दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 16 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 06 जून 2025
वार : शुक्रवार
तिथि : एकादशी 28:47
नक्षत्र : हस्त 06:33
योग : व्यतिपात 10:13
करण : वणीज 15:33
सूर्य : वृषभ
चंद्र : कन्या 20:05
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:14
पक्ष : शुक्ल पक्ष
मास : ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – घरासाठी खरेदी केल्याने आर्थिक चिंता वाटणं स्वाभाविक आहे, मात्र या खरेदीमुळे भविष्यातील बऱ्याच समस्या सुटणार आहेत. मुलांवरील अनावश्यक ताण दूर करण्याचा प्रयत्न करा.
वृषभ – कुठल्याही गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करा. नवीन योजना, प्रकल्प याविषयी पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही.
मिथुन – वाहन चालविताना, विशेषतः वळणावर काळजी घ्या. दुसऱ्यांचा निष्काळजीपणा अडचणी निर्माण करू शकतो. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण व्यतीत कराल. दृढ निश्चय आणि कामातील कौशल्य याची दखल घेतली जाईल.
कर्क – स्वत:च स्वत:चे डॉक्टर बनून औषधोपचार करू नका. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कुटुंबीयांच्या गरजांना प्राथमिकता द्या.
सिंह – प्रकृती चांगली राहील. लोकांना नेमके काय हवे आहे, हे समजून घ्या. सहकाऱ्यांकडून काय अपेक्षित आहे, हेही समजावून सांगा. आज खर्च करताना उधळपट्टी करू नका.
कन्या – कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. एकमेकांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. समस्या चारचौघांमध्ये मांडू नका, अन्यथा बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे.
तुळ – मित्रांसोबत पार्टीचा आनंद लुटून शकता. आर्थिक बाजू आज भक्कम असेल. मात्र ऑफिसमध्ये कामात फारशी कोणाची मदत मिळणार नाही. कोणीतरी जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो, त्यामुळे सावध रहा.
वृश्चिक – स्वप्न साकार होईल. मात्र उत्साहावर थोडेसे नियंत्रण ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. भूतकाळातील कुणीतरी खास व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल. त्यामुळे तुमचा आजचा दिवस संस्मरणीय ठरेल.
धनु – अनावश्यक वस्तूंवर पैसे खर्च करून जोडीदाराची नाराजी ओढावून घेण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण डोकं शांत ठेवून काम करणे गरजेचे आहे.
मकर – अतिउत्साह आणि टोकाची महत्वाकांक्षा यामुळे चिंतेत पडाल. हे टाळण्यासाठी भावनांवर नियंत्रण ठेवा. अतिरिक्त पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवा.
कुंभ – आरोग्याची काळजी घ्या. अनपेक्षितरित्या खर्चात झालेली वाढ चिंता वाढवेल. मात्र, गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे संपूर्ण दिवस आनंदात जाईल.
मीन – खर्च करा, पण उधळपट्टी करू नका. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच सर्वोत्तम उपाय असेल. कुणा अनुभवी व्यक्तीशी समस्येबद्दल चर्चा करा.
दिनविशेष
शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड
युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 शिवराज्यभिषेक सोहळ्याचा विधी पार पडला. या दिवशी पहाटे मंत्रोच्चारांच्या गजरात महाराज शुचिर्भूत झाले. त्यानंतर कुलदैवतेचे स्मरण करून, राज्याभिषेकाच्या मुख्य विधींना सुरूवात करण्यात आली. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मुख्य पुरोहित गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांनी याप्रसंगी महाराजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून त्यांचा उल्लेख केला. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. या राज्याभिषेकासाठी भारतभरातील विविध पवित्र नद्यांमधून पाणी आणले होते. या सोहळ्यासाठी देशभरातून अनेक अतिथी उपस्थित होते. जवळपास लाखभर लोक शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जमा झाले होते. या सर्व मान्यवरांची चार महिने राहण्याची उत्तम व्यवस्था रायगडावर करण्यात आली होती. राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता अशा सर्वांनाच या खास दिनासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली.