Author: Team Avaantar

नितीन अ. गोखले पुण्यातील एका रुग्णालयात माझ्या वडिलांच्या बेडजवळ बसलो होतो. त्यांना स्ट्रोक आल्यावर त्यातून बाहेर येण्यासाठी ते संघर्ष करत होते. माझ्या नजरेसमोरच ते होते. पण त्यावेळी भावनांचा कल्लोळ मनात सुरू होता… एकीकडे असहाय्यतेची भावना आणि दुसरीकडे जुन्या आठवणी. वैद्यकीय उपचारांशिवाय काहीही करू शकत नसल्यामुळे मी हतबल होतो. अशा परीस्थितीत मनात जुन्या आठवणींचे हिंदोळे सुरूच होते. कारण, 81 वर्षीय दादा (कितीही आधुनिकपणा असला तरी त्यांना ‘डॅड’ म्हणू शकत नाही) आणि माझे आजोबा यांच्यात खूप साम्य भासत होते. हेच आठवणींचे हिंदोळे माझे दोन्ही आजोबा, म्हणजे वडिलांचे वडील आणि आईचे वडील, यांच्यापर्यंत पोहोचले आणि मी भूतकाळातच गेलो. सुरुवातीला मला प्रश्न पडला की…

Read More

सुनील पानसरे भाग – 1 माझ्या एक्स्टेंशनची रिंग वाजली. पण ती रिंग नेहेमीची नव्हती. कदाचित बाहेरचा कॉल असावा, असं म्हणत मी तो उचलला. सरदेसाई सर? लँडलाईनवरून? मी विचार करत होतो की, त्यांना का बरं मला लँडलाईनवर कॉल करावा लागला असेल! सर, माझे पूर्वाश्रमीचे सहकारी आहेत. फोनवर बोलताना ते गंभीर वाटत होते, त्यामुळे मी त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली. त्यांच्या एका वृद्ध मित्राचा, श्री. स्वामी यांचा, मागील चार दिवसांपासून काहीच मागमूस नव्हता. त्यांचा फोन पण वाजून वाजून बंद झाला होता बहुतेक त्याच दुपारी. सरदेसाई सरांना वाटलं की, कदाचित स्वामी यांचं घर माझ्या जुन्या घराजवळच असावं (मला नंतर समजलं की, त्यांचं…

Read More

संगीता भिडे (कमल महाबळ) ‘संस्कार’ या शब्दाचा एक अर्थ कृती करून घेणे असा आहे, तर दुसरा अर्थ हिंदू धर्मानुसार गर्भाधानापासून व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत जे अनेक विधी केले जातात त्यातील प्रत्येक विधी म्हणजे संस्कार. उदा. नामकरण, उपनयन, विवाह बंधन, अंत्यसंस्कार इत्यादी. प्रस्तुत विषयाचा विचार करता स्त्रियांना हे सर्व धर्मसंस्कार असावेत की, नसावेत हा विचार मला इथे अजिबात अभिप्रेत नाही. माझ्यापुरतं बोलायचं तर, मी स्वतः पोथीनिष्ठ धर्मसंस्कार अजिबात मानत नाही, कारण, या धर्मानं प्रश्न सुटले आहेत, असं आजवरच्या इतिहासात तरी घडलेलं नाही. तसं घडलं असतं तर, दोन भिन्न धर्मात युद्ध पेटलं नसतं, एकच धर्माच्या छत्राखाली राहणारी, एकाच कुळात जन्मलेली माणसं एकमेकांविरुद्ध दंड थोपटून…

Read More

मंदार अनंत पाटील साधारण जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात आईने प्रथमच आपणहून विचारणा केली गेली की, माझा व्हिसा कधी करशील? व्हिसा तयार झाल्यावर आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे प्रकाश बापट आणि मिसेस अश्विनी बापट यांची लंडन ट्रिप ठरली आणि आम्ही सुटकेचा श्वास टाकला. कारण, आई अगदी घरच्या लोकांबरोबर अगदी डोअर टू डोअर येणार होती. मग क्षणाचाही विलंब न करता तिचे विमानाचे तिकीट बुक केले. आई येणार म्हणून घराची रंगरंगोटी करून घेतली आणि आईला आम्ही कामावर गेल्यावर कंटाळा येऊ नये म्हणून पुस्तक आणि मराठी चॅनलही लावून घेतली. दोन्ही बाजूची तयारी अंतिम टप्प्यावर आली होती. भाऊ मनोजने आईकरिता नवीन अँड्रॉइड फोनच घेऊन दिला आणि माणिक…

Read More

मानसी देशपांडे “कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान…” हे मंगलाष्टकाचे सूर म्हणजे वधूसाठी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू, अशा स्वरूपाचे असतात. कारण, अंतरपाट सरला की गळ्यात माळ पडल्यावर अचानक एक नवीन जबाबदारी अंगावर आल्यासारखी वाटते. प्रसिद्ध लेखक व. पु. काळेंनी किती छान म्हटलं आहे, “संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चुल पेटवायची थांबवायचं नसतं. दरी निर्माण झाली म्हणजे आपण खोल जायचं नसतं, तर ती दरी पार करायची असते…” हीच शिकवण प्रत्येक आई मुलीला देतेच. आज अचानक माझ्या मनात एक विचार आला, लग्नात मंगलाष्टकं सुरू असताना तिथे मुलीची आई उपस्थित नसते. का बरं? बहुदा, सनईच्या सुरांनी हृदय गलबलते.…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते. एका माहितीपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने विरार पूर्वेला एका वस्तीत गेले होते. तिथे मला त्या वस्तीची 90 वर्षीय मालकीण सायरा अम्मा भेटली. तिथे राहणाऱ्या तृतीयपंथीयांची ती ‘गुरुमाय’ होती. तीन-चार दिवसांत मी सायरा अम्माची मुलगी झाली होते आणि तिथे राहणाऱ्या तरुण तृतीयपंथीयांची मम्मी! अम्माचे मला नियमितपणे कॉल यायचे. माझी चौकशी करण्यासाठी… किती ते प्रेम! मी जमेल तशी वस्तीत जायची. माहेरवाशिणीला तिची आई वानोळा देते ना, तशी अम्मा मला पिशव्या भरून कांदे, बटाटे, भाज्या, ड्राय फिश अगदी भरभरून द्यायची. सायरा अम्माकडे दरवर्षी ‘नियाज़’ केला जायचा. 100 किलो तांदूळ, 100 किलो मटण अशी बिर्याणी बनायची. शाकाहारी लोकांसाठी 100 किलो रव्याचा…

Read More

मंदार अनंत पाटील परळ येथील प्राण्यांच्या इस्पितळात रीगलला गेल्यावर कळले की, जेनेटिक दोषामुळे त्याला जलोदराचा कॅन्सर झाला आहे आणि काहीही खाल्लेले रक्ताऐवजी पाण्यात रुपांतरित होते. एकदा ऑपरेशन करून पाणी काढले गेले, पण परत काही दिवसांत तीच स्थिती उद्भवली. त्याला शरीर साथ देत नव्हते. रीगलचे हाल बघवत नव्हते. शेवटी मनावर दगड ठेवून वडील आणि वेटच्या मतानुसार रीगलला दयामरण दिले गेले. 21 फेब्रुवारी 1991ला जन्मलेला माझा अतिशय जीवलग मित्र फक्त दीड वर्ष जगला; पण जाताना मला अतिशय गोड आणि शेवटपर्यंत पुरतील अशा खूप आठवणींची शिदोरी देऊन गेला. आज देखील जवळ-जवळ 33 वर्षांनी त्याची ह्रदयस्पर्शी आठवण लिहिताना डोळे अजूनही डबडबले आहेत आणि हुंदका…

Read More

आराधना जोशी 28 मे 1996… माझी TYBA च्या परीक्षेची तयारी सुरू होती. अवघ्या दोन दिवसांवर पहिला पेपर येऊन ठेपला होता… आणि त्याच दिवशी केंद्र सरकारवरील अविश्वास दर्शक प्रस्तावावर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी संसदेत उत्तर देत होते. परीक्षेचा ताण असूनही केवळ अटलजींच्या संयमित, कणखर भाषणामुळे तो संपूर्ण दिवस अभ्यास सोडून टीव्हीसमोर बसून होते. अटलजींच्या भाषणाची जादू तेव्हा पहिल्यांदा कळली आणि त्याबरोबरच राजकारणी असेही असू शकतात, हे समजलं. त्याच काळात पत्रकार होण्याचे विचार पक्के होत गेले. वृत्तपत्रांचं वाचन अधिक गंभीरतेने सुरू झालं. राजकारण, समाजकारण आणि संबंधित विषयांबाबत काही मते बनत होती, काही पूर्वग्रह दूर होत गेले. त्यानंतर 1998 साली वाजपेयी सरकार केंद्रात…

Read More

दिप्ती चौधरी आमचं बंगलोर प्रस्थान रहित झाले! आम्हाला पुन्हा आमच्या मुंबईच्या सोसायटीत आणून सोडले आणि एक महिन्याने परत प्रयत्न करू, असे ठरले. आम्हाला पुन्हा आणून सोडल्यानंतर दोन दिवस आम्ही गायबच झालो. कुठे घाबरून पळून गेलो का, या कल्पनेने साऱ्यांचे धाबे दणाणले होते. पण आम्ही परतून आलो आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. एक महिन्याने आमच्या प्रस्थानाचा दिवस ठरवला. आता आम्हाला पकडून सरळ बंगलोर गाठायचे होते. सकाळी दूध प्यायला आल्यानंतर मी अलगद डिंपल आंटीच्या हातात सापडलो. तिने रात्रीच माझा पिंजरा तिच्या घरी आणून ठेवला होता. आमचे पिंजरे खूप आधीपासून आणून आम्हाला खेळायला दिले होते, त्यामुळे त्यात आमचा वास येत होता आणि सवयीचाही…

Read More

अद्वैत छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मराठी माणसाचं रक्त उसळतंय आणि हा चित्रपट बॉलीवूडचा असल्यामुळे तो जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचतोय. मी हा चित्रपट अजून पहिलेला नाही, पण लोकांचा प्रतिसाद बघून आणि त्याची प्रशंसा ऐकून मी तो कदाचित लवकरच बघेन. हिंदू वीरांचा इतिहास समजायचा एकमेव मार्ग जर आता बॉलीवूडचे चित्रपट असतील, तर ते सत्य कदाचित स्वीकारायला हवे. हे सत्य भारताच्या फाजील शिक्षणव्यवस्थेचं प्रतिबिंब आहे, पण हा लेख त्या घसरत्या शिक्षणव्यवस्थेबद्दल नाही, त्यामुळे हा विषय आता नको. मी लहानपणी जेव्हा पन्हाळगड बघायला जायचो आणि औरंगजेबाच्या क्रूरतेच्या गोष्टी ऐकायचो, तेव्हा माझं रक्त उसळून यायचं. औरंगजेबाने संभाजी महाराजांवर केलेल्या अतिरेकी जुलमानंतर, मी…

Read More