Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 29 जानेवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 29 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 29, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 29 जानेवारी 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 09 माघ शके 1947; तिथि : एकादशी 13:55; नक्षत्र : रोहिणी 07:31, मृगशीर्ष 29:29
    • योग : ऐंद्र 20:27; करण : बव 24:32
    • सूर्य : मकर; चंद्र : वृषभ 18:31; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:28
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    जया एकादशी

    भीष्म द्वादशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज भोवतालचे वातावरण आनंददायी असेल. एकामागोमाग एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. व्यवसायात काही नवीन योजना राबवू शकता, मात्र त्याबद्दल जोडीदाराशी चर्चा करायला विसरू नका. आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जरा लांबच ठेवा, अन्यथा ते तुम्हाला काही चुकीच्या गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात.

    वृषभ – आजचा दिवस तुमचा आदर आणि सन्मान वाढवणारा असेल. एखाद्याला मदत करण्यासाठी तुम्ही पुढे जाल, मात्र लोक या प्रकाराला स्वार्थी समजू शकतात. कामाबद्दल निष्काळजीपणा करू नका, कारण त्यामुळे संपूर्ण प्रकल्प बिघडू शकतो. कौटुंबिक जीवनात निर्माण होणारे कोणतेही तणाव दूर होतील. आज होणाऱ्या नव्या ओळखी नजीकच्या भविष्यात फायदेशीर ठरतील.

    कर्क – नोकरीच्या चिंता असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवा. आर्थिक योजना व्यवस्थित आखाव्यात. कामाच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहण्याचे टाळा, कारण ते तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. संततीच्या मनमानी वागण्यामुळे आज काहीसा ताण येईल.

    मिथुन – आजचा दिवस धावपळीचा असेल. जास्त नफा मिळवण्यासाठी कोणतेही धोकादायक पाऊल उचलणे टाळावे. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटल्याने आनंद मिळेल. स्वतःच्या आरोग्याबद्दल सजगता बाळगा. कामाच्या ठिकाणी तुमच्या आवडीचे काम मिळू शकते, त्याने समाधान वाटेल. तुम्हाला समाजातील काही खास लोकांच्या भेटीगाठी होतील. घरातील तुमच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

    सिंह – आज प्रतिस्पर्ध्यांपासून सावध रहा. एखादा करार अंतिम होण्यापूर्वीच त्याला खीळ बसू शकते. ऑफिसमधील सहकारी वरिष्ठांना तुमच्याबद्दल असलेल्या विश्वासाला धक्का देण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन तुम्ही चांगले नाव कमवाल. आईची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळेल.

    कन्या – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसाय योजनांमधून चांगला नफा मिळेल, त्यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. घाईने वाहन चालवणे टाळा. अनपेक्षितपणे आज खर्च वाढू शकतात. वडिलांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ काढावा लागेल. अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा कोणत्याही वादात अडकू नका.

    तुळ – आज जवळच्या नातेवाईकांमुळे मोठा फायदा होईल. वाढत्या कामाच्या ताणामुळे काहीसा त्रास जाणवू शकतो. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा. संतती एखाद्या गोष्टीमुळे तुमच्यावर नाराज असू शकते. आज जोडीदारासाठी एखादे सरप्राईज गिफ्ट आणू शकता. कुटुंबासाठी नवीन लक्झरी वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता.

    हेही वाचा – आस्तिक आणि नास्तिक

    वृश्चिक – आजचा दिवस तुम्हाला अनपेक्षित फायदे देईल. अचानक होणारा आर्थिक लाभ तुम्हाला प्रचंड आनंद देईल. तुमच्या बढतीबद्दल आज चर्चा होण्याची शक्यता आहे. तथापि, शब्द जपून वापरा, अन्यथा वरिष्ठांसोबतचे संबंध ताणले जाऊ शकतात. गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. तुमची राजकीय प्रतिमा आणखी उजळून निघेल.

    धनु – घाईघाईने निर्णय घेण्याचे शक्यतो टाळा. शांतपणे, विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. कोणाच्या तरी सल्ल्याने कोणतीही गुंतवणूक करणे टाळा. कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी अनुभवी व्यक्तींशी सल्लामसलत करा. कुटुंबातील सदस्यांसोबत आज मौजमजा करू शकाल. जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक सहलीला जाऊ शकता.

    मकर – प्रतिकूल परिस्थितीतही संयम राखावा लागेल आणि व्यवसायात कोणतेही बदल काळजीपूर्वक विचार करूनच करावे लागतील. नफ्याच्या दृष्टीने नियोजनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. विरोधक तुम्हाला त्रास देण्यासाठी प्रयत्न करतील, मात्र तुम्ही हुशारीने सहजपणे मात देऊ शकाल. मित्राकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. एखादा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो.

    कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. व्यवसायात नवीन योजना देखील सुरू करू शकता. तुमच्या जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते, म्हणून कोणताही निष्काळजीपणा टाळा, सतर्क राहा. वरिष्ठ सदस्यांसोबत संस्मरणीय क्षण घालवाल.

    मीन – आज तुमच्या सर्जनशील क्षमता प्रबळ असतील आणि कामाच्या शैलीने लोकांना आश्चर्यचकित कराल. कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घ्या. आळस न दाखवता प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कोणाला पैसे उधार दिले असतील तर, त्याच्या वसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. कुटुंबात सुरू असणाऱ्या समस्यांबद्दल वडिलांशी चर्चा कराल.


    दिनविशेष

    आधुनिक ओडिया साहित्याचे एक प्रवर्तक मधुसूदन राव

    टीम अवांतर

    आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक अशी ओळख असणाऱ्या मधुसूदन राव यांचा जन्म 29 जानेवारी 1853 साली पुरी येथे झाला. ओरिसावर मराठ्यांचे राज्य असताना महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली, त्यापैकी एका कुटुंबात मधुसूदन यांचा जन्म झाला. पुरी येथे शिकत असतानाच मधुसूदन यांना राधानाथ राय गुरू म्हणून लाभले. ओडिया काव्यात या गुरुशिष्य जोडीने नव्या युगाचे प्रवर्तन केले. 

    हेही वाचा – भीती… दोन चिमुरड्यांच्या मनातली!

    मधुसूदन हे शिक्षणतज्ज्ञ होते. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. त्यांना बंगाली, हिंदी, संस्कृत, इंग्रजी इत्यादी भाषा चांगल्या अवगत होत्या आणि ओडिया भाषासाहित्याचा तर त्यांचा सखोल व्यासंग होता. महाविद्यालयात शिकत असतानाच मधुसूदन यांनी ब्राह्मो समाजाची दीक्षाही घेतली आणि प्रदीर्घकाल ओरिसात ब्राह्मो समाजाचे नेतृत्व केले. 1907 मध्ये त्यांना ‘रावबहादूर’ हा किताब प्राप्त झाला. त्यांनी इंग्रजीतील तसेच संस्कृतमधील साहित्याची ओडियात अनेक भाषांतरे केली. ही भाषांतरेही मौलिक साहित्य निर्मितीइतकीच सरस उतरली आहेत. चांगल्या शालेय पुस्तकांची ओडियातील उणीव लक्षात घेऊन त्यांनी मुलांसाठी उत्कृष्ट पाठ्यपुस्तके आणि बालवाङ्मय तयार केले.

    मधुसूदन यांना ओडियातील आधुनिक भावगीतांचे  जनक मानले जातात. इंग्रजीतील सुनीत, उद्देशिका (ओड), विलापिका इ. काव्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे ओडियात आणले. त्यांच्या महत्त्वाच्या साहित्यकृती पुढीलप्रमाणे : निबंध – प्रबंधमाला, शिक्षणविषयक – निम्न शिक्षक सुहृद, उच्च शिक्षक सुहृद, शब्दकोश – सुखबोध, काव्य-कर्णबध, बसंतगाथा, कुसुमांजली, नलचरित, उत्कलगाथा. मधुसूदन ग्रंथावलीमध्ये त्यांच्या सर्व काव्यरचना, निवडक गद्य तसेच उत्तररामचरितचा त्यांनी केलेला ओडिया अनुवाद अंतर्भूत आहे. 28 डिसेंबर 1912 रोजी या महान साहित्यिकाचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    By Team AvaantarMay 9, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 19…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 292
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 611
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026
    Most Popular

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.