Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘एम टी आयवा मारू’… समुद्रावरच्या जगाची कादंबरी

    October 11, 2026

    नवरात्री… आत्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व

    October 11, 2026

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, October 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Homeopathy : भयावह ॲलोपॅथी उपचारपद्धती आणि हॅनिमन
    आरोग्य

    Homeopathy : भयावह ॲलोपॅथी उपचारपद्धती आणि हॅनिमन

    डॉ. शैलेंद्र वैशंपायनBy डॉ. शैलेंद्र वैशंपायनOctober 11, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, आरोग्यम् परमम् धनम्, Homoeopathy, होमिओपॅथी, डॉ शैलेंद्र वैशंपायन, डॉक्टर शैलेंद्र वैशंपायन, लेखक शैलेंद्र वैशंपायन, होमिओपॅथी डॉक्टर वैशंपायन, होमिओपॅथी आख्यान, होमिओपॅथी रंजक कथा, होमिओपॅथीची माहिती, होमिओपॅथीचा जनक सॅम्युअल हॅनिमन, वैद्यकाचा अस्वस्थ करणारा इतिहास,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    होमिओपॅथीबद्दल बोलण्यासाठी आपण ज्या काळामध्ये होमिओपॅथीची निर्मिती झाली, तो काळ आधी समजून घेतला पाहिजे. कारण, त्या काळातील वैद्यक समजून घेतल्याशिवाय हॅनिमनने तत्कालीन उपचारपद्धतींना इतका तीव्र विरोध का केला, हे समजणे कठीण आहे.

    सर्वप्रथम एक गंमत लक्षात घेतली पाहिजे, आज आपण सर्रास वापरतो तो ‘ॲलोपॅथी’ हा शब्दच मुळात होमिओपॅथीचा जनक सॅम्युअल हॅनिमनने वापरात आणला आणि निश्चितच तो काही भूषणावह शब्द नव्हता. ग्रीक भाषेतील Allos म्हणजे ‘दुसरा किंवा भिन्न’ आणि pathos म्हणजे ‘दुःख किंवा रोग’. होमिओपॅथीच्या Similia — समानतेच्या तत्वापेक्षा वेगळ्या पद्धतीने उपचार करणाऱ्या तत्कालीन वैद्यकासाठी हॅनिमनने हा शब्द वापरला.

    पण इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. हॅनिमन ज्या ‘ॲलोपॅथी’वर टीका करत होता आणि आजचे आधुनिक वैद्यक यांच्यामध्ये जमीन-अस्मानाची तफावत आहे. गेल्या दोनशे वर्षांत आधुनिक वैद्यकाने विलक्षण प्रगती केली आहे. शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषधशास्त्र, शल्यचिकित्सा, भूलशास्त्र, लसीकरण, प्रतिजैविके, रोगनिदान, अतिदक्षता उपचार आणि आधुनिक तपासण्या — या सगळ्यांनी आजचे वैद्यक हॅनिमनच्या काळातील वैद्यकापेक्षा पूर्णपणे वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवले आहे.

    मला अनेकदा असे वाटते की, आज हॅनिमन जिवंत असता तर आधुनिक वैद्यकाने केलेली प्रगती पाहून तो निश्चितच आनंदी झाला असता आणि त्याने आपल्या काळातील वैद्यकावर जितकी कठोर टीका केली, तितकी आजच्या आधुनिक वैद्यकावर केली असती का, याबद्दल मला शंका आहे. कारण त्याच्या टीकेला तत्कालीन परिस्थितीची तितकीच गंभीर पार्श्वभूमी होती.

    हेही वाचा – Homeopathy : भारतात होमिओपॅथी आली तरी कशी?

