Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – संयम आणि समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. याशिवाय, आवश्यक तिथे मोकळेपणाने संवाद साधा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु वरिष्ठ तुमचे कठोर परिश्रम लक्षात घेतील. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. वृषभ – नातेसंबंधांमधील प्रेम वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा संधी मिळू शकतात, ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे; त्या दृष्टीने सध्या मोठी गुंतवणूक टाळा. आरोग्य चांगले राहील, परंतु खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करणे टाळा. मिथुन – आजचा दिवस संमिश्र असू शकतो. कौटुंबिक जीवनात…
दीपक तांबोळी “आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी सर्व मान्यवर, आजचे सत्कारार्थी आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्री. अरुण नाईक यांना विनंती करते की, त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं.” सूत्रसंचालिकेने अशी विनंती करताच जिल्हा साहित्य संघाचे अध्यक्ष आणि कलेक्टर साहेब यांच्यासोबत अरुण व्यासपीठावर जाऊन बसला. समोरच्या प्रेक्षागृहाकडे त्याने पाहिलं. प्रेक्षागृह तुडूंब भरलं होतं. एकही खुर्ची रिकामी नव्हती. “हे सगळे खरोखरच पुस्तकप्रेमी आहेत की, पत्रिकेत जेवायचं सुद्धा निमंत्रण आहे म्हणून फक्त जेवायला आलेले लोक आहेत?” त्याच्या मनात विचार आला. मागे त्याने पुस्तक प्रकाशनाचे दोन-तीन कार्यक्रम बघितले होते. त्याच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनावेळीही अगदी मोजकी डोकी हजर…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये गवारीची भाजी, कढी गोळे, साबुदाणा खिचडी, वांग्याचे भरीत बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना… हेही वाचा – Kitchen Tips : खमण ढोकळा, डोसा, ऑम्लेट बनवताना या टिप्स वापरून पाहा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर एखाद्याच्या शरीरानं प्राण सोडला तरी त्याच्या आप्तस्वकियांना कुठंतरी काहीतरी सुप्त आशा वाटत असते… डॅाक्टर ॲाक्सिजन लावतील, सीपीआर देतील, एखादं इंजेक्शन दिलं तर हृदय पुनःश्च कार्यरत होईल वगैरे… पण एकदा विकेट पडली की पडली; अगदी तुरळक परिस्थितीत डीआरएसचे बेनिफिट मिळते… आता ही परिस्थिती असेल तर, तेव्हा काय असेल? जेव्हा वैद्यकशास्त्र काय एकूण विज्ञानच पाळण्यात होतं! अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात विजेचा शोध लागला तेव्हा तर, जगानं पहिल्यांदाच ‘एखाद्या अदृश्य शक्तीचा’ थेट अनुभव घेतला होता… विज्ञान उत्तरोत्तर नव्या क्षितिजांकडं धाव घेत असताना माणसाला पहिल्यांदा प्रश्न पडला की, ”ही अदृश्य शक्ती म्हणजेच वीज ‘जीवनाशी’ निगडित आहे का?” याच प्रश्नातून जन्म झाला एक…
अध्याय सातवा साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ॥30॥ जिहीं साधिभूता मातें । प्रतीतीचेनि हातें । धरूनि अधिदैवातें । शिवतलें गा ॥180॥ जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञु दृष्टी रिगे । ते तनूचेनि वियोगें । विरहे नव्हती ॥181॥ एर्हवीं आयुष्याचें सूत्र बिघडतां । भूतांची उमटे खडाडता । काय न मरतयाहि चित्ता । युगांतु नोहे ॥182॥ परी नेणों कैसें पैं गा । जे जडोनि गेले माझिया आंगा । ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥183॥ एर्हवीं तरीं जाण । ऐसे जे निपुण । तेचि अंतःकरण- । युक्त योगी ॥184 ॥ तंव इये शब्दकुपिकेतळीं ।…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आरोग्याची काळजी घ्या आणि किरकोळ आजारांकडेही दुर्लक्ष करू नका. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून काळजीपूर्वक नियोजन करा. सभोवतालच्या लोकांबद्दल, विशेषतः स्पर्धकांबद्दल जागरूक रहा. वृषभ – नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. तब्येत नरम-गरम राहू शकते. घरात शुभ प्रसंग येतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात काही आर्थिक अस्थिरता येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसायाच्या परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु तडजोडीने सर्व समस्या सोडवता येतात. मिथुन – आजचा दिवस आनंद, शांती आणि सौभाग्याने भरलेला असेल. आरोग्य उत्तम राहील, दिवसभर उत्साही रहाल.…
