Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
भाईजान पुणे स्वारगेट बसस्थानकातील तरुणीवरील अतिप्रसंगाच्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी ज्या पद्धतीने स्वारगेट स्थानकातील कोपरन-कोपरा धुंडाळला… स्वच्छता गृह, इतर ठिकाणं, फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घाणीचे साम्रज्य, दारूच्या बाटल्या, प्रवाशांच्या आसन व्यवस्थेची दुरवस्था समोर आणली… तर राज्याचे मंत्री आणि शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अलीकडेच सिडको बसस्थानकाला भेट दिली, त्यांनीही अशीच सर्व ‘हिडन’ स्थळं शोधून, जिथे कोणी साधा फोटो घेत नाही, तिथे मीडियाचे लोक तोंडाला रुमाल लावून कॅमेरे घेऊन गेले. हे सर्व पाहून मी रिपोर्टिंग करत होतो ते दिवस आठवले! माझ्याकडे एसटी बीट होते. तत्कालीन औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानक येथे दर दोन-तीन दिवसांत जाणे व्हायचे. त्यावेळी…
मंदार अनंत पाटील साधारण जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात आईने प्रथमच आपणहून विचारणा केली गेली की, माझा व्हिसा कधी करशील? व्हिसा तयार झाल्यावर आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे प्रकाश बापट आणि मिसेस अश्विनी बापट यांची लंडन ट्रिप ठरली आणि आम्ही सुटकेचा श्वास टाकला. कारण, आई अगदी घरच्या लोकांबरोबर अगदी डोअर टू डोअर येणार होती. मग क्षणाचाही विलंब न करता तिचे विमानाचे तिकीट बुक केले. भाग – 2 आता एकदाची यायची तारीख दिवस आणि वेळ नक्की झाली. आता माझे आणि पल्लवीचे विचारमंथन जोरात सुरू झाले. अगदी बारीक-सारीक गोष्टींचा सखोल आढावा घेऊ लागलो. आई येणार तेव्हाचे लंडनमधील तपमान, आईची तब्येत आणि पथ्य, तिचे रूटिन आणि…
मानसी देशपांडे आजचा लेख हा प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहायचं ठरवलं. म्हटलं रोज वैचारिक, गहन विषयावर लिहितच असते. पण आज जरा हलकाफुलका विषय घेऊन लेखाची सुरुवात करावी. तर आजचा विषय आहे “गजरा…” बघा, नाव वाचता क्षणी एक प्रकारचा सुगंध पसरला नाही का…! आता, गजरा आणि नवरा-बायकोचे नाते याचा फार जवळचा संबंध असतो. आता व.पु. काळे यांनी जसं म्हटलं आहे, “हसतीखेळती बायको, हे केवढं वैभव आहे महाराजा!!” प्रत्येक नवरा-बायकोच्या आयुष्यात या गजऱ्याच्या काही ना काही आठवणी या असतातच. मुलगी जेव्हा कोणत्याही समारंभात सजून-धजून जाते तेव्हा साडीबरोबरच तिच्या सौंदर्यात भर घालतो तो गजरा. त्यात तो गजरा जर जोडीदाराने आणलेला असेल तर, ते…
अर्चना कुलकर्णी दुपारी चार वाजता राऊंड घेऊन मी माझ्या केबिनकडे वळले. केबिनच्या बाहेर एक गृहस्थ माझी वाट पाहत उभे होते; मला पाहताच त्यांनी हसून नमस्कार केला. मी देखील हसून नमस्कार केला, चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. चालता चालताच मी त्यांना म्हटलं, “या.” “थँक्यू,” असं म्हणत ते केबिनमध्ये आले. मी त्यांना खुर्चीत बसण्याची विनंती केली. खुर्चीत बसल्यावर ते बोलू लागले, “मी चंद्रकांत देशपांडे. अकरावीतला अनीश देशपांडे माझा मुलगा.” “अच्छा आपण अनीशचे वडील..!” “हो, आज ऑफिसमधून लवकर घरी जात होतो. तुम्हाला भेटायला मुद्दाम आलो.” ते उत्साहाने बोलत होते. “अनीश तुमच्या कॉलेजमध्ये रमला आहे. त्याला मार्क्सदेखील चांगले मिळाले आहेत, पहिल्या सत्रातल्या परीक्षेत. मुख्य म्हणजे…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! अजून नवीन लिखाण घेऊन तुमच्यासाठी हजर होतेय. देवाने किडे, मुंग्या, पक्षी, प्राणी, फुले, फळे, मानव या सगळ्यांची निर्मिती केली. मानवाची निर्मिती जरा जास्तच मन लावून केली. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसक लिंगी अशी वर्गवारी झाली. नपुसक लिंगीच्या वाट्याला खूपच अवहेलना आली. Correct, हाच आजचा विषय. हिजडा, छक्का, two in one, अर्धनारी नटेश्वर… सतत काहीबाही बोलून त्यांना त्रासच दिला गेला. आज उलगडूया त्यांची कहाणी! एकेदिवशी कॉल आला. ताई एक फिल्म करतोय. कदाचित शॉर्टफिल्म म्हणा किंवा माहितीपट. तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर आहे. त्यांच्या वस्तीमध्येच शूट करायचंय. फिल्म कराल का? थोडीशी चलबिचल झाली. तृतीयपंथीयांच्या वस्तीत जाऊन शूट करायचं? भीती सुद्धा वाटली. पण विषय,…