    हॅनिमन स्वतः तत्कालीन वैद्यकशास्त्रात प्रशिक्षित झालेला डॉक्टर होता. त्याने लाइपझिग आणि व्हिएन्ना येथे वैद्यकीय शिक्षण घेतले आणि 1779मध्ये एर्लांगेन विद्यापीठातून एम.डी.ची पदवी मिळवली. म्हणजेच प्रचलित वैद्यकावरील त्याची टीका ही एखाद्या बाहेरच्या माणसाने केलेली टीका नव्हती. तो स्वतः त्या व्यवस्थेत शिकला होता, त्याने वैद्यकीय व्यवसाय केला होता आणि त्या उपचारांचे परिणाम जवळून पाहिले होते… आणि त्या काळातील उपचारपद्धती आजच्या नजरेतून पाहिल्या, तर त्यापैकी अनेक अक्षरशः भयावह वाटतात.

    रक्तमोक्षण ही त्यातील एक प्रचलित पद्धत होती. म्हणजे आजार बरा करण्यासाठी रुग्णाच्या शरीरातून मुद्दाम रक्त काढणे. त्यासाठी शिरेला छेद दिला जाई किंवा जळवा लावल्या जात. तीव्र वमन घडवणारी औषधे, मोठा परिणाम करणारी रेचक औषधे आणि शरीरावर अत्यंत कठोर परिणाम करणारे उपचार वापरले जात.

    पारा आणि त्याची विविध संयुगे, आर्सेनिकसारखे विषारी ठरू शकणारे पदार्थ आणि इतर शक्तिशाली द्रव्यांचाही औषधांमध्ये वापर होत असे. आज आपल्याला औषधाची उपचारात्मक मात्रा आणि विषारी मात्रा यातील फरकाबद्दल जे प्रगत ज्ञान आहे, ते त्या काळात उपलब्ध नव्हते. त्यामुळे काही वेळा रोगापेक्षाही उपचार रुग्णासाठी अधिक घातक ठरू शकत होता.

    मानसिक आजारांच्या उपचारांचा इतिहास तर आणखी अस्वस्थ करणारा आहे. मानसिक रुग्णांना बांधून ठेवणे, एकाकी कोंडणे आणि शारीरिक नियंत्रणाच्या कठोर पद्धती वापरणे अशा उपचारपद्धती दीर्घकाळ अस्तित्वात होत्या.

    पुढच्या शतकात ही कथा आणखी एका टोकाला गेली. मानसिक आजार आणि मेंदू यांचा संबंध शोधण्याच्या प्रयत्नात काही डॉक्टरांनी प्रत्यक्ष मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. 1888मध्ये स्विस मानसोपचारतज्ज्ञ गॉटलीब बर्कहार्ट यांनी काही मानसिक रुग्णांच्या मेंदूतील विशिष्ट भाग शस्त्रक्रियेने काढण्याचा प्रयोग केला. पुढे 1935मध्ये प्री-फ्रंटल ल्युकोटॉमी आणि त्यानंतर लोबोटॉमीसारख्या शस्त्रक्रिया विकसित झाल्या, ज्यामध्ये मेंदूच्या पुढील भागातील काही मज्जातंतूंचे संबंध तोडले जात.

    अर्थात, हा काळ हॅनिमननंतरचा आहे. त्यामुळे या शस्त्रक्रिया हॅनिमनच्या तत्कालीन वैद्यकावरील असंतोषाचे कारण होत्या, असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण वैद्यकाचा इतिहास किती कठीण आणि कधीकधी भयावह प्रयोगांतून पुढे गेला, हे समजून घेण्यासाठी त्यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे.

    याचे आणखी एक अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. 1799मध्ये ते गंभीर आजारी पडले. त्यांच्या उपचारांमध्ये वारंवार रक्तमोक्षण करण्यात आले. एकाच दिवसात अनेक वेळा त्यांच्या शरीरातून रक्त काढण्यात आले. त्यांचा मृत्यू केवळ रक्तमोक्षणामुळेच झाला, असे आज निश्चितपणे म्हणता येणार नाही; त्यांना घशाचा गंभीर आजारही होता. पण त्यांच्या शेवटच्या आजारात करण्यात आलेले प्रचंड रक्तमोक्षण आजही वैद्यकीय इतिहासातील अतिआक्रमक उपचारांचे एक बोलके उदाहरण म्हणून चर्चिले जाते.

