Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दीपक तांबोळी भाग – 3 कामावरून आलेली तेजलचा पाय, मयूरने टाइल्सवर सांडलेल्या सरबतावरून घसरला आणि ती जोरात कमरेवर आपटली. “आई गंSSS” ती किंचाळली तशी तन्वी धावत आईजवळ गेली. टीपॉयजवळ सांडलेलं सरबत तिला दिसलं, तशी मयूरची आता काही खैर नाही, हे तिच्या लक्षात आलं आणि ती थरथर कापू लागली. तेजलच्या हाताला ते चिकट सरबत लागलं. त्याचवेळी मयूरच्या हातातल्या सरबताच्या ग्लासकडे तिचं लक्ष गेलं आणि आपण कशावरून घसरलो, हे तिच्या लक्षात आलं. संतापाने तिचा चेहरा वाकडा झाला. “कार्ट्या तू सांडलं ना हे सरबत?” तेजल जोरात किंचाळली. ती उठून उभी मयूर घाबरून थरथर कापू लागला. तेजलने समोरची स्टिलची पट्टी उचलली अन् मयूरला डाव्या…
रेवती निलेश पांडे अपूर्ण संध्यासमयी कातरवेळी श्यामनिळाईत भिजल्या यमुनेकाठी सावळ्याची मुरली साद घालीत होती राधेच्या प्रितीसाठी… अशा अवेळी अचानक अनाहून गोष्ट एक घडली मीरेची नजर तेथे रेंगाळणाऱ्या रुख्मिणीवर पडली… कपाळी गळ्यात बोटांत हातात कृष्णाच्या अस्तित्वाच्या खुणा मी कृष्णाची अन् कृष्ण माझा जणू सांगे पुन्हा-पुन्हा… ज्याला क्षणभर मिळवण्याची आस होती तो हिला जन्मभरासाठी मिळावा दैवाने असला खेळ मजसवेच का खेळावा असूया आणि अगतिकतेच्या ऊन-सावलीचा तिच्या नजरेत खेळ रुख्मिणीलाही क्षणभर कळेना ही कशी टाळावी वेळ माझ्या भाळी लावलेल्या कुंकुवाचा हिला का वाटावा हेवा हिने माझ्याच कृष्णाचा का बरे असा ध्यास घ्यावा कसे सांगावे हिला, मी म्हणजे कर्तव्य अन् कृष्ण म्हणजे निळं आकाश…
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर थंडी आता कमी झाली असली तरी, ओपीडीत आल्या आल्या एक आणि तासाभरात अजून एक कॉफी घेण्याची सवय मात्र लगेच चिटकली… तशी ‘गरज’ भासत नसली तरी उगाच चुकल्यासारखं वाटतं आणि निष्कारण ‘कॉफी’ मागवली जाते; शेवटी कॅफीन म्हणजे उत्तेजकच ते… हळूहळू टॅपर केलं की, जाईल सवय! कॅफिन म्हटलं की, अनेकदा मला क्लिव्हलँड आणि तिथले डॉ. क्राईल आठवतात… गोष्ट आहे क्लिव्हलॅंडच्या हिवाळ्यातल्या अशाच एका थंडगार अंधाऱ्या रात्रीची… संपूर्ण शहर रजईत दडपून झोपलं होतं, परंतु इथल्या एका हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरच्या एका माणसाची झोप मात्र उडाली होती… डॉ. जॉर्ज क्राईल… पेशानं शल्यचिकित्सक आणि पेशीनं संशोधक! त्यांच्या डोळ्यांत झोप बिल्कूलच नव्हती; किंबहुना धगधगत…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा । हें असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥121॥ म्हणोनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं । इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा ॥122॥ जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रें नाहीं वाढविली । तेंविं मातें पावोनि ठेलीं । दुरी कर्में ॥123॥ न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय । उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥9॥ आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरूं सैंधवाचा घाटु । तेवीं सकळ कर्मा मीच शेवटु । तें काइ बांधती मातें ॥124॥ धूम्ररजांची पिंजरी । वाजतिया वायूतें जरी होकारी । कां सूर्यबिंबामाघारीं…
दर्शन कुलकर्णी श्री रामदास नवमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नोकरी-व्यवसायात दिवस सामान्य राहील. स्वतःची तुलना इतरांशी करणे टाळा. नेटवर्किंग किंवा जुन्या मित्रांच्या मदतीने नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. यश मिळविण्यासाठी घोकंपट्टी करण्याऐवजी सखोल शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. कौटुंबिक वातावरण शांत आणि सौहार्दपूर्ण राहील. तब्येतीच्या कुरबुरी राहतील. वृषभ – घाईघाईने वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्याऐवजी तुम्ही काळजीपूर्वक नियोजन करून खरेदी केली पाहिजे. आज स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण राहील, मात्र सहकाऱ्यांची मदत मिळेल. सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल. मिथुन – कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मेहनतीची आणि…