दिलीप कजगांवकर, पुणे राज आणि रीना एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंब. नेहा ही त्यांची एकुलती एक मुलगी, पंधरा वर्षांची. नेहा म्हणजे सौंदर्य, आधुनिकता आणि सोज्वळता यांचा सुरेख संगम. मागच्याच वर्षी राजची पुण्याला बदली झाली. कंपनीने एका मोठ्या सोसायटीत राजला राहण्यासाठी बंगला दिला. राजच्या बंगल्याच्या डाव्या बाजूला दोन मोकळे प्लॅाट आणि उजव्या बाजूला झाडांच्या गर्दीत लपलेला विनायकरावांचा ‘समृद्धी’ हा टुमदार बंगला. विनायकराव ऊर्फ आण्णा हे सेवानिवृत्त शिक्षक. मुलगा आणि सून परदेशात, भल्या मोठ्या बंगल्यात विनायकराव एकटेच. फावल्या वेळात, म्हणजे आण्णांचा तसा सर्व वेळच फावला असायचा… नेहाला शिकविणे हा त्यांचा रोजचाच उपक्रम. हळूहळू ते नेहा, राज आणि रीना यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग…
माधवी जोशी माहुलकर, नागपूर आले, लसूण प्रत्येक भाजीत वापरणे गरजेचे नसते. काही भाज्या या त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे चवीला गोडसर आणि सौम्य असतात. दुधी भोपळा, लाल भोपळा, चवळीच्या शेंगा, फुलकोबी अशा तत्सम भाज्या या चवीला सौम्य असतात, या भाज्यांमध्ये आले किंवा लसणाचा वापर केला तर त्यांची मूळ चव जाते आणि त्यामुळे या भाज्या चवीला उग्र लागतात. त्याचप्रमाणे गवारीचे आहे… गवार आणि वालाच्या शेंगा (वाल पापडी) याही पचनास तशा जड आणि गॅस्ट्रिक आहेत. गवार तर चवीला थोड्या कडसर असतात. यामध्ये लसणाचा वापर केला तर, आधीच चवीला उग्र असलेल्या ही भाजी आले-लसणाच्या अतिरिक्त वापरामुळे अजून जास्त ॲसिडिक होते, त्यापेक्षा गवारीची भाजी फक्त तिखट,…
अध्याय सातवा असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनी धनुर्धरा । विषयांचां वोवरां । विकृतीसी असे ॥169॥ तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे । मग चिरिलें आव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥170॥ तेणें भूतें भांबावलीं । म्हणोनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं । मग महादुःखाचां घेतलीं । दांडेवरी ॥171॥ येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् । ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥28॥ ऐसे विकल्पाचे वांयाणे । कांटे देखोनि सणाणे । जे मतिभ्रमाचे पासवणें । घेतीचिना ॥172॥ उजू एकनिष्ठतेचां पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं । महापातकाची सांडिली । अटवीं जिहीं ॥173॥ मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माझी जवळीक पातले । किंबहुना ते चुकले । वाटवधेयां ॥174॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 जानेवारी 2026; वार : मंगळवार वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – करिअरच्या बाबतीत आजचा दिवस विचारपूर्वक वागण्याचा आहे. काम नियोजनबद्ध पद्धतीने केले तर, तुम्ही व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित समस्यांवर सहज मात करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमचा विरोध करणारे लोक गरज पडल्यास तुमच्या पाठीशी उभे राहतील. म्हणून, अनावश्यक संघर्ष टाळणे चांगले. लहान कामे भविष्यात मोठे फायदे देतील. वृषभ – आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. अनेक जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, जोखीम घेतल्याने नफ्याचे दरवाजे उघडतील. विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. एकूणच दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल. मिथुन -…

