Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 7, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 07 ऑगस्ट 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 16 श्रावण शके 1948; तिथि : नवमी 16:37; नक्षत्र : कृत्तिका 18:43;
    • योग : वृद्धि 12:10; करण : वणिज 27:20;
    • सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामिनाथन

    टीम अवांतर

    भारतातील महान कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम येथे झाला.  त्यांचे पूर्ण नाव होते मनकोम्बू सांबशिवन स्वामीनाथन. कुंभकोणममधील नेटिव्ह हायस्कूल आणि लिट्ल फ्लॉवर स्कूल या शाळांमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले. 1940 साली ते त्यावेळचे त्रिवेंद्रम् आणि आताचे तिरूअनंतपुरम येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आले. प्राणिशास्त्र विषयातील बी.एसस्सी. ही पदवी त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेजमधून मिळविली. ही त्यांची पहिली पदवी होती. याच काळात बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाने त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि कृषिक्षेत्रातच यापुढे काम करण्याचा विचार त्यांनी पक्का केला आणि कोईम्बतूरच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

    1947 साली ते पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यामुळे उच्च कृषी शिक्षणाची आणि संशोधनाची पुढील दिशा पक्की झाली. याचवेळी भारतीय कृषिसंशोधन संस्थेची साहाय्यक संशोधकाची अभ्यासवृत्तीसुद्धा त्यांना मिळाली. दिल्लीमधील पुसा कृषी संशोधन संस्थेत त्यांचं जनुक शास्त्रांतर्गत उच्च संशोधन सुरू झालं.

    हेही वाचा – चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    1949 साली त्यांना युनेस्कोकडून अधिच्छात्रवृत्ती तर मिळालीच शिवाय नेदरलँडमध्ये त्यांना वॅगेनिजेन कृषी विद्यापीठात वनस्पती-जनुकशास्त्र संशोधनाची संधीही मिळाली. पुढे वर्षभरातच त्यांना इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी.साठी संशोधन पाठ्यवृत्ती मिळाली. पी.एच.डी.साठी त्यांचे मार्गदर्शक होते, डॉ. एच.डब्ल्यू. हॉवर्ड. 1952 साली जनुकशास्त्राच्या आधारे बटाट्याच्या नव्या वाणाची निर्मिती करण्यावरचं त्यांचं संशोधन यशस्वी ठरले आणि त्यांना पदवीही मिळाली.

    1952 साली अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात त्यांना संशोधकपदाची नोकरी मिळाली. तिथेही त्यांचं बटाट्याविषयीचं पुढील संशोधन लोकप्रिय झालं. बर्फाळ हवामानात टिकून राहाणार्‍या अलास्का फ्रॉस्टलेस या नव्या वाणाची त्यांनी निर्मिती केली. मात्र बटाटा संशोधनाचं त्यांचं पर्व इथेच संपुष्टात आलं कारण 1954 मध्ये त्यांना भारतासमोरील अन्न समस्यांनी बेचैन केलं होतं.

    1954 मध्ये भारतात परत आल्यावर त्यांची नेमणूक ओरिसातील केंद्रीय भातसंशोधन संस्थेत वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून झाली. भाताच्या सुधारित वाणांच्या निर्मितीसाठी त्यांचं संशोधन सुरू झालं. आयात केलेल्या जपानी वाणांशी संकरित पद्धतीने निर्माण केलेले वाण कसोटीला उतरले नाही. म्हणून त्यांनी भारतीय प्रचलित वाणांचे नमुने देशभरातून मिळविले. त्यांचा संग्रह केला. पाणथळ भागापासून ते दुष्काळी प्रदेशातही टिकून राहणारे नवे कणखर वाण निर्माण करण्यासाठी त्यांच्या संशोधनाला गतिमान दिशा त्यामुळेच मिळाली.

    हेच मूलभूत तंत्रज्ञान पुढे गव्हावरच्या हरितक्रांतीसाठी वापरून त्यांनी ती यशस्वी केली. 1957-58 साली भारताला हरित क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं. त्याचप्रमाणे पंतनगर आणि लुधियाना येथे कृषी विद्यापीठे स्थापन झाली. अखिल भारतीय पातळीवर विविध पिकांसाठी समन्वयित प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. मोठ्या प्रमाणात गहू, भात, ज्वारी, बाजरी, मका यांच्या संकरीत आणि उन्नत वाणांची देवाणघेवाण झाली आणि 1971 मध्ये भारतात हरितक्रांती झाली.

    1969 साली डॉ. स्वामिनाथन भारतीय कृषि-संशोधन संस्थेत (नवी दिल्ली) वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख झाले. 1966 साली तेथेच ते संचालकही झाले. 1981 च्या सुमारास डॉ. स्वामिनाथन ग्रामीण आरोग्य, आणि विशेषत: कुष्ठरोग निर्मूलन यांवरील कामाकडेही लक्ष देत होते. याच वेळी फिलिपाइन्समधील लॉसबेनॉस येथील आंतरराष्ट्रीय भात-संशोधन संस्थेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली. भारत, चीन, जपान, फिलिपाइन्स या आशिया खंडातील भात कोठारांमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या देशांचं भात-उत्पादन वाढीसाठी आंतरराष्ट्रीय नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. 1988 मध्ये भारतात परतल्यावर चेन्नई  येथे एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची स्थापना त्यांनी केली.

