Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    April 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अवघ्या पंधरा दिवसांत 5 रुपयांचे झाले 500 रुपये!
    ललित

    अवघ्या पंधरा दिवसांत 5 रुपयांचे झाले 500 रुपये!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 5, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, पुण्याचे ट्रॅफिक, म्हशीच्या मदतीने रस्ता क्रॉसिंग, रस्ता क्रॉसिंगसाठी म्हशीची मदत, म्हैस आणि रस्ता क्रॉसिंग, म्हशीसाठी पाच रुपये, पाच रुपयांचा परतावा पाचशे रुपये, फायद्यातील गुंतवणूक, फायद्यातील इन्व्हेस्टमेन्ट, लेखाचे मानधन, ज्येष्ठ नागरिकांचे रस्ता क्रॉसिंग,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुधीर करंदीकर

    आपण सगळेच जण निरनिराळ्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करत असतो, त्यावर कुठे 7 टक्के व्याज मिळते, कुठे 5 टक्के, काही ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे 10 टक्के, हे आपण जाणतोच… आणि जास्तीत जास्त व्याज कुठे मिळेल याकडे आपली कायम नजर असते. मला चक्क एका ठिकाणी पाच रुपये देऊन त्याबद्दल पाचशे रुपये मिळाले आणि ते पण फक्त पंधरा दिवसांमध्ये! आता ते किती टक्के झाले, हे तुम्हीच सांगा.

    जुनी गोष्ट आहे… मी एकदा बावधनला ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करण्याकरिता एका म्हशीची मदत घेतली आणि म्हशीबरोबर अगदी आरामात रस्ता क्रॉस केला आणि त्याकरिता म्हशीच्या मालकाला 5 रुपये दिले… एकदमच वेगळी घटना म्हणून या घटनेवरती मी ‘म्हैस’ हा लेख लिहिला आणि लेख मित्रमंडळींना पाठवला. एका मित्राचा फोन आला की, “लेख खूपच छान आहे, तू ‘लोकसत्ता’ला पाठव म्हणजे तो खूप लोकांपर्यंत पोहोचेल…”

    हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!

    मित्र हे पण म्हणाला की, “लेख पाठवल्यानंतर त्यांच्याकडून ‘लेख मिळाला’ असं उत्तर येईल किंवा उत्तर येणार पण नाही, तसेच लेख छापून येईल किंवा येणार पण नाही. कारण त्यांच्याकडे भरपूर लेखांची आवक जावक असणार. आपण पाठवून बघायचं!”

    मी लगेचच लोकसत्ताचा ई-मेल ॲड्रेस शोधला आणि त्यांच्या ऑफिसला लेख पाठवला आणि चक्क तिसऱ्या दिवशी मला लोकसत्ता ऑफिसमधून फोन आला – ‘म्हैस लेख छानच आहे आणि आम्ही येत्या शनिवारच्या चतुरंगमध्ये तो छापत आहोत’… आणि लेख छापून आला.

    हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…

    खूप ओळखीच्या आणि अनोळखी लोकांचे छान छान अभिप्राय कळवणारे मेसेजेस आले / फोन आले. मजा आली.. आणि त्याच आठवड्यात लोकसत्ताकडून मला म्हैस लेखाबद्दल ५०० रुपयांचे मानधन मिळाले!

    थोडक्यात म्हणजे, ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करण्याकरता म्हशीबरोबरच्या मुलाला मी पाच रुपये दिले, तो अनुभव कागदावर उतरवून मी तो लोकसत्ताकडे पाठवला आणि लोकसत्ताने मला त्याबद्दल पाचशे रुपये दिले… अशा रीतीने पाच रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्यांचे मला पाचशे रुपये मिळाले, आणि ते पण फक्त पंधरा दिवसांमध्ये…!

    आहे की नाही मस्त इन्व्हेस्टमेंट!


    मोबाइल – 9225631100


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026 ललित

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026 ललित

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    By डॉ. विवेक वैद्यApril 22, 2026

    मी, आई आणि बाबा दरवर्षी आठ दिवस सुट्टीमध्ये गावी जातो. मी यावर्षी नववीत गेलो. आमच्या…

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    April 22, 2026

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 275
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 393
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 572
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    April 22, 2026
    Most Popular

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.