Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : कर्पूर चंदन अगरु, ऐसेया सुगंधाचा महामेरु…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : कर्पूर चंदन अगरु, ऐसेया सुगंधाचा महामेरु…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 3, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय नववा

    अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी । पुढां चंद्रुही लोपे किरीटी । तेथ खद्योत का हुटहुटी । आपुलेनि तेजें ॥379॥ तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे । तेथ येर प्राकृत हेंदरें । केविं जाणों लाहे ॥380॥ यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकळगुणांचें लोण उतरिजे । संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करूनी ॥381॥

    पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥26॥

    मग निस्सीमभावउल्हासें । मज अर्पावयाचेनि मिसें । फळ आवडे तैसे । भलतयाचें हो ॥382॥ भक्तु माझियाकडे दावी । आणि मा दोन्हीं हात वोडवी । मग देठुं न फेडितां सेवीं । आदरेंशी ॥383॥ पैं गा भक्तीचेनि नांवें । फूल एक मज द्यावें । तें लेखें तरि म्यां तुरंबावें । परि मुखींचि घालीं ॥384॥ हें असो कायसीं फुलें । पानचि एक आवडे तें जाहलें । तें साजुकही न हो सुकलें । भलतैसें ॥385॥ परि सर्वभावें भरलें देखें । आणि भुकेला अमृतें तोखे । तैसें पत्रचि परि तेणें सुखें । आरोगूं लागें ॥386॥ अथवा ऐसेंही एक घडे । जे पालाही परि न जोडे । तरि उदकाचें तंव सांकडें । नव्हेल कीं ॥387॥ तें भलतेथ निमोलें । न जोडितां आहे जोडलें । तेंचि सर्वस्व करूनि अर्पिलें । जेणें मज ॥388॥ तेणें वैकुंठांपासोनि विशाळें । मजलागीं केलीं राउळें । कौस्तुभाहूनि निर्मळें । लेणीं दिधलीं ॥389॥ दुधाचीं शेजारें । क्षीराब्धीऐसीं मनोहरें । मजलागीं अपारें । सृजिलीं तेणें ॥390॥ कर्पूर चंदन अगरु । ऐसेया सुगंधाचा महामेरु । मज हातीं लाविला दिनकरु । दीपमाळे ॥391॥ गरुडासारिखीं वाहनें । मज सुरतरूंचीं उद्याने । कामधेनूंचीं गोधनें । अर्पिलीं तेणें ॥392॥ मज अमृताहूनि सुरसें । बोनीं वोगरिलीं बहुवसें । ऐसा भक्तांचेनि उदकलेशें । परितोषें गा ॥393॥ हें सांगावें काय किरीटी । तुम्हींचि देखिलें आपुलिया दिठी । मी सुदामयाचिया सोडीं गाठीं । पव्हयालागीं ॥394॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जे माझेनि कामें सकाम, जे माझेनि प्रेमें सप्रेम…

    अर्थ

    अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्रसुद्धा नाहीसा होतो, त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या य:कश्चित् प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा? ॥379॥ त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नही, आणि शिवाचे तपही जेथे पुरे पडत नाही, त्या मला (परमात्म्याला) सामान्य आणि अजागळ लोक कसे जाणू शकतील? ॥380॥ याकरिता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे, तसेच संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून द्यावा. ॥381॥

    जो मला पान, फळ, फूल अथवा पाणी भक्तीने अर्पण करतो, त्या शुद्धचित्ताच्या मनुष्याचे भक्तिपूर्वक आणलेले ते (पानफूल इत्यादी) मी सेवन करतो. ॥26॥

    मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण कराण्याच्या निमित्ताने एखादे फळ, वाटेल तसले कसल्याही झाडाचे का असेना! ॥382॥ भक्त माझ्यापुढे ते दाखवितो आणि ते घेण्याकरिता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. ॥383॥ अर्जुना, भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो. ॥384॥ हे राहू दे! फुलाचीच काय गोष्ट आहे? कसल्याही झाडाचे एक पानच का होईना! मग ते ताजेच पाहिजे असे नाही, वाळलेले किंवा कसलेही असले तरी चालेल, ॥385॥ परंतु ते दिलेले पान त्याच्या सर्व प्रेमाने भरलेले आहे, असे (मी) जाणतो आणि भुकेलेला अमृतामुळे जसा संतुष्ट होतो, त्याप्रमाणे ते पानच, परंतु तितक्याच आनंदाने खाऊ लागतो. ॥386॥ अथवा एक वेळ असेही घडले आहे की, पाला खरा, पण तोही मिळाला नाही, मग पाण्याचा तर (कोठे) दुष्काळ नाही ना! ॥387॥ ते पाणी वाटेल तेथे, बिनखर्चाने आणि मिळविण्याचा काही प्रयत्न न करता स्वभावत:च प्राप्त झालेले आहे. तेच आपले सर्व भांडवल समजून ज्याने मला अर्पण केले, ॥388॥ त्याने त्या करण्यात वैकुंठापेक्षा मोठी मंदिरे माझ्याकरिता तयार केली आणि कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नाचे अलंकार मला अर्पण केले. ॥389॥ त्याने क्षीरसागरासारखी मनोवेध दुधाची अनेक शय्यागृहे माझ्याकरिता उत्पन्न केली. ॥390॥ त्याच्या त्या करण्यात कापूर, चंदन, अगरु अशा या सुगंधी पदार्थांचा मेरुएवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होते. त्याने आपल्या हाताने मजकरिता सूर्याला दीपमाळेवर लावले, ॥391॥ त्याने गरुडाच्या सारखी वाहने, कल्पवृक्षांचे बगीचे आणि कामधेनूंचे कळप मला अर्पण केले. ॥392॥ मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ पक्वान्ने त्याने नैवेद्यास दिली. अर्जुना, मी भक्तांच्या थेंबभर पाण्याने याप्रमाणे संतुष्ट होतो. ॥393॥ अर्जुना, हे (तरी) सांगावयास कशास पाहिजे? तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की, मी पोह्यांकरिता सुदामदेवाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या. ॥394॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : करितां तापसांची कडसणी, कवणु जवळां ठेविजैल शूळपाणी…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    By Team AvaantarApril 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा जी आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे जे हे तुझे डोळे । आपुलिया…

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 270
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 388
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 560
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.