Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी महाशिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – पडू आजारी मौज हीच वाटे भारी… दिनविशेष प्रसिद्ध विज्ञाननिष्ठ गॅलिलियो टीम अवांतर प्रायोगिक विज्ञानाचा पाया घालणाऱ्या गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 रोजी इटली येथील पीसा येथे झाला. गॅलिलिओ हे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळेच गॅलिलिओ यांनी पिसा विद्यापीठात प्रवेश घेतला आणि अनिच्छेनेच गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. 1585 साली पैशाभावी त्यांना शिक्षण सोडावे लागले. लंबकाच्या सहाय्याने कालमापन करता येते, हा त्यांनी लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध आहे. 1581 साली त्यांनी एकदा चर्चेमध्ये टांगलेला दिवा हलत असताना त्याच्या आंदोलनांचे निरीक्षण केले…

Read More

डॉ. विवेक वैद्य “डॉक्टर, त्याला लवकर बरे करा. आज त्याचा क्लास बुडला. उद्या शाळा नको बुडायला…” “डॉक्टर, दोन दिवस झाले शाळेत जात नाहीये. त्याच्या टीचर ओरडतील. पाहिजे तर इंजेकशन द्या… उद्या शाळेत्त जायलाच पाहिजे!” “डॉक्टरसाब, कल इसकी युनिट टेस्ट है. कैसा भी कर के खडा करो इसको…” हे संवाद आता माझ्यासाठी नवीन राहिलेले नाहीत. कोणाला या संवादात काही वेगळंही वाटणार नाही. कारण बहुतेकांना वाटले असणार, ही आजारी मुले मोठी असावी. दहावी, बारावीची… किमान आठवीच्या पुढची! …नाही, ही सगळी मुले आहेत, बालवाडी, ज्युनिअर, सीनियर केजी किंवा पहिलीतली! मी कोणी बालरोगतज्ज्ञ नाही शिक्षणतज्ञ् नाही, तरीही काही गोष्टींबाबतीत माझे विचार नक्कीच सांगू शकतो.…

Read More

मागील लेखात नमूद केल्यानुसार आपण योगाभ्यासातील समाविष्ट विषयांच्या अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत या आणि पुढील लेखांत मार्गदर्शन घेणार आहोत. आता आपण ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेऊया. ओंकार साधना म्हणजे काय? सोप्या भाषेत ओंकार साधना म्हणजे ओंकार जप अथवा ओंकार अभ्यास म्हणता येईल. अर्थातच, यथायोग्य ठराविक वेळेस नियमितपणे तसेच सातत्य राखून ओंकार जप करणे, हे ओंकार साधनेत अभिप्रेत आहे. दैनंदिन योगाभ्यासाचा आरंभ त्रिवार ओंकाराने केला जातो आणि समाप्ती एकादश ओंकाराने केली जाते. ओंकाराचे स्वरूप अ + उ + म = ॐ म्हणजे ओम होय. ‘अ’ आणि ‘उ’ हे दोन स्वर आणि ‘म’ हे एक…

Read More

वरी तांदळाची खिचडी प्रकार – 1 साहित्य कृती हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी… वरी तांदळाची खिचडी प्रकार – 2 साहित्य कृती हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो वऱ्याची तांदळाची खिचडी प्रकार – 3 साहित्य कृती (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

सुधीर करंदीकर “14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे” हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे! काही वर्षांपूर्वी हा शब्द आपल्याला माहीतही नव्हता आणि आता तरुणाईकरिता व्हॅलेंटाइन डे हा अगदी महत्त्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात की, हा परदेशी सण आहे.  आपण का म्हणून साजरा करायचा? आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा की, नाही? याकरिता हे माहिती करून घेणे जरुरी आहे की, व्हॅलेंटाईनचा काय अर्थ आहे, आणि  व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय?  व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण म्हणजे जन्मस्थान आहे, इटलीमधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे… हे रोममध्ये…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु । मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥157॥ मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु । मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥158॥ मज अमेया मान । सर्वगतासी स्थान । जैसें सेजेमाजी वन । निदेला देखे ॥159॥ तैसें अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र । अगोत्रा गोत्र । अरूपा रूप ॥160॥ मज अव्यक्तासि व्यक्ती । अनार्तासी आर्ती । स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥161॥ मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण । मज सकळकारणा कारण । देखती ते ॥162॥ मज सहजातें करिती । स्वंयभातें प्रतिष्ठिती । निरंतराते आव्हानिती । विसर्जिती गा ॥163॥ मी…