डॉ. अस्मिता हवालदार दिवाळी अंक आले की, त्यात सानिया यांची कथा आधी शोधायची आणि वाचायची असा माझा नियम आहे. सानिया सर्वात माझ्या आवडत्या कथालेखिका आहेत. त्यांच्याशी बोलता यावं, म्हणून मी एका कार्यशाळेत भाग घेतला होता, तेव्हा त्यांना विचारलं होतं, “तुमच्या कथेतल्या माणसांची नावं फार छान असतात. अशा नावांची माणसं आपल्या आयुष्यात असावी, असं वाटतं. तर, तुम्ही आधी नावं ठरवता आणि मग कथा लिहिता का?” ज्यांनी सानियांच्या कथा वाचल्या आहेत, त्या सर्वांचा हाच अनुभव असला पाहिजे! त्यांचे बरेच कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक वलय. 2010 साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात नऊ कथा आहेत… लहान, मोठ्या सर्व प्रकारच्या कथा आहेत. त्यातली पात्र…
दिलीप कजगांवकर “बेटा लाडू खातोस का?” हे ऐकून मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न असलेला राज क्षणभर हरवून गेला, कारण त्या आवाजात आईची माया होती… राज इंटरव्ह्यूसाठी ट्रेनने कोल्हापूरहून मुंबईला निघाला होता. त्याच्या समोरील सीटवर बसलेल्या काकूंनी डब्यातून लाडू काढले आणि त्या त्याला विचारत होत्या, “बेटा लाडू खातोस का?” “हो… नको नको,” राज गडबडला. “घे रे पोरा, साजूक तुपाचे आहेत आणि मी स्वतः केले आहेत,” म्हणत अगदी मायेने त्यांनी राजला लाडू दिला. “काकू खूपच छान,” म्हणत राजने दोन लाडू फस्त केले. राजचे नुकतेच लग्न झाले होते आणि तो कोल्हापूरच्या एका छोट्या कंपनीत काम करत होता. मुंबईतील एका मोठ्या कंपनीची जाहिरात होती, काम…
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये कोबीची भाजी, मसालेभात, पालक-पनीर, पुदिन्याचे दही करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : मसाल्याच्या रस्सा भाज्या, सँडविचची चटणी, भाज्यांवरील तवंग आणण्यासाठी… हेही वाचा – Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
स्नेहल अ. गोखले गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरू म्हणजे ज्ञान देणारा, मार्गदर्शक, शिकवणारा… म्हणूनच पंडित विजय बक्षी सरांबद्दल हा लेखप्रपंच… ते जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी, मी त्यांना गुरूसमान मानते. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी लहानांकडूनही गुरुमंत्र घेतला आहे. (उदाहरणार्थ, मुक्ताबाईंकडून चांगदेवांनी गुरुमंत्र घेतला). आपला ‘जिव्हाळा नागरिक संघ’ 2005मध्ये सुरू झाला. तेव्हा असलेल्या लहान रोपट्याला आता वृक्षाचे (70-80 सभासद) रूप आले आहे. तेव्हापासूनच नवनवीन कल्पना घेऊन कार्यक्रम होत असत. त्यामध्ये प्रामुख्याने पंडित बक्षी सर, सुलभाताई कुलकर्णी आणि बाकी सर्वजण कार्यक्रम महिन्यांतील दोन गुरुवारी करत असत. 2007मध्ये पुण्यातील जेष्ठ नागरिकांच्या विविध 36 संघांची देशभक्तीपर…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये । तैसें मज करणें आहे । भूतांचे हें ॥109॥ अगा नगर हें रायें केलें । या म्हणणया साचपण कीर आलें । परि निरुतें पाहतां काय शिणले । रायाचे हात ॥110॥ आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे । मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥111॥ तरि स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता । कीं स्वप्नामाजीं असतां । प्रवासु होय ॥112॥ या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं । मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थु ॥113॥ जैशी रायें अधिष्ठिली प्रजा…