मंदार अनंत पाटील पिल्लू विकत घेऊन आम्ही सरळ टॅक्सी करून घरी येत होतो. आईने सहजच विचारले की, याचे नाव काय ठेवणार आहेस? नेमकी आमची टॅक्सी त्यावेळेस रीगल थिएटरवरून जात होती आणि माझ्या तोंडातून ‘रीगल’ नाव बाहेर पडले. पिल्लानेही मला लगेच प्रतिसाद दिला आणि आमचा ‘रीगल मंदार पाटील’ आमच्या घरी आला. पहिल्या दिवशी मी रीगलला घेऊन किचनमध्येच झोपलो. थोड्या कुरूबुरीनंतर तो पण माझ्या कुशीत येऊन जो पहुडला तो थेट सकाळीच उठला. मग सुरू झाला एक नि:स्वार्थी, अतिशय प्रेमळ आणि विलक्षण लाघवी सहवास… जणू काही माझी सावलीच बनून राहिला माझा रीगल… त्याच्या त्या करामती, सारखे माझ्याभोवतीच घुटमळणे, माझ्यावर सतत लक्ष ठेवून असणे…
आराधना जोशी 2003चा एप्रिल महिना… अवघ्या काही दिवसांवर त्यावेळच्या अल्फा मराठी आणि आता झी मराठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहिनीवर दुपारी Live phone in program सुरू होणार होता. त्यासाठी कार्यक्रमाची EP अर्थात executive producer सुषमा पार्टेबरोबर कार्यक्रमाची रुपरेषा कशी असेल? कोणकोणते विषय घेता येतील? त्यासाठी कोणकोणते तज्ज्ञ बोलावता येतील? याबरोबरच कार्यक्रमाच्या Dry runs सुरू झाल्या होत्या. अचानक एका मिटिंगमध्ये सुषमाने आपण या कार्यक्रमाला सुलोचना दिदींना बोलावलं तर? असा प्रस्ताव मांडला. नुसता प्रस्ताव मांडून ती थांबली नाही तर, लगेच दिदींच्या घरी फोन करून कांचनताईंशी (सुलोचना दिदींची मुलगी) बोलून दिदींना भेटायची तारीख आणि वेळही नक्की केली. त्याप्रमाणे सुषमा, मी आणि या कार्यक्रमाशी निगडीत…
दिप्ती चौधरी आम्हाला बंगलोरला घेऊन जायचा निर्णय पक्का झाला; पण आणायाचे कसे? हा मोठा प्रश्न होता. प्राण्यांच्या प्रवासासाठी अनेक एजन्सी आहेत, जे घरातून उचलून नवीन ठिकाणी दारात आणून देतात. पण त्यांची एकच अट प्राणी पिंजऱ्यात घालून सुपूर्द करा आणि आमची तिथेच गोची होती! आम्ही आझाद परिंदे! कधी कुठे असू याचा काय भरवसा? बरं, मुंबई ते बंगलोर प्रवास करायचा तर आगाऊ बुकिंग केलेच पाहिजे. पण त्या दिवसाचा भरवसा देणार कोण? एकदा आवाजच्या कार्यकर्त्यांशी बोलताना आईने ही अडचण सांगितली. अगदी सहजपणे तिने सांगितले, “त्यात काय कठीण आम्ही आणून देऊ की! आमची टीम पकडण्यात एकदम माहीर आहे.. त्यांना पकडू डॉक्टरकडे नेऊन check up,…
शरद महाबळ अचानकपणे मुंबईतील एका वास्तूला भेट देण्याचा योग आला. जेमतेम 48 तासांच्या सहवासात आम्हा उभयतांना जी काही येथे सकारात्मक ऊर्जा मिळाली, त्या प्रेरणेतून मनाच्या गाभाऱ्यात जो हुंकार उमटला, त्यातूनच निर्माण झालेली ही सर्जनशीलता. या दाम्पत्याची थोडी पार्श्वभूमी विशद करतो. दोघांनाही सरितेची उपमा देतो आणि त्या रूपकातून त्यांचा मला उमजलेला जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करतो. या दोन्ही सरिता एकाच गावच्या. आपापल्या परीने आपापल्या जन्मदात्यांच्या संस्कारात वाहात होत्या. तरुण वयात त्यांच्यात नकळतपणे प्रेमाचा अंकुर फुलला… तो व्यक्त झाला आणि दोन्ही घरांतील वरिष्ठांकडून त्याला मंजुरी मिळाली…. आणि मग काय ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…’ दोन्ही सरितांचा संगम होऊन, आपलं गांव सोडून त्या…
मंदार अनंत पाटील मी अगदी गेली 18 वर्षं या क्षणाची वाट बघत होतो, तो क्षण आणि नंतरचे तीन महिने, त्यात साठवलेले अविस्मरणीय क्षण… शब्दांकित करायचा हा एक प्रयत्न! भाग – 1 मनघरणी साधारण जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात आईने प्रथमच आपणहून विचारणा केली गेली की, माझा व्हिसा कधी करशील? आणि आकाशाला गवसणी घातल्याचा भास झाला. कारण काही वर्षांपूर्वीच हा प्रश्न विचारणे मीच बंद केले होते. त्यामागे बरीच कारणे होती आणि मुख्य कारण मोठ्या वहिनींचे आजारपण आणि आईने तिची केलेली सुश्रुषा आणि देखभाल, हेच होते. दुर्दैव असे की, मोठया वहिनीला 2023च्या नोव्हेंबर महिन्यात देवाज्ञा झाली. यानंतर साधारण 2024च्या फेब्रुवारी महिन्यात भारत भेटीचा…

