Author: Team Avaantar

सतीश बर्वे गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी कृत्रिम विसर्जन तलावावर रिमझिम पावसात एक आजी-आजोबा दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्या सोबत आणखी कोणी नव्हते! तिथला एक कार्यकर्ता ते बघून चटकन पुढे झाला, आजोबांच्या हातात असलेल्या पाटावरच्या गणपतीला बाजूलाच असलेल्या टेबलावर ठेवण्यासाठी. आजींनी त्या मुलाला थांबवले आणि त्या म्हणाल्या, “अरे, त्यांना एकट्याला करून दे… सगळं हौसेने करायला आवडत त्यांना.” आजोबांनी हातातल्या बाप्पाला अलगदपणे टेबलावर ठेवले आणि ते आजींना म्हणाले, “आरतीचे ताम्हण तयार कर आणि झांजा काढ.” आजींनी पिशवीतून ताम्हण आणि थोडंसं तूप घालून आणलेलं निरांजन, उदबत्ती असं सगळं बाहेर काढलं. निरांजन लावून ताम्हण आजोबांच्या हातात दिलं. आजोबांनी आरती म्हणायला सुरुवात केली आणि आजींनी झांज वाजवायला.…

Read More

सायली कान्हेरे बाहेर पाऊस कोसळत असताना, काहीतरी चमचमीत खावेसे वाटते. अशावेळी कॉर्न पॅटीस आणि सोबत पुदिन्याची चटणी याचा आनंद वेगळाच असतो. एकदा करून पाहा, सगळ्यांना आवडेलही! कॉर्न पॅटीस साहित्य कॉर्न – 2 वाट्या सिमला मिरची – 1  (लहान) कांदा – 1  (लहान) उकडलेले बटाटे – 2 लसूण – 4-5 पाकळ्या आले – 2 इंच लवंगी मिरच्या – 3 चीझ क्यूब – 4 (किसलेले) बेसन – अर्धी वाटी तांदळाचे पीठ – अर्धी वाटी तेल – तळण्यासाठी पुरवठा संख्या – साधारण 15 पॅटिस होतात तयारीला लागणारा वेळ – कॉर्न उकडून घेण्यासाठी 10 मिनिटे भाज्या चिरायला 10 मिनिटे आलं, लसूण, मिरच्या यांची भरड…

Read More

​चंद्रकांत पाटील रोजच्याप्रमाणे सिंधू मॅडम महादेवाच्या मंदिरात पूजेला गेल्या होत्या. परत येताना पलीकडच्या वहिनी भेटल्यामुळे रस्त्यात गप्पा मारत थांबल्या, म्हणून त्यांना घरी यायला थोडा उशीर झाला. ​घरी आल्या तर सगळे जेवण करून क्रिकेट मॅच बघण्यात गुंग होते. मॅडम बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाल्या आणि डायनिंग टेबलवर आल्या. त्यांनी ताट घेऊन वाढून घेतले. पातेल्यात गार झालेली वाटीभर डाळीची आमटी, कढईत काळीमिट्ट भेंडीची भाजी, एक पातळ पोळी आणि चमचाभर भात होता. त्यांनी सगळं वाढून घेतलं आणि देवाचे स्मरण करून तोंडात घास घातला. ​तेवढ्यात सूनबाई कडाडल्या, “जेवण झाल्यावर सगळी भांडी घासून घ्या आणि टेबल आवरा!” ​मॅडमला याची सवय झाली होती. भांडी घासत असताना त्यांना…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा आतां अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक । या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥303॥ श्रोत्रादि इंद्रिये आवरिती । परि रसने नियमु न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥304॥ जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥305॥ तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवोनि आंगे फांके । तैसा मानसी विषो पोखे । रसनाद्वारें ॥306॥ येरां इंद्रिया विषय…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 18 भाद्रपद शके 1947; तिथि : द्वितीया 18:29; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 18:07 योग : गंड 23:58; करण : तैतिल 07:52, वणिज 29:04 सूर्य : सिंह; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:46 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 द्वितीया श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात नफा मिळवण्यासाठी जुना मित्र सल्ला देऊ शकतो, तुम्ही तो अमलात आणला तर, धन लाभ होऊ शकतो. स्वत:ची…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 1 केशव काकांच्या तेराव्याचे जेवण जेवून शेजारी, नातेवाईक पांगले आणि घरात राहिले मोहन, वसंता… हे केशवरावांचे दोन मुलगे, यशोदा ही लग्न झालेली मुलगी, मोहनची बायको आशा, वसंताची बायको नलिनी आणि केशवरावांची पत्नी सुमतीबाई… मोहन आणि आशा उद्याच मुंबईला जाणार आणि बहीण यशोदाही उद्याच आपल्या घरी जायची. सकाळपासनू भटजी येणारे नातेवाईक, जेवण… गडबड नुसती! वसंताची बायको नलिनी सोडली तर बाकीचे जरा पडले होते. मोहन, वसंता ओट्यावर आणि आशा, यशोदा आत खोलीमध्ये. त्यांची आई आत काळोखाच्या खोलीत. नलिनी येथेच राहणारी. त्यामुळे तिला घरची भांडीकुंडी, धुणी याची काळजी. त्यामुळे ती बिचारी भांडी धुत होती. ती मनात म्हणत होती. उद्या…

