Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 05 ऑक्टोबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 05 ऑक्टोबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 5, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 05 ऑक्टोबर 2025; वार : रविवार
    • भारतीय सौर : 13 आश्विन शके 1947; तिथि : त्रयोदशी 15:03; नक्षत्र : शततारका 08:00, पूर्वा भाद्रपदा 30:15
    • योग : गंड 16:33; करण : गरज 25:47
    • सूर्य : कन्या; चंद्र : कुंभ 24:45; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:25
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660

    हेही वाचा – …अन् एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद!


    दिनविशेष

    माजी कसोटीपटू माधव आपटे

    टीम अवांतर

    माजी कसोटीपटू माधव लक्ष्मणराव आपटे यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1935 रोजी झाला. ते विल्सन स्कूलमध्ये शिकत असताना साधारणपणे 12 -13 व्या वर्षी पश्चिम रेल्वे ग्राऊंडवर रॉबर्ट मनी हायस्कूलसोबत झालेल्या आंतरशालेय सामन्यामध्ये त्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे दहा विकेट्स घेतल्या होत्या. शालेय क्रिकेटमध्ये सर्व  विकेट घेणारे बहुदा ते पहिलेच असतील. पुढे एल्फिन्स्टन महाविद्यालयात  क्रिकेट प्रशिक्षक विनू मंकड यांना त्यांनी नेटमध्ये पहिल्या चेंडूमध्ये बाद केले. सुरुवातीला लेगब्रेक गोलंदाज म्हणून ते एल्फिन्स्टन कॉलेजमधून खेळत होते. मात्र प्रशिक्षक विनू मंकड यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सलामीला येऊन उत्तम फलंदाजी केली.1951च्या सौराष्ट्रविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी 197 धावा केल्या.  पुढल्याच वर्षी ब्रेबॉर्न स्टेडियमवर पूना कंबाइन विरुद्ध बॉम्बे कंबाइन असा सामना खेळला गेला. त्यावेळी शरद देवधर पूना कंबाइनचे नेतृत्व करत होते. ब्रेबॉर्नवर खेळायला मिळणार म्हणून एक वेगळेपण त्यात होते. त्याचप्रमाणे माधव आपटे नावाच्या कुठल्यातरी मुलाने सामन्यांमध्ये 10 बळी घेतले होते आणि तो आज मुलगा खेळणार आहे, याचीही उत्सुकता अनेकांना होती. योगायोगाने त्या सामन्यामध्ये माधव आपटे यांच्या पहिल्याच चेंडूवर शरद देवधर क्लीन बोल्ड झाले. पुढे माधव आपटे हॅरिस शिल्ड खेळले. नुसते क्रिकेटच नाही तर बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा खेळांमध्येही ते पारंगत होते.  त्यांच्या घरामधील वातावरण खेळाचेच होते आणि खेळाचेच संस्कार त्यांच्यावर झाले. खरंतर, त्यांचा व्यवसाय खूप मोठा होता त्यांच्या वडिलांच्या मिल्स होत्या. त्यांच्या घरी नंदू नाटेकर, विजय मर्चंट यांचे भाऊ उदय मर्चंट हे सकाळी टेनिस खेळण्यास येत असत. माधव आपटे यांना बॅडमिंटनच्या ‘ज्युनिअर चॅपियन’ स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. पण त्यांनी क्रिकेटची साथ सोडली नाही. 1953 साली माधव आपटे यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली. या दौऱ्यात पॉली उम्रीगर यांच्यानंतर जास्त धावा माधव आपटे यांनी केल्या होत्या. मात्र गुणवत्ता असूनही त्यांना जास्त कसोटी सामने खेळता आले नाहीत. कसोटी सामन्यांसाठी त्यांची निवडच झाली नाही. त्याचे कारण त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये दिले आहे. पुढे वयाच्या 34 व्या वर्षी क्रिकेटमधून ते निवृत्त झाले. तरीपण ते फर्स्ट क्लास सामने खेळत राहिले. दि. बा. देवधर ते सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर सामने खेळणारे ते एकमेव क्रिकेटपटू होते. माधवराव आपटे यांनी 7 कसोटी सामन्यांमध्ये 49.27 या सरासरीने 542 धावा केल्या, त्यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतके यांचा समावेश आहे. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 163. तर, 67 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांनी 3 हजार 336 धावा केल्या, त्यामध्ये 10 शतकांचा समावेश आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 165. माधवराव आपटे यांनी क्रिकेट संबंधित अनेक पदांवर काम केले. ‘As luck Would have it’ हे त्यांचे आत्मचरित्रही आहे. 23 सप्टेंबर 2019 रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सकाळी लवकर उठावे

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    By Team AvaantarJune 25, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 जून 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 04…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026

    माझे चुरमुरे खाणे…

    June 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 339
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 466
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 731
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें

    June 25, 2026

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026
    Most Popular

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.