    फिलिपाइन्सच्या अध्यक्षा कॉरझन अ‍ॅक्विनो यांनी 1987 मध्ये डॉ. स्वामिनाथन यांना ‘प्रेसिडेन्शीयल गोल्डन हार्ट’ हा सर्वोच्च सन्मान बहाल केला. 1999 मध्ये टाईम साप्ताहिकाने आशियावर प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्त्व असा त्यांचा प्रशंसनीय उल्लेख केला. 1987 साली त्यांना स्मिथसोनिया इन्स्टिट्यूट, वॉशिंग्टन डी.सी. येथे वर्ल्ड फूड प्राइझ देऊन गौरविले गेले. याशिवाय भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, शांति स्वरूप भटनागर पुरस्कार, अल्बर्ट आईन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भारतातील 33 विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन गौरविले. 28 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक होईल. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि आर्थिक बाबींमध्ये नफा होण्याची शक्यता आहे. आरोग्य सामान्य राहील, परंतु नियमितपणे दैनंदिन दिनचर्या पाळणे महत्त्वाचे आहे. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

    वृषभ – कामाच्या ठिकाणी आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. संयमाने आणि समजूतदारपणे काम केल्यास, यश निश्चित आहे. व्यवसायात सुरुवातीला काही अडथळे येऊ शकतात, मात्र नफा देखील होईल. नोकरदारांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबींमध्ये घाई टाळा, गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सकारात्मक विचार तुम्हाला तणावापासून दूर ठेवतील. एकंदरीत दिवस चांगला जाईल.

    मिथुन – आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारा असा आजचा दिवस आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाकडे विशेष लक्ष द्या, कारण विरोधक सक्रिय असू शकतात. व्यवसायात फायदेशीर संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.  आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती घ्या. संयम आणि समजूतदारपणाने पुढे जा.

    कर्क – नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी आज तुमची वाट पाहत आहेत. एखादा महत्त्वाचा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, परंतु राग आणि अहंकार टाळणे महत्त्वाचे आहे. आरोग्य चांगले राहील,  मनःशांती टिकून राहील. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.

    सिंह – मित्र आणि सहकाऱ्यांच्या मदतीने आज अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. पूर्वी आखलेल्या योजना यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या आणि व्यवसायाच्या नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल, मात्र जोखमीच्या गुंतवणुकी टाळणे उत्तम. वाहन चालवताना काळजी घ्या. दिवसभर सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. आत्मविश्वासाने हाती घेतलेली कामे यशस्वी होतील.

    कन्या – कामाच्या ठिकाणी बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. व्यवसायात नफा होईल. संततीसंबंधीच्या चिंता दूर होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल, गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील. आरोग्य चांगले राहील, पण व्यसनांपासून दूर राहा. संध्याकाळी एखादी चांगली बातमी कानावर पडेल.

    तुळ – कामातील अडथळे आज दूर होतील, नवीन एखादी संधी निर्माण होईल. दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे पूर्ण करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थिती मजबूत बनेल. आरोग्य सामान्य राहील, परंतु खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. बाहेरचे खाणे मर्यादित ठेवा. संतुलित दिनचर्या अंगीकारा.

    वृश्चिक – आज व्यवसायात नफा होईल. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. नोकरी करणाऱ्या जातकांवर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. आर्थिक सुस्थिती अधिक मजबूत होईल, त्यामुळे राहणीमान सुधारेल. आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक ताण कमी होईल. एका महत्त्वाच्या कार्यात मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील.

    हेही वाचा – ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    धनु –  बहुतेक महत्त्वाची कामे आज वेळेवर पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल.  संततीच्या संदर्भात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होईल. कामाच्या ठिकाणी प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. आरोग्य सामान्य राहील. वेळेचा सदुपयोग करा. महत्त्वाची कामे पुढे ढकलू नका. सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरेल.

    मकर – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.  आरोग्य चांगले राहील,  मनःशांती टिकून राहील. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. संयम आणि विवेकबुद्धी यामुळे भविष्यात मोठे फायदे मिळतील.

    कुंभ – शुभ कार्यांमध्ये आज यश मिळण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जास्त असेल, पण तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात भरभराट होईल, आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.  आरोग्य सामान्य राहील, पण पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. वेळेच्या योग्य नियोजनामुळे सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

    मीन – कामाच्या ठिकाणी आज नवीन यश मिळेल ज्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. व्यवसायात नफा होईल. आर्थिक बाबतीत संतुलित निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. आरोग्य सामान्य राहील, मात्र नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑगस्ट 2026

    August 5, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 ऑगस्ट 2026

    August 4, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 6, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 ऑगस्ट 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 15…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑगस्ट 2026

    August 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 ऑगस्ट 2026

    August 4, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026

    चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    August 6, 2026

    ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    August 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरार्णवाचिया कल्लोळीं, कंपु नाहीं मंदराचळीं

    August 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 386
    • अवांतर 202
    • आरोग्य 136
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 522
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 245
    • मैत्रीण 24
    • ललित 832
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026

    उमाच्या मनात नवी शंका

    August 6, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.