Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
डॉ. सारिका जोगळेकर (होमिओपॅथिक तज्ज्ञ) ‘मन निरोगी तर तन निरोगी!’ शरीर आणि मनाचे अतूट नाते आज विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. मन आणि शरीर हा संवाद मुख्यतः मेंदूतील न्यूरॉन्स, हार्मोन्स आणि स्नायूसंस्था यांच्या माध्यमातून घडतो. मन शांत, सकारात्मक आणि आनंदी असते, तेव्हा शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते, हार्मोन्सचे संतुलन राखले जाते आणि ऊर्जा पातळी सुधारते. पण जेव्हा मन तणावग्रस्त, अस्वस्थ किंवा नकारात्मक भावनांनी भरलेले असते, तेव्हा शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. त्यानंतर कालांतराने डायबिटीस, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल अशा आजारांचा प्रवास सुरू होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव वाढत चालले आहेत. त्यामुळे मानसिक आजाराचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे. शरीरात एखादी वेदना झाली की, आपण…
रविंद्र परांजपे मागील लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणार्थ आरोग्यदायी संतुलित जीवनशैली अमलात आणणे नितांत आवश्यक आहे, हे वास्तव लक्षात घेतले. या लेखात आपण आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव याबाबत जाणून घेणार आहोत. पूर्वी फक्त वयस्कर लोकांना मनोविकार समस्या असायच्या. आता मात्र किशोरवयीन तसेच तरुण-प्रौढ या सर्वांनादेखील मानसिक ताणतणावांनी ग्रासलेले असल्याचे कटू वास्तव निदर्शनास येते. मानसिक ताणतणाव कोणालाच चुकलेला नाही. प्रत्येकालाच ताणतणावमुक्त जीवन जगावेसे वाटते. वयोमानानुसार वर्गीकरण आयुर्वेदात मनुष्याचे आयुर्मान 100 वर्षे धरून वयाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत. बाल अवस्था : जन्मापासून 16 वर्षांचा कालावधी मध्य अवस्था : 17 ते 70 वर्षांचा कालावधी वृद्ध अवस्था : 70 वर्षांनंतर सुरुवात आपल्या जीवनशैलीत कालानुरूप बदल…
परिणिता रिसबूड आभाळ आभाळ भरून आले बाई आभाळ भरून आले ढगाचे सावळे रूप हळुवार करून गेले आभाळ वयात आले बाई आभाळ वयात आले मन असे कसे नववधु झाले आभाळ अधीर झाले अगदी अधीर झाले गर्भारशीच्या पोटात दुखू दुखू लागले वेलीचे मन कसे पालवू पालवू लागले लव्ह बर्ड आठवतायत का तुला ते दिवस जेव्हा आपण love birds होतो तेव्हापासूनच होती मला आकाशाची ओढ वाटलं असे की तुझ्या पंखाची मिळाली मला जोड म्हणूनच आपण एक घरटे बांधले वाटले असे की आता, मला सगळे साधले पण, तुझ्या पंखांना होती अहंकाराची धार त्यांनी माझ्या पंखांना छेद गेला आरपार आता मन पक्षी, स्वप्नातच भराऱ्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा संजय उवाच : एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः । न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं वभूव ह ॥9॥ ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुलितु । काय बोले ॥81॥ आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजें येथें । भरंवसेनि ॥82॥ ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन करूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥83॥ तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 ऑगस्ट 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 01 भाद्रपद शके 1947; तिथि : अमावास्या 11:35; नक्षत्र : मघा 24:54 योग : परिघ 13:18; करण : किंस्तुघ्न 23:37 सूर्य : सिंह; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:00 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 अश्वथमारुती पूजन अमावस्या (समाप्ती सकाळी 11:35) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – भौतिक सुख आणि संपत्तीत वाढ होईल. घरात उत्सवाचे वातावरण असेल. मात्र तरीही घरगुती कलह होऊ शकतो. आरोग्याच्या…
लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण पारंपरिक घरगुती उपाय पाहिले. आता या लेखात आपण काही trending ingredients आणि trends बद्दल माहिती घेऊ. सध्याच्या उत्पादनांमध्ये एक ingredient जे खूप trending आहे,- ते म्हणजे ‘Hyaluronic Acid’ (हायल्यूरॉनिक ॲसिड) मुळात हे Acid आपल्या शरीरात तयार होते. हे डोळे, joints आणि त्वचेत आढळते. हे Acid शरीरात इतर उपयोगांच्या जोडीला त्वचेला – hydration देण्याचे काम सुद्धा करते. या acid मुळे त्वचेची flexibility आणि elasticity वाढायला मदत होते, ज्यामुळे त्वचा मऊ मुलायम राहून त्यावरील fine lines आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते. हे acid artificially बनवून त्याचा विविध उत्पादनांमध्ये उपयोग केला जातो. Hyaluronic Acid चे वैशिष्ट्य…
प्रणाली वैद्य ‘रॉकेर्स ग्रुप’ चा आज ट्रेकला जाण्याचा दिवस होता..,. वर्षभर आधीच कॅलेंडर पाहून ट्रेकचे दिवस नक्की केले होते. बहुत करून सलग तीन-चार दिवस येणाऱ्या सुट्ट्या पाहून ठिकाण निश्चित केलं जायचं… आजही तसाच योग होता… अगदी चार दिवस लागून सुट्ट्या होत्या… आजवर रॉकेर्स ग्रुपने बरेचसे किल्ले आणि शिखरं पादाक्रांत केली होती, म्हणून यावेळेस जरा वेगळे काही पहावे अस सर्वसंमतीने ठरले होते. शौनक या ग्रुपचा म्होरक्या! सर्वांचा लाडकाच काय, ग्रुपच्या गळ्यातला ताईतच. पण ग्रुप वगळताही त्याच वागणं-बोलणं, त्याचं व्यक्तिमत्त्व सगळ्यांना भुरळ घालायचं… सावळा वर्ण 5’11 उंची, व्यायामाने कमावलेलं शरीर, हास्य इतकं मोकळं की, पाहणाऱ्याच्याही चेहऱ्यावर एक हास्य झळके. श्रीमंत घरातून असला…
हर्षा गुप्ते शेंगा डाळ साहित्य भिजवलेली तूरडाळ – अर्धी वाटी शेंगदाणे – 3 टी-स्पून जीरं – अर्धा चमचा लसूण – 7-8 पाकळ्या कोथिंबिर – पाव वाटी मीठ, लाल तिखट, लिंबू, साजूक तूप – चवीनुसार फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, कढिपत्ता पुरवठा संख्या – दोघांसाठी कालावधी : साधारणपणे अर्धा तास (डाळ भिजायला वेळ लागतो.) कृती तूरडाळ उकडून नीट घोटून घ्यावी. शेंगदाणे, लसूण, जिरं खमंग भाजून घ्यावेत. थोड्यावेळाने वरून कोथिंबिर घालून पुन्हा परतून घ्यावे. शेवटी लाल तिखट घालून गॅस बंद करा आणि ते मिश्रण परतवा. कढई गरम असतेच आणि लाल तिखट जळत नाही. शेंगदाण्याचे मिश्रण पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. आता कढईमध्ये…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥69॥ कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥70॥ सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥71॥ हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवें विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥72॥ तैसिया पंडुकुमरा व्याकुळा ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 31 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्दशी 11:55; नक्षत्र : आश्लेषा 24:16 योग : वरियान 14:34; करण : चतुष्पाद 23:41 सूर्य : सिंह; चंद्र : कर्क 24:16; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:01 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 पोळा दर्श अमावास्या (प्रारंभ सकाळी 11:55) / पिठोरी अमावास्या मातृदिन जिवंतिका पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी काम सामान्य गतीने पूर्ण होईल.…