Read More

रश्मी परांजपे मागील चार लेखांच्या माध्यमातून आपण शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी या व्यापक विषयासंबंधीत काही निवडक मुद्द्यांवर सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी या महत्त्वाच्या विषयाची प्रथम थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. पालकांप्रमाणे शाळेने देखील मुलांच्या प्रती असलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास मुलांची शैक्षणिक प्रगती तसेच सर्वांगीण विकास निश्चितच सुकर होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात बहुतांश संस्था पूर्व-प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा असे शैक्षणिक उपक्रम राबवित असतात. (केवळ पूर्व-प्राथमिक शालेय उपक्रम राबविणाऱ्या संस्था असतात, पण त्यांचे प्रमाण तुलनेने कमीच आहे.) शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ, संस्थेशी निगडीत शाळेच्या विविध समितींच्या सहाय्याने संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत असते. पूर्व-प्राथमिक…

Read More

हर्षा गुप्ते कोथिंबीर वडी – प्रकार 1 साहित्य किसलेला कच्चा बटाटा – 1 वाटी चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी तांदळाचे पीठ – 2 मोठे चमचे बेसन – आवश्यकतेनुसार लसूण – 7-8 पाकळ्या आले – 1 इंच हिरव्या मिरच्या – आवश्यकतेनुसार धणे – 1 चमचा जिरे  – 1 चमचा बडीशेप – 1 चमचा ओवा – अर्धा चमचा तिळ – 1 चमचा तेल – तळणासाठी हिंग – स्वादानुसार पुरवठा संख्या – चार जणांसाठी एकूण कालावधी – अर्धा तास कृती एका मोठ्या वाडग्यात चिरलेली कोथिंबीर, किसलेला कच्चा बटाटा घ्यावा. आले, लसूण, मिरच्या, धणे, जिरे, बडीशेप, ओवा हे सगळं जाडसर खलबत्त्यात कुटून घ्यावे. कुटलेले…

Read More

पराग गोडबोले साठे बाई अगदी खुशीत होत्या. एकट्याच निघाल्या होत्या चारधाम यात्रेला, एका प्रसिद्ध प्रवास कंपनीसोबत… तब्बल दहा दिवसांचा प्रवास, तो ही ‘एकटा जीव सदाशिव’ प्रकारचा! नवरा आणि लेक यांच्याशिवाय, ‘एकला चालो रे’ असा मुक्त संचार, देवभूमीचा!! त्या दोघांनाही विनवण्या करकरून थकल्यावर,  छानशी सरकारी नोकरी करणाऱ्या बाईंनी ठरवलं, आता पुरे झालं, आपला मार्ग आपणच चोखाळायचा. लगोलग,  चौकशी करायला एका प्रसिद्ध यात्रा कंपनीत गेल्या आणि एकाच बैठकीत प्रवासाच्या तारखा ठरवून, अर्धे पैसे भरूनही आल्या! स्वतंत्र खोलीचे जास्त पैसे होते, पण कुठे अनोळखी बाईसोबत तिची तंत्र सांभाळत एकत्र राहाणार? असा विचार करून स्वतंत्र खोलीच घेतली त्यांनी, ‘होऊ दे’ खर्च म्हणत… दुसऱ्याच दिवशी…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा श्रीभगवान उवाच : प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥55॥ म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेसी । करीत असे ॥291॥ जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु । परि विषयामाजि पतितु । जेणें संगे कीजे ॥292॥ तो कामु सर्वथा जाये । जयाचे आत्मतोषीं मन राहें । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणे ॥293॥ दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥56॥ नाना दुःखी प्राप्तीं ।…

Read More