Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 28 जानेवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 28 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 28, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 28 जानेवारी 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 08 माघ शके 1947; तिथि : दशमी 16:36; नक्षत्र : कृत्तिका 09:26
    • योग : ब्रह्मा 23:53; करण : वणिज 27:16
    • सूर्य : मकर; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:27
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. व्यवसायवृद्धी शक्य आहे. सरकारी कामात यश मिळेल. मात्र आजचा दिवस खर्चिक असेल. मंदिर किंवा इतर धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. शेजाऱ्यांकडून तुम्हाला मोठी मदत मिळेल. आज संततीशी संबंधित सगळ्या चिंता दूर होतील.

    वृषभ – आजचा दिवस शुभ आहे. कुटुंबाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी चांगला समन्वय राखाल. आज काही कौटुंबिक गरजा आणि धर्मादाय उपक्रमांवर पैसे खर्च करू शकता. तसेच, स्वतःसाठी काही आवश्यक खरेदी देखील करू शकता. विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकतात.

    मिथुन – आजचा दिवस व्यग्र राहील. दिवसभर कामाचा ताण राहील. अनेक प्रलंबित कामे पूर्ण करावी लागतील. त्यासाठी सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एखाद्या सरकारी योजनेतून आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा होईल. एखाद्या धार्मिक कार्यातही सहभागी व्हाल.

    कर्क – आजचा दिवस आनंददायी आणि संपत्तीत वाढ करणारा असेल. मालमत्तेशी संबंधित व्यवहारात यश मिळण्याची शक्यता आहे. संततीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि भक्ती यांचा अनोखा संगम बघायला मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण करू शकाल.

    सिंह – आजचा दिवस आनंददायी असेल. कौटुंबिक जीवनात  जोडीदाराकडून आणि विशेषतः तुमच्या वडिलांकडून सहकार्य मिळेल. आज कमी प्रयत्नात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या ठिकाणी बदल फायदेशीर ठरेल. व्यवसायात जवळच्या सहकाऱ्याबद्दल खरी निष्ठा आणि स्नेह दाखवल्याने लोकांची मने जिंकता येतील. परदेशात किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही यश मिळण्याची शक्यता आहे.

    कन्या – आजचा दिवस शुभ राहील. कामाच्या ठिकाणी दिवस अनुकूल राहील, ज्ञान आणि अनुभवाची साथ मिळेल. वरिष्ठांकडून आदर आणि प्रोत्साहन मिळेल. शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत करावी लागेल. व्यावसायिकांनाही नवे तंत्रज्ञान जाणून घेणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात वाढ होईल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार करणे उचित ठरेल.

    तुळ – सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्याने जनसंपर्कात वाढ होईल. संपूर्ण दिवस आनंददायी जाईल, आर्थिक बाबतीत नशीब तुम्हाला साथ देईल. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल, परंतु त्यांना काही तांत्रिक समस्यांना देखील तोंड द्यावे लागू शकते. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने  आजचा दिवस अनुकूल राहील. जवळच्या मित्राकडून पाठिंबा मिळेल.

    वृश्चिक – आजचा दिवस संमिश्र असेल. घरातील आणि कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. कामे हातावेगळी करण्यासाठी सहकाऱ्यांकडूनही पाठिंबा मिळेल. जोडीदाराकडूनही पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करू शकता. अनपेक्षित आर्थिक लाभाची शक्यता आहे.

    हेही वाचा – गैरसमज… पुत्राचे पितृप्रेम!

    धनु – आजचा दिवस लाभदायक असेल. शुभ ग्रहांच्या संयोगामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ होऊ शकतो. अनेक प्रलंबित कामे आज  हातावेगळी करायला सुरूवात कराल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक लाभासोबतच समृद्धीची शक्यता देखील आहे. आज आवडीच्या काही वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

    मकर – आजचा दिवस खूप व्यग्र राहील. मात्र तरीही मनात आनंद आणि समाधानाची भावना असेल. कष्टाचे आणि समजुतदारीचे फळ व्यावसायिक जीवनात मिळेल. दुसरीकडे विरोधक आणि शत्रूंपासून सावध रहा. एखाद्याला मदत करून तुम्हाला पुण्य लाभ देखील मिळेल. त्याचबरोबर तब्येतीची काळजी घ्या.

