Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मंडईमध्ये विक्रीसाठी येताहेत. रंगीबेरंगी भाज्या, ताजी फळं… मंडईत शिरलं की, ताज्या भाज्या आणि फळांचा सुरेख सुगंध आणि रंग चित्तवृत्ती प्रसन्न करतात. तिथेच चाहूल लागते भोगी आणि संक्रांतीची. संक्रांत जवळ आली आहे. आता तर दुकानांमधून किंवा ठेला-गाड्यांवर रंगीबेरंगी प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या आकर्षक वस्तू दिसायला लागतात. कितीतरी बायका त्या वस्तू थोडीफार घासघीस करून डझनाच्या भावात घेत असतात. करेक्ट. हळदी कुंकवाचं वाण लुटण्याची तयारी सुरू झाली आहे. आता रोज बायका छान छान साड्या नेसून, नटूनथटून सगळीकडे हळदी कुंकवाचा आनंद लुटत फिरणार. काही वर्षांपूर्वी अशाच एका हळदी कुंकवाला मी हजेरी…
ॲड. कृष्णा पाटील भाग -1 “अरे, जिच्यासोबत मी सोळा वर्षे संसार केला ती माझी होऊ शकली नाही. तिला मी पूर्ण समजलो नाही. आता येणारी तर एकदम नवीन असणार. तिला मी काय समजू शकणार?” आभाळाकडे नजर लावून सूरज उदास मनाने बोलत होता. त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कशातच मन लागत नव्हतं. त्याची पत्नी जाऊन आज तीन वर्षे झाली होती. ती जिवंत असताना दोघांचे कधीही पटले नाही. सगळा संसार ओढून ताणूनच सुरू होता. सूरज कधीतरी नंदूकडे यायचा. सगळ्या गोष्टी सांगायचा. मनातल्या सर्व बऱ्या-वाईट गोष्टी सांगण्याचं त्याचं एकमेव ठिकाण म्हणजे नंदू. अगदी बालवयापासूनच दोघांची मैत्री. गावाबाहेर भैरवीच्या टेकडाजवळ हायवेला लागून ज्योतिर्लिंग चहा सेंटर होतं.…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये खमण ढोकळा, दहिवडे, डोसा, ऑमलेट बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : खमण ढोकळा, डोसा, ऑम्लेट बनवताना या टिप्स वापरून पाहा हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
पराग गोडबोले बरेच दिवस झाले या प्रसंगाला, पण आजही तो अगदी लख्खपणे आठवतो मला. निष्काळजीपणा आणि बेफिकिरी किती तापदायक ठरते याचा तो अनुभव, आजही मला हैराण करून सोडतो. शनिवार होता त्या दिवशी. मी ऑफिसला गेलो होतो आणि काम झालं म्हणून लवकर निघालो होतो. लोभस शनिवार संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशीच्या गोजिऱ्या रविवारची स्वप्नं बघत… दुसरा शनिवार होता, त्यामुळे गाड्यांना जास्त गर्दी नव्हती. मस्त खिडकीपाशी जागा मिळाली आणि मी खूश झालो. पुस्तक काढलं, सॅक वर ठेवली आणि वाचनात गुंग झालो… मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये, अशी वर ठेवलेली सॅक सुरक्षित असते. सहसा चोरीला वगैरे जात नाही, असा माझा कित्येक वर्षांचा अनुभव, त्यामुळे ती एकदा…
अध्याय सातवा एर्हवीं मी नसें ऐसें । कांहीं वस्तुजात असे । पाहें पां कवण जळ रसें- । रहित आहे ॥159॥ पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि । हें असो एक मीचि । विश्वीं असें ॥160॥ वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन । भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥26॥ येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं । आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ॥161॥ भविष्यमाणें जियें ही । तींही मजवेगळीं नाहीं । हा बोलचि एर्हवीं कांहीं । होय ना जाय ॥162॥ दोराचिया सापासी । डोंबा बडी ना गव्हाळा ऐसी । संख्या न करवे कोण्हासी…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज कामासाठी चांगली ऊर्जा असेल. पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. बराच काळ प्रलंबित कामे पूर्ण करण्याची इच्छा होईल. मात्र, कधी कधी घाई किंवा राग हानिकारक असू शकतो, म्हणून जरावेळ थांबून विचार करणे महत्त्वाचे आहे. आर्थिक समस्या हळूहळू सुधारतील. मात्र झोपेकडे आणि आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वृषभ – अनावश्यक धावपळीपासून दूर राहिल्याने शांती मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मूड चांगला होईल. कामाच्या ठिकाणी गोष्टी हळूहळू होतील, पण योग्य दिशेने जाणाऱ्या असतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधांमध्ये थोडी सौम्यता बाळगली तर वातावरण सुधारेल. मिथुन -…
स्नेहा सुतार भाग – 1 काल विजयादशमी. चांगल्याचा वाईटावर, सत्याचा असत्यावर या दिवशीच तर विजय झालेला. रामाने रावणाचा वध केलेला. खरंच? चांगल्याचा वाईटावर विजयवर विजय होतो खऱ्या आयुष्यात? कोण वाईट मुळात? प्रत्येकाला तर आपणच स्वतःच बरोबर वाटत असतं! मी करतोय ते बरोबर हेच वाटत असतं नाही का? मला तर हल्ली आत्तापर्यंत मी जगलेल्या आयुष्याने प्रचंड कन्फ्यूज केलंय माणसा माणसांबाबत. कोण, कसं, कुठे, काय वागतं हे कळतच नाही!!! कोण कधी कसं बदलेल हेही कळत नाही! दहा तोंडांच्या रावणाचा वध झाला. दहा तोंडांची माणसं मात्र आजूबाजूला खूप दिसतात. एक तोंड खरं म्हणता म्हणता दुसरं तोंड दिसतं. दुसरं तोंड खरं म्हणता म्हणता तिसरं……
शोभा भडके भाग – 8 रामला खूप राग येत होता… त्याउलट सखाराम तथा भाऊ खूश होते. “हे बघा तुम्ही…” राम चिडून बोलतच होता की… ” माझं बोलून झालंय. हे माझं कार्ड… विचार करून निर्णय घ्या. ‘हो’ असेल तर कॉल करा… आकाश निघूया” व्हिजिटिंग कार्ड राम समोर धरत शिव म्हणाला… पण ते रामने घेतलं नाही, तसं सखारामने स्वतःकडे ते कार्ड घेतलं. मग आकाश आणि शिव निघून गेले. “हे बघा भाऊ काहीही झालं तरी मी माझ्या बहिणीचं लग्न असं घाईत होऊ देणार नाही… लोकांच्या भीतीने तर अजिबात नाही!” राम रागात म्हणाला आणि बाहेर निघून गेला. पवन पण त्याच्या मागे गेला. “सखाराम, पोरगा…
माधवी जोशी माहुलकर मिश्र भाज्यांचे कटलेट्स केले तर, ते लवकर संपतात, हा माझा अनुभव आहे. फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या थोड्याफार प्रमाणात उरलेल्या असतात, त्यामधे बटाटा मिक्स केला की, अफलातून चवीचे कटलेट्स तयार होतात आणि भाज्या न आवडणारी मुलेही फारसे प्रश्न न विचारता हे कटलेट्स भराभर संपवतात. यामुळे उरलेल्या भाज्यांचाही निकाल लागतो, मुलांच्याही पोटात भाज्या जातात आणि आपला उद्देश सफल होतो! यावेळेस मी यात लिटिल मिलेट्सचाही वापर केला. त्यामुळे एक वेगळीच चव निर्माण झाली. साहित्य हेही वाचा – Recipe : अतिशय खमंग अन् सर्वांच्या पसंतीचं थालिपीठ! कृती हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा! टिप्स एकूण कालावधी…
अध्याय सातवा किंबहुना ऐसें जें भजन । तें संसाराचेंचि साधन । येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥148॥ हें असो परौतें । मग हो का आवडे तें । परि यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥149॥ येर तनुमनप्राणीं । जे निरंतर माझेयाचि वाहणीं । ते देहाचां निर्वाणीं । मीचि होती ॥150॥ अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः । परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥24॥ परी तैसें न करिती प्राणिये । वायां आपुलां हितीं वाणिये । पैं पोहताती पाणियें । तळहातींचेनि ॥151॥ नाना अमृताचां सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे । आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकांतें ॥152॥ हें ऐसें काइसेया…

