊनच दाखवा. फीमेल आवाजामध्ये पण हे गाणं ऐकायला मजा येते… आणि तुमची हरकत नसेल, तर मी पण गाणं ऐकायला बसतो, कारण माझं पण ते अतिशय आवडतं गाणं आहे. बाजूच्या टपरीवरून मस्त गरम गरम चहा मागवू. मजा येईल. पण यापुढे चालताना “नो मोबाईल” प्लीज.

    आम्ही तिघे बाकावर बसलो. आजोबांनी दोन जोक सांगितले. आम्ही तिघंही मनमुराद हसलो. आजोबा खूश झाले. मग आजीचं फीमेल व्हॉइसमध्ये “ए मेरे दिल कही और चल” हे गाणं झालं. आम्ही खूश होऊन टाळ्या वाजवल्या, आजींच्या आवाजाला आणि उत्साहाला दाद दिली.

    चालणारी दोन सीनियर सिटिझन कपल्स पण गाणं ऐकायला थांबली होती. त्यांनी पण चिअर्स केले. मी ‘हमे तुमसे प्यार कितना, ये हम नही जानते’ हे गाणं म्हटलं. सगळ्यांनी भरपूर टाळ्या वाजवल्या आणि अजून एक गाणं होऊन जाऊ द्या, असा आग्रह केला. मी दिलीप कुमार यांचं “सुहाना सफर और ये मौसम हंसी” हे गाणं म्हटलं. मी एक ओळ म्हटली की, सगळेजण कोरसमध्ये ती ओळ  रीपीट करायचे. अशा रीतीने ग्रुप सॉग सगळ्यांनी एन्जॉय केलं. नंतर जमलेल्यांपैकी दोघांची गाणी झाली… मजा आली.

    शेवटी आजोबांतर्फे सगळ्यांना मस्त चहा झाला. चहाच्या दुकानाच्या मालकांनी त्यांच्यातर्फे सगळ्यांना एक एक मारीचे बिस्किट दिले,.. आणि म्हणाले – “ऐसा माहोल यहां पहिली बार हुआ है, इसलिये मेरी तरफ से बिस्किट!”

    आजोबा : रोजच नियमितपणे फिरायला जात असतो. पण आजचं फिरणं एकदम वेगळं. मज्जा आली. तब्येत एकदमच खूश झाली

    आजी : मला पण फिरताना कधीही आली नव्हती, अशी मजा आज आली आणि हे सगळं जमून कशामुळे आलं!! आज ओळख झालेल्या नवीन मित्रामुळे.

    मी : मी फक्त निमित्त होतो. खरी मज्जा आली मोबाईलमुळे आणि टक्कर झाल्यामुळे

    आजी – आजोबा एकमेकांना म्हणाले : असेच भेटत जाऊ. पण टक्कर नाही.

    हेही वाचा – कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    जमलेल्या आम्ही सगळ्यांनीच एकमेकांचे हात धरून गोल केला, थोडा वेळ अंग हलवत नाचल्यासारखे हातवारे करत करत –

    “यापुढे चालताना नो मोबाईल”

    “यापुढे चालताना नो मोबाईल” अशी शपथ घेतली.

    एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन झाले… बाय बाय झाले, इथेच पुन्हा भेटू, असे ठरले. माझ्या मॉर्निंग वॉक मित्रमैत्रिणींच्या यादीमध्ये आजी-आजोबा ॲड झाले.

    “यापुढे चालताना नो मोबाईल” अशी शपथ जर सगळ्यांनीच घेतली तर मज्जा येईल ना!! त्यामुळे रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना – ‘काही आलं आहे का?’  ‘काही आलं आहे का?’ या विचारातून सुटका होईल. अपघात होणार नाहीत… आणि चालण्याचा, फिरण्याचा खरा आनंद घेता येईल.

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    November 19, 2026 ललित

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026 ललित

    अंजू

    November 18, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    By तृप्ती देवNovember 19, 2026

    “तू येशील ना गं?” “कशाला गं?” “अगं, डान्स प्रॅक्टिस करायला! म्हणजे लग्नात संगीतचा प्रोग्राम आहे.…

    हायकू…थोडक्यात पण बरंच काही!

    November 19, 2026

    अंजू

    November 18, 2026

    एका सल्ल्याने बदलले आयुष्य

    November 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026

    Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    November 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    November 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 नोव्हेंबर 2026

    November 20, 2026

    महागडं लग्न… एक झगमगती, पण थकवणारी गोष्ट!

    November 19, 2026

    किस्सा अतरंगी डॉक्टरचा!

    November 19, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एक मॉर्निंग वॉक असाही….

    November 20, 2026

    Recipe : टेस्टी पालक आणि मुळा पॉकेट्स

    November 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ

    November 20, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.