Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आजींनी नव्या तरुणाईचे टोचले कान
    ललित

    आजींनी नव्या तरुणाईचे टोचले कान

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 6, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, गावातील लग्नकार्य, आधुनिक मुलींची विचारसरणी, दागिन्यांचे महत्त्व, दागिन्यांमागील विज्ञान, दागिन्यांमागील वैज्ञानिक कारण, दागिने आणि शरीरशास्त्र, दागिने आणि आरोग्य,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रणाली मंगेश महाशब्दे

    आज गावी एका लग्नाला जाण्याचा योग आला. खूप दिवसांनी असे लग्न होत होते… असे म्हणजे सर्व विधीपूर्वक!

    तुम्ही म्हणाल की, सगळी लग्नं तशीच होतात की! पण खरंच गावाकडील हे लग्न अनेक गोष्टींनी लक्षात राहिले..

    सगळे गाव एक होऊन लग्नाची तयारी करीत होते. घरचंच कार्य असल्यासारखे लहान-मोठे सर्वजण आपापला सहभाग देत होते. कोणताही बडेजाव तेथे नव्हता. कोणतेही प्री-वेडिंग कार्यक्रम तेथे नव्हते. पण सगळेजण खूपच आनंदात होते. मुलीकडील लग्न म्हणजे गावात वऱ्हाड येणार होते. वेशीपासून गावात दुतर्फा कमान घातली होती, रांगोळ्या काढल्या होत्या. गावातील सर्व पुरूष मंडळी ही सगळी बाहेरची कामे बघत होती तर महिला मंडळ सगळे लेकीचे कौतुक करण्यात मग्न होती. (गावात समानतेचे वारे जास्त वाहत नाहीत.)

    नवऱ्या मुलीबरोबर तिच्या मैत्रिणी तसेच इतर मुलींना आजी सगळ्या विधींबद्दल माहिती देत, गप्पा मारत काम करत होत्या. नवरी मुलगी कॅालेजमध्ये शिकायला शहरात काही दिवस होती, त्यामुळे तिच्या तेथील मैत्रिणी पण लग्नाला आल्या होत्या. एकूणच तेथील सगळा कार्यक्रम त्यांना गोंधळच वाटत होता. त्यामुळे त्या सारख्याच त्या कार्यक्रमांना, दागिन्यांना, पेहेरावाला नावे ठेवत होत्या. गावातील सर्व आजी त्या मुलींसाठी फक्त हसण्याचा विषय होता…

    हेही वाचा – मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौन्दर्य संस्कार

    त्या मुली तर त्या आजींना म्हणाल्या पण की, बायका किती शिकत आहेत, मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत आणि तुम्ही हे काय घालत आहात आणि सगळ्यांना तसे घालायला पण का सांगत आहात? त्या आजींनी काही वेळ सगळे ऐकून घेतले नंतर मात्र त्यांनी सगळ्या मुलींना एका ठिकाणी बसवून गप्पा मारायला सुरुवात केली.

    “काय ग पोरींनो काय म्हणत व्हता तुम्ही की, मुली शिकून लय मोठ्या झाल्या मग आता हे असे सगळे दागिने, असे कपडे कशापायी? बरोबर ना?”

    मुली – मग काय तर उगीचच हे एवढे जड-जड दागिने, अवघडल्यासारखे कपडे कशाला हवे? साधं सोपं रहावं…

    आजी – अगं पोरींनो हे दागिनं म्हणजी कुठलेही अवघड काम कसं असेल?

    मुली – मग काय तर कशाला घालायचे हे दागिने? कशाला एवढी खरेदी करायची दागिन्यांची?

    आजी – अगदी बरोबर हाय बघा पोरींनो तुमचं. पण एक सांगा बरं ह्ये दागिनं, ह्यो गजरा, ह्ये कुकू कशापायी लावतो असं वाटतं तुम्हास्नी?

    मुली – पहिल्यापासून करत आला आहात, तुमच्या आजी-पणजी हे करत होत्या म्हणून तुम्हीपण करत आहात. बाकी काय. तुम्हाला कधी हे नको, असे सांगताच आले नाही. आमच्या आई-आजी कशा या सगळ्या गोष्टींना विरोध करतात.

    आजी – अस्सं हाय व्हय, मला सांगा तुम्ही समद्याजणींनी हे असे समदे दागिने तुमच्या आईने, आजीने घातलेले कधी बघितले आहे का?

    मुली – नाही.

    आजी – तुमच्या आई आणि आजीला सारखं काहीना काही दुखतं का?

    मुली – कधी-कधी.

    आजी – बरं मग, आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐका आणि तुमच्या घरी बी सांगा. काय चालंल न्हवं? आता बघा, आम्ही हे सोन्याचे दागिने जे घातले हाय ते समदे शरीराच्या वरच्या भागात आणि चांदीचे दागिने शरीराच्या खालच्या भागात. बरोबर ना!

    मुली – असं का?

    दुसरी आजी – सोन्याचे दागिने उष्ण आणि चांदीचे दागिने थंड असतात. कंबरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि थंडावा नीट राहतो.

    हेही वाचा – अबोला… जास्त किंवा कमी दोन्ही घातकच!

    तिसरी आजी – सोन्याच्या दागिन्यांमुळे शरीराचे तापमान आणि रक्ताभिसरण नियंत्रित रहाते, ताण आणि चिंता कमी करते. तर चांदीच्या दागिन्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

    दुसरी आजी – आता ही नथ. नाकात नथ घातल्याने मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.

    तिसरी आजी – या बांगड्या घासल्या जातात त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. तुमच्या भाषेत सांगायचे तर त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते.

    दुसरी आजी – पायांमध्ये ही जोडवी, त्यामुळे रक्तवाहिनीवर दाब निर्माण होतो. त्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे सुरू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते आणि मासिक पाळी ही नियमित होते. तर, चांदीच्या पैंजणांमुळे पायाचे घर्षण होऊन पायाची हाडं मजबूत होतात.”

    पहिली आजी – हे आम्ही काहीच दागिन्याबद्दल सांगितले. बाकीची माहिती तुम्ही तुमच्या या मोबाइलमध्ये पण बघू शकाल. आता फक्त तुम्ही पोरी लग्न झाल्यावर हे सगळे घालायला लागा अन् मग बगा काय व्हते ते.

    दुसरी आजी – तुमच्या मोबाईलवर 16 शृंगार लिहून बघा, मग समजेल काय महत्त्व आहे ते! तुम्हाला आमी सांगितले तर, ते पटत बी न्हायी की…”

    मुली – खरंच की, हे सगळे आहे की मोबाइलमध्ये! बापरे, केवढ्या गोष्टी माहीत आहेत या सर्वांना!! आजी आम्हाला पण पटले हे सगळे आपल्या betterment साठीच आहे पण आम्हीच त्याला outdated म्हणत होतो. पण आता आम्हीपण हे सगळे घालणार आणि इतरांना पण घालायला सांगणार.

    असे म्हणून सगळेच हसत हसत परत कामाला लागले.

    मोबाइल – 9730020494

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026 ललित

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026 ललित

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    By प्रणाली वैद्यApril 10, 2026

    भाग – 20 “आई, मला बोलावणं आलंय एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला जायला!” ती उत्साहाने ओरडली.…

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 18
    • ललित 547
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.