Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सतीश बर्वे नीळकंठ टॉवरच्या क्लब हाऊसमधला योगासनाच्या क्लासेसचा वर्षपूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मोठमोठे उद्योजक आणि खासगी तसेच सरकारी आस्थापनातील उच्चपदस्थांनी भरलेल्या या टॉवरमध्ये योगासने शिकायला कोणी येईल, यावर कौस्तुभचा विश्वास नव्हता. पण मी त्याच्या वडिलांना म्हणजे अण्णांना यासाठी तयार केले आणि वर्षभरातच इतिहास घडला. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारिरीक तंदुरुस्तीसाठी योगासनांचे महत्त्व पटवून देण्यात अण्णा यशस्वी झाले आणि बघता बघता कोकणातून आलेल्या अण्णांचं नाव आमच्या टॉवरमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. एकही पैसा खर्च न करता आणि कुठेही लांब न जाता मिळणारं योगासनांचे शास्त्रशुद्ध शिक्षण इथल्या लोकांना पसंत पडलं. कार्यक्रम संपल्यावर मी घरी जायला निघालो होतो, इतक्यात कौस्तुभची हाक कानावर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा तूं योगयुक्त होउनी । फळाचा संग सांडुनी । मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥267॥ परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे । तरी विशेषें तेथ तोषावें । हेही नको ॥268॥ कां निमित्तें कोणें ऐकें । तें सिद्धी न वचतां ठाके । तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥269॥ आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥270॥ देखें जेतुलालें कर्म…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 सप्टेंबर 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 15 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्दशी 25:41; नक्षत्र : धनिष्ठा 22:55 योग : अतिगंड 11:51; करण : गरज 14:31 सूर्य : सिंह; चंद्र : मकर 11:20; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:49 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 अनंत चतुर्दशी पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री 01:41 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – समाजात प्रभाव आणि आदर वाढेल. त्यादृष्टीने दिवस फायदेशीर आणि शुभ असेल. काहीतरी नवीन करू इच्छिणाऱ्यांसाठी…
प्रणाली वैद्य सर्व थोरा-मोठ्यांचं बोलणं मुलांनी नीट ऐकून घेतलं. रात्रीचं जेवण झाल्यावर उद्याची भटकंती कशी असेल, यावर चर्चा करण्यासाठी सर्वजण एकत्र आले… बाहेर बोचरा गारवा होता, त्यामुळे सगळे जवळजवळ रिंगण करून बसले… शौनकने पुढे होऊन उद्याचं आपलं वेळापत्रक कसं राहील, याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली… “आपण गावाकडे आहोत… निसर्गाच्या कुशीत… त्यामुळे प्रत्येकाने आपला आळस बाजूला सारत उद्या पहाटे 5 वाजता उठून जितकं लवकरात लवकर आवरून ट्रेककरिता सज्ज व्हावं… माझ्या मते 6.30 वाजता आपण इथून निघायला काहीच हरकत नाही… प्रत्येकाने आपलं इतर सामान इथंच ठेऊन फक्त खाण्याचे जिन्नस, पाणी आणि अगदी आवश्यक अशाच वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. जितकं लवकर निघू तितक्या…
माधवी जोशी माहुलकर नागपूर हे रघुजी भोसले यांच्या इतिहासाचा वारसा लाभलेले शहर आहे. या शहराच्या आपल्या काही परंपरा आणि सण-उत्सव, समारंभ आहेत आणि ते उत्साहात साजरे केले जातात. यातीलच एक परंपरागत उत्सव म्हणजे काळी पिवळी मारबत! हा उत्सव समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती, समाजविघातक गोष्टी तसेच रोगराई, इडा-पिडा, संकट टाळण्यासाठी साजरा केला जातो. समाजामध्ये सुखशांती नांदून समाज बांधवांत सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत, याकरिता या मारबतला सुरुवात झाली. जगभरात प्रसिद्ध झालेला बडग्या-मारबत उत्सव आणि मिरवणूक हा प्रकार नागपुराची एक विशेष ओळख बनला आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं…