Read More

दर्शन कुलकर्णी शनिप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसायात नफा होईल. समाजातील तुमच्या कीर्ति, मानसन्मानात वाढ होईल. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल. नोकरदारांना कामाचा ताण असेल, मात्र सहकाऱ्यांच्या वर्तनामुळे निराश व्हाल. आहाराची काळजी घ्या, अन्यथा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आज जोडीदाराचे आरोग्य देखील चिंतेचे कारण  बनेल. वृषभ – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. तुमच्या मेहनतीमुळे व्यवसायात चांगला नफा होईल. कुटुंब आणि मित्रांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. नियोजनानुसार काम केले तर यश मिळेल. आज तुम्हाला आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. वाहन चालवताना, वेगावर नियंत्रण ठेवावे. शक्य असल्यास प्रवास…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 2 बारावीची परीक्षा संपली, आता रिझल्ट लागायला वेळ होता. आता मी अठरा वर्षांचा झालो होतो. चार दिवसांनी रामनवमी होती. मला विजयाला भेटण्याची ओढ होती. सरू मावशीने रामनवमीला येण्याच्या दिलेल्या आमंत्रणाची आठवण होती. मुंबईहून माझा आतेभाऊ अमर पण सुट्टीत आला. त्याची माझी लहानपणापासूनची गट्टी. तो आल्यावर मी त्याला म्हटले, सरू मावशीच्या गावी रामनवमीला जाऊया. तो पण खूश झाला. आईबाबांची परवानगी घेतली आणि आम्ही एसटीने रामनवमी दिवशी त्यांच्या गावी गेलो. लहानसे गाव ते. पण रामनवमीला होणाऱ्या जत्रेमुळे माणसांनी फुलले होते. गावभर पताका लागल्या होत्या. रस्ते, पायवाटा पाणी मारून शेणाने सारवले होते. बाहेरील अनेक दुकानदार आपआपली छोटी-मोठी दुकाने थाटून…

Read More

भाग – 12 सुमित्रा आजी आराध्याला आपल्या सोबत नेत होती. आराध्या थोडं आश्चर्यचकित झाली. तिच्या आयुष्यात एवढ्या सहजतेनं कोणीतरी तिचा हात धरून नवं दार उघडून देईल, असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या मनातलं गोंधळ, भीती आणि आतापर्यंतचा तिरस्कार… काही क्षणांसाठी तरी मागं सरकला होता. आता तिचं आयुष्य एका नव्या दिशेकडे वळत होतं — गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली! आराध्या तिच्या मनातला गोंधळ लपवत आजीकडे परत जाते, पण तिचं लक्ष अजूनही त्या जाणिवेवरच फिरत होतं. सुमित्रा आजी तिला आतल्या एका विस्तृत, शांत खोलीत घेऊन जातात. खोलीत भिंतींवर काही सुंदर चित्रं लावलेली असतात — काही ध्यानस्थ योगी, काही मंदिरांचे दृश्य… आणि एक अत्यंत वेधक चित्र —…

Read More

प्रणाली मंगेश महाशब्दे खरंतर, अबोला या शब्दाचा अर्थ रुसवा किंवा द्वेष या कारणांमुळे एकमेकांशी न बोलणे असा होतो. काही वेळेस हा अबोला क्षणिक किंवा लटका असतो तर, काही वेळेस मात्र हा अबोला खूप दिवस चालणारा असतो. नातं कोणतेही असो प्रत्येकानेच अबोला हा अनुभवलेला असतो. नातं जितकं जवळचं तितका अबोला हा नेहमीचाच ठरलेला असतो. प्रत्येक नात्यामधील अबोल्याचा काळ हा त्या नात्यातील जवळीकीवर अवलंबून असतो! रुसणे, अबोला धरणे आणि नंतर त्या व्यक्तीला मनवणे यावर तर किती छान-छान गाणी पण आहेत – जसे ‘हा रुसवा सोड सखे… सोड ना अबोला’; ‘का रे दुरावा का रे अबोला… ‘, ‘सजणा कशासी अबोला…’, ‘अबोल प्रीत बहरली…’…

Read More