    कुंभ – आजचा दिवस लाभदायक ठरेल. प्रलंबित कामे पूर्ण केल्याने उत्साह वाढेल. संपत्ती, कार्य आणि कीर्ति यात वाढ होईल. शत्रूंबद्दलच्या चिंता कमी होतील आणि बलाढ्य विरोधकांना तोंड देऊनही तुम्हीच विजय मिळवाल. वैवाहिक जीवनातील आनंदात वाढ होईल.

    मीन – आजचा दिवस आनंद आणि समृद्धीचा असेल. मनातील एक इच्छा पूर्ण होईल, ज्यामुळे मोठा आनंद मिळेल. घरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल त्यामुळे एखाद्या तीर्थयात्रेबाबत विचार शक्य आहे. संध्याकाळ कुटुंबासोबत मनोरंजनात घालवाल. आज वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल.


    दिनविशेष

    प्रसिद्ध भावगीत गायिका सुमन कल्याणपूर

    टीम अवांतर

    प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील भावनिपूर येथे झाला. सुमन हेमाडी हे त्यांचे लग्नाआधीचे नाव. त्यांच्या मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग. दि. माडगुळकरांच्या गीतापासून झाली. ‘पसंत आहे मुलगी’ या चित्रपटातून त्यांना मराठी पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली आणि त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात झाली.

    त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ हिन्दी आणि मराठीच नाही तर गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. अत्यंत सुमधुर आवाज आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या या गायिकेची तुलना लता मंगेशकर यांच्या आवाजाशी झाली. अगदी ‘प्रति लता’ असेही त्यांना म्हटले गेले. मात्र सुमन ताईंनी कायमच आपल्या वेगळ्या धाटणीने श्रोत्यांना आणि संगीत कलेला समृद्ध केले.

    सुमन कल्याणपूर यांचे हिंदी सिनेसृष्टीतले आगमन गझलसम्राट तलत मेहमूद यांच्यामुळे झाले. एका कार्यक्रमात गाणे गात असताना तलत मेहमूद यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी त्या काळातील आघाडीची  म्युझिक कंपनी HMVकडे त्यांच्या नावाची शिफारस केली होती. वास्तविक, हिंदीतील त्यांच्या वाटचालीबद्दल सांगायचे तर, वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी मोहमद शफी यांनी संगीत दिलेल्या ‘मंगू’  या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले होते. पुढे सुमन कल्याणपूर यांना संधी मिळत गेली तशी त्यांनी त्या काळातील आघाडीच्या पार्श्वगायिका लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या बरोबरीचं स्थान निर्माण केलं.

    हेही वाचा – Bookshelf : बापलेकी… लेकींनी आणि वडिलांनी वाचायला हवंच!

    ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’, ‘माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर परसात..’, ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’, ‘कशी गवळण राधा बावरली..’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ”केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर..”, ”उठा उठा चिऊताई” अशी कित्येक मराठी गाणी त्यांनी अजरामर केली आहेत.  हिंदीचा विचार केला तर ‘अगर तेरी जलवा नुमाई न होती’, ‘ना तुम हमे जानो ना हम तुम्हे जाने’, ‘ठहरीए होश में आऊ, तो चले जाईएगा’, ‘तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत न मैनें करनी थी’, ‘परबतो के पेडों पर शाम का बसेरा है’, ’अज हूं ना आये बालमा’, ‘तुमने पुकारा और हम चले आये’,  ‘नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’, ‘मेरा प्यार भी तू है’, ‘दिल एक मंदिर है’, ‘चले जा चले जा….जहां प्यार मिले’, ‘मन गाए वो तराना’, ‘दिल ने फिर याद किया’… अशी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली.

    सुखाची सावली आणि वावटळ या मराठी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कार देण्यात आला. तसंच त्यांना 2009 साली राज्य शासनाच्या वतीने ‘लता मंगेशकर पुरस्कारा’ने देखील गौरविण्यात आलं आहे. त्याआधी 1965 आणि 1970 साली सूर शृंगार संसद पुरस्कार, 1961 साली नाशिकच्या रसरंग संस्थेतर्फे फाळके पुरस्कार, 2017 साली पु. ल. स्मृती सन्मान तर 2023 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2009 साली त्यांचे ‘सुमन सुगंध’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    By Team AvaantarMay 9, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 19…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 292
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 611
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026
    Most Popular

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.