आराधना जोशी साहित्य हरभरा डाळ – दीड वाटी तेल – 3 टेबलस्पून हिरव्या मिरच्या – 2 ते 3 आलं – 1 इंच कढीलिंब पाने – सात ते आठ साखर – 1 टेबलस्पून मीठ – चवीनुसार मोहरी – 1 लहान चमचा हिंग – पाव लहान चमचा हळद – अर्धा लहान चमचा लिंबू – अर्धे कोथिंबीर – आवडीनुसार (वरून सजावटीसाठी) ओलं खवलेलं खोबरं – आवडीनुसार (वरून सजावटीसाठी) पुरवठा संख्या : 7 ते 8 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : हरभरा डाळ भिजण्यासाठी 5 तास भिजवलेली डाळ वाटून घ्यायला 7 मिनिटे शिजवण्याचा वेळ : साधारणपणे 20 मिनिटे एकूण वेळ : 5 तास 27 मिनिटे…
अर्चना कुलकर्णी (शिक्षक दिन विशेष) टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाकडे पहात मी विचार करीत होते, “या पुस्तकाच्या देवाण-घेवाणीच्या मागे काय रहस्य असेल?” नववी ‘ब’मधील सचिन सारंगच्या आईचे मला फार कौतुक वाटत होतं. त्याचं असं झालं, सचिनची आई रोज दुपारी घरी त्याचे दप्तर नेहमी पाहात असत. त्यामुळे त्यांना त्या दिवशी वर्गात काय शिकवलं, काय गृहपाठ दिला आहे,, याची माहिती मिळत असे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे दुपारी त्याचे दप्तर पाहिले त्यावेळी त्यांना ‘एक होता कार्व्हर’ हे कोरे करकरीत पुस्तक त्यात दिसलं. त्यांनी ते पुस्तक पुन्हा दप्तरात ठेवलं. ते पुस्तक सचिन स्वतः दाखवतो का, हे त्यांना पाहायचं होतं. विशेष म्हणजे, त्या दिवशी रात्रीच सचिनने त्यांना ते…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥45॥ तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणें निभ्रांत । म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ॥256॥ येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥257॥ म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण । एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥258॥ तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं । एक आत्मसुख अंतरी । विसंब झणीं ॥259॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 सप्टेंबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 14 भाद्रपद शके 1947; तिथि : त्रयोदशी 27:12; नक्षत्र : श्रवण 23:37 योग : शोभन 13:51; करण : कौलव 15:45 सूर्य : सिंह; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:50 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 शिक्षक दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस चांगला जाईल. मित्रपरिवाराकडून मोठे सहकार्य मिळेल. दिनचर्या सुधारण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण आनंददायी असेल. आजूबाजूला असणाऱ्या…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांच्याच आग्रहामुळे मी पुन्हा कामाची सुरुवात केली. दुसऱ्या इनिंगची सुरुवात ‘स्टार प्रवाह’च्या नवीन सीरियलने झाली. सीरियलचे नाव ‘वचन दिले तू मला’… सुलभा देशपांडे, ज्योत्स्ना कार्येकर, आसावरी जोशी, राजेंद्र चावला, पुष्कर जोग, मयुरी वाघ, भारती पाटील, सुश्रुत मंकणी आणि अन्य बरेच कलाकार होते. माझं कॅरेक्टर म्हणजे एकदम ठसका! खूप श्रीमंत, पैशाचा माज असलेली अशिक्षित बिनडोक पण प्रेमळ आई… कथानक पण छान होतं… मला फुटेज पण चांगलं होत… म्हणजे, लोक रस्त्यात ओळखायला लागली होती. हे पाहून छान वाटायचं. तशात मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आला. मी बाजारात जाऊन पूजा तसेच हळदी…

