दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 17 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 07 जून 2025
वार : शनिवार
तिथि : द्वादशी अहोरात्र
नक्षत्र : चित्रा 09:39
योग : वरीयन 11:16
करण : बव 18.03
सूर्य : वृषभ
चंद्र : तुला
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:14
पक्ष : शुक्ल
मास : ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
भागवत एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष राहील. आर्थिक लाभ होईल. किरकोळ बदलही घराला एक नवा लूक देतील. सभोवताली काय घडत आहे याकडे बारीक लक्ष असू दे.
वृषभ – कलात्मक कामातून आनंद मिळेल. गरजवंताला आर्थिक मदत कराल. कामाचा डोंगर उपसावा लागेल. मात्र तरीही संध्याकाळी मित्रांसोबत वेळ घालवता येईल.
मिथुन – या राशीच्या जातकांना रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पैशांची चणचण जाणवू शकते. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि निरर्थक कामात वेळ घालवणे घातक ठरू शकेल.
कर्क – प्रवास करणार असाल तर सोबतच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. अडीअडचणीला पैसाच कामी येतो, हे लक्षात येईल. आजच्या दिवशी बचतीकडे ओढा अधिक असेल.
सिंह – घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे धन लाभ होऊ शकतो. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्याची इच्छा असेल, मात्र कामामुळे ते शक्य होणार नाही.
कन्या – अत्यंत व्यग्र दिवस असेल. आरोग्य चांगले राहील. जवळच्या व्यक्तीसोबत कोणत्या मुद्द्यांवरून वाद असेल तर, तो परस्पर संमतीने सोडवण्यासाठी पुढाकार घ्या. आर्थिक लाभाचा दिवस.
तुळ – आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. ज्यांची मदत घेऊ शकता, अशा लोकांची अवश्य मदत घ्या. यामुळे कामाचा ताण कमी होईल. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम दिवस.
वृश्चिक – उघड्यावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या. मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. धनलाभ होईल, पण त्याच्या जोडीला दानधर्मही करण्याची इच्छा असेल.
धनु – कोर्टात संपत्तीशी निगडीत खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा. धार्मिक कार्यातून मानसिक शांतता मिळेल.
मकर – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धावपळीमुळे आज आराम करण्याची इच्छा होईल. मनाला आनंद वाटेल असे छंद जोपासा. कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही त्याच्याशी शालीनतेने वागा.
कुंभ – सकारात्मक विचार करण्याची वृत्ती फलदायी ठरेल. या जातकांनी रिकाम्या वेळेत पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. परिणामी, बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. कुणाला न सांगता आज घरात लहान-मोठ्या पार्टीचे आयोजन करून सर्वांना सुखद धक्का द्याल.
मीन – आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्ही अस्वस्थ असाल. जे लोक शेअर बाजारात पैसे गुंतवतात त्यांना मोठा फटका बसू शकतो. जुन्या मित्रांना भेटण्याचा योग जुळून येईल.
दिनविशेष
जागतिक अन्न सुरक्षा दिन
लोकांना अन्न सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित, पौष्टिक आणि पोटभर अन्न मिळावे हा विचार यामागे आहे. 18 डिसेंबर 2018 रोजी अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने संयुक्त राष्ट्र महासभाने हा दिवस साजरा करण्यास मंजुरी दिली आणि 7 जून 2019 रोजी पहिल्यांदाच हा दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांकडून त्याच्याच दोन संस्था अन्न आणि कृषी संघटना तसेच जागतिक आरोग्य संघटनेला जगभरातील अन्न सुरक्षेला चालना देण्यासाठी नियुक्त केले आहे. सुरक्षित, सकस अन्न मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र अनेक कारणांनी आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या अन्नात असणाऱ्या हानीकारक घटकांमुळे मानवाला जवळपास 200 आजारांना तोंड द्यावे लागते. याशिवाय जगभरात सुरू असणाऱ्या युद्धांमुळे विस्थापितांची होणारी आबाळ हा देखील सध्या संयुक्त राष्ट्रांच्या चिंतेचा विषय आहे.