    हेही वाचा – Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    त्या काळातील वैद्यकाचा आणखी एक अस्वस्थ करणारा इतिहास शरीररचनाशास्त्राच्या विकासाशी जोडलेला आहे. आज वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र शिकणे आपल्याला स्वाभाविक वाटते. पण मानवी शरीराच्या आत काय आहे हे समजून घेण्यासाठी मृतदेहांचे विच्छेदन आवश्यक होते आणि त्या काळात अभ्यासासाठी मानवी मृतदेह सहज उपलब्ध होत नसत. फाशी दिलेल्या गुन्हेगारांच्या मृतदेहांचा विच्छेदनासाठी वापर केला जाई. मृतदेहांची मागणी वाढत गेल्यावर ब्रिटनमध्ये त्याभोवती एक काळा बाजारही निर्माण झाला.

    एडिनबरोमधील बर्क आणि हेअर यांची कुप्रसिद्ध कहाणी याच काळ्या इतिहासाचा भाग आहे. शरीररचनाशास्त्राच्या अभ्यासासाठी मृतदेहांना पैसे मिळतात, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकांची हत्या करून त्यांचे मृतदेह शरीररचनाशास्त्राच्या अभ्यासासाठी विकले.

    दुर्दैवाने अनेक वैज्ञानिक शोधांचा आणि प्रगतीचा इतिहास पूर्णपणे निष्पाप असेलच असे नाही. अर्थात, प्रत्येक वैज्ञानिक प्रगतीमागे गुन्हा असतो असे नाही; पण प्रत्येक वैज्ञानिक प्रगतीचा इतिहास निष्पाप असतोच, असेही नाही… आणि कितीही म्हटले तरी होमिओपॅथी ही तत्कालीन वैद्यकीय शास्त्रातूनच जन्माला आलेली एक शाखा आहे. त्यामुळे तिच्या जन्माकडेही त्या काळातील वैद्यकाच्या पार्श्वभूमीतूनच पाहिले पाहिजे.

    क्रमश:
    Avatar photo
    डॉ. शैलेंद्र वैशंपायन

    डॉ. (प्रा.) शैलेंद्र आर. वैशंपायन, आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘डॉ. व्ही.’ या नावाने परिचित आहेत. त्यांना 26 वर्षांचा चिकित्सकीय आणि 25 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. ते होमिओपॅथीवरील चार पुस्तकांचे आणि चार शोधनिबंधांचे लेखक असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित होमिओपॅथिक नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक व्याख्याने दिली असून ‘Dr V’s World of Homoeopathy’ हा त्यांचा पॉडकास्टही आहे. थायरॉईड विकार, चिकित्सकीय संशोधन आणि हॅनिमॅनियन होमिओपॅथी ही त्यांच्या विशेष अभ्यासाची क्षेत्रे आहेत.

    Related Posts

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026 आरोग्य

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026 आरोग्य

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    By Team AvaantarOctober 10, 2026

    आरोग्यदायी जीवनाची सुरुवात औषधांपासून नव्हे, तर आपल्या जेवणाच्या ताटापासून होते. विशेषतः, महिलांसाठी योग्य आणि सकस…

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    टेंशन आहे? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘एम टी आयवा मारू’… समुद्रावरच्या जगाची कादंबरी

    October 11, 2026

    नवरात्री… आत्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व

    October 11, 2026

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026

    Homeopathy : भयावह ॲलोपॅथी उपचारपद्धती आणि हॅनिमन

    October 11, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 11 ते 17 ऑक्टोबर 2026

    October 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तेवींचि आक्रोशबळें, व्यापारे कोणे एके वेळे

    October 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 466
    • अवांतर 217
    • आरोग्य 158
    • पंचांग आणि भविष्य 624
    • फिल्मी 72
    • फूड काॅर्नर 258
    • मैत्रीण 30
    • ललित 986
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘एम टी आयवा मारू’… समुद्रावरच्या जगाची कादंबरी

    October 11, 2026

    नवरात्री… आत्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व

    October 11, 2026

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.