Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 सप्टेंबर 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 17 भाद्रपद शके 1947; तिथि : प्रतिपदा 21:12; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 20:02 योग : धृती 06:29, शूल 27:19; करण : बालव 10:27 सूर्य : सिंह; चंद्र : कुंभ 14:29; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:47 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रतिपदा श्राद्ध ग्रहण करी दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आर्थिक व्यवस्थेचे अधिक काटेकोरपणे नियमन करा. फायदेशीर संधी वाढतील. विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय व्हाल आणि…
डॉ. अस्मिता हवालदार जसं व्यक्तीचं भाग्य असतं तसच देशाचं सुद्धा भाग्य असतं. आपल्या देशाचं थोर भाग्य काही व्यक्तींनी, काही राजांनी घडवलं आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा राजा कृष्णदेवराय! दक्षिणेत अडीचशे वर्षांहून अधिक काळ भक्कम पाय रोवून उभे असलेल्या विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय. त्याच्या आणि तेनाली रामनच्या कथा प्रसिद्ध आहेत. विजयनगर साम्राज्याबद्दल जी अगदीच जराशी माहिती सांगितली गेली, त्यात या राजाच्या कथा सांगितल्या गेल्या; परंतु याचे व्यक्तिमत्व याहून बरेच उत्तुंग होते. विजयनगराबद्दल अब्दुल रझाक या परदेशी प्रवाशाने लिहून ठेवले आहे, ‘ज्ञानाच्या कानाने ऐकले नाही आणि डोळ्यांच्या बाहुलीने पहिले नाही, असे हे जगातले एकमेव शहर आहे.’ तो पुढे म्हणतो, ‘इथल्या संपत्तीचे खरेखुरे वर्णन…
दतात्रय पांडुरंग मानुगडे भाग – 4 दिवस पुढे पळत होते. शनिवार, रविवार सुट्टी मिळाली की, मी मिरजेला जात असे आणि बाबांना भेटत असे… मी त्यांच्यापुढे उभे राहिलो की, लगेच म्हणायचे, “आओ बेटा…” मी आल्याची चाहूल त्यांना कशी समजत होती, हे मला माहीत नाही! एक आठवड्यानंतर बाबा मला एकदम नवीन कपड्यांमध्ये दिसले… डोळ्यांचे पारणे फिटले. मी त्यांच्याबद्दल घालून दिलेले नियोजन परफेक्ट चालले होते, त्यांना सकाळी नाश्ता, संध्याकाळी जेवण, रोज आंघोळ मिळत होती… मी तसे दुकानदारांना सांगून ठेवले होते, “तुम्ही पैशांची काही काळजी करू नका.” त्यांच्याजवळ बसणाऱ्या माणसांना मी विचारलं, “ आता बाबा बोलतात का तुमच्याबरोबर…?” “एवढं आमचं नशीब नको का? पण…
यश:श्री जोशी साहित्य भातासाठी तांदूळ – 2 वाट्या (बासमती तांदूळ ऐच्छिक) तेल – 1 टेबलस्पून बटर – 1 टेबलस्पून लसूण – 7 ते 8 पाकळ्या हिरवी मिरची – तिखट असल्यास 1, कमी तिखट असल्यास 2 कांदे – 2 मध्यम आकाराचे सिमला मिरची – 1 लहान स्वीट कॉर्न – 1 कणसाचे दाणे टोमॅटो – 2 मध्यम आकाराचे मिरपूड – 1 टीस्पून ओरिगॅनो – 1 टीस्पून चिली फ्लेक्स – 1 टीस्पून मीठ – चवीनुसार पुरवठा संख्या : 3 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : तांदूळ धुवून भिजवून ठेवायला – अर्धा तास कणीस सोलून दाणे उकडून घ्यायला – 15 मिनिटे भाज्या चिरायला – 15…
प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष हा आठवडा खूप शांत आणि आरामदायी असेल. जुने मित्रमैत्रिणी भेटतील किंवा फोनवर बोलणे होऊ शकते. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नोकरदारांची कामे सहज होतील. आर्थिक प्रश्न सुटतील. महिलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील. विद्यार्थ्यांनी रविवारी (7 सप्टेंबर) चंद्रग्रहण आहे, तेव्हा सांभाळून राहावे. वाहन जपून चालवावे. वृषभ या आठवड्यात घरात छान वातावरण राहील. नवीन खरेदी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता आहे (13 तारखेला मंगळ तुळ राशीत येत आहे). त्यामुळे गरज असेल तरच आपले मत मांडावे. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. महिलांना दगदग होईल. प्रवास करू नका; काळजी घ्या. विद्यार्थ्यांना छोटी नोकरी…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥280॥ मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥281॥ तेथ आणिक कांही जाणावें । कां मागिलातें स्मरावें । हें अर्जुना आघवें । पारुषेल ॥282॥ श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥53॥ इंद्रियांचिया संगती । जिये पसरु होतसे मती । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥283॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 सप्टेंबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 16 भाद्रपद शके 1947; तिथि : पौर्णिमा 23:38; नक्षत्र : शततारका 21:41 योग : सुकर्मा 09:22; करण : विष्टी 12:43 सूर्य : सिंह; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:48 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रौष्ठपदी पौर्णिमा पौर्णिमा समाप्ती रात्री 11:38 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची… दिनविशेष प्राच्यविद्या पंडित भाऊ दाजी लाड टीम अवांतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक…
डॉ. सारिका जोगळेकर (होमिओपॅथिक तज्ज्ञ) गर्भधारणा झाल्यापासून मुलांची वाढ सुरू होते. गर्भामध्ये बाळाचा शारीरिक आणि मानसिक पाया तयार होतो. जन्मानंतर मुलांच्या आयुष्यातील पहिली तीन वर्षे ही सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाची असतात. या काळात त्यांचे शरीर पूर्णपणे विकसित होत असते. प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) निर्माण होत असल्यामुळे बदलत्या ऋतुचा त्यांच्यावर पटकन परिणाम होतो. ऋतू किंवा वातावरणातील तापमान बदलले की, वारंवार सर्दी, खोकला, ताप हे मुलांमध्ये दिसून येते. हा पहिला टप्पा पार पडेपर्यंत मुलं शाळेत जाऊ लागतात, तेव्हा ते पहिल्यांदाच घराच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडतात. या वेळी त्यांचा नवीन लोक, मित्रमैत्रिणी, शिक्षक तसेच हवामान आणि बाहेरील परिस्थिती यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क येतो. मग त्यांना संसर्गजन्य…
रविंद्र परांजपे आरोग्य लेखमालेतील पहिल्या लेखात आपण निरामय आरोग्याची गरज समजून घेतली. नंतरच्या पाच लेखांमधून आपण मानसिक आरोग्याचे विविध पैलू विशेषकरून मानसिक ताणतणाव याबाबत सविस्तर माहिती घेतली. मागील लेखात आपण आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे, हे वास्तव जाणून घेतले. `निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा’, हे या लेखाचे शीर्षक वरकरणी जरा विचित्र वाटेल, कारण आपल्यातील प्रत्येकाच्याच मनात असते की, स्वतःचे आरोग्य निरामय असायला हवे. परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसून येते. म्हणूनच या विषयावर सखोल विश्लेषण आवश्यक वाटते. ‘निरामय’ आणि ‘आरोग्य’ या दोनही संज्ञा आपण अगोदरच समजून घेतल्या आहेत. आता ‘इच्छा’ या संज्ञेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. इच्छा म्हणजे आशा, अपेक्षा, आस,…
शैला सहस्रबुद्धे रोज नवनवीन काहीतरी करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यातही गृहिणीच्या बाबतीत तर, ‘आज नवीन पदार्थ काय करायचा?’ हा प्रश्न असतोच. मग आहे त्या सामग्रीतच नवीन प्रयोग केले जातात. पालक बटाटा पराठा हा त्यापैकीच एक. ‘टेस्टी पण हेल्दी’ असा हा पदार्थ आहे. नेहमीच्या पदार्थांमध्ये हटके लूक देऊन केलेला वेगळा पदार्थ एकदा तरी नक्की try करा. साहित्य पालक – 10-12 पाने बटाटे – 6 (उकडलेले) लाल तिखट – चवीनुसार मीठ – चवीनुसार पांढरे तीळ – 1 टेबल स्पून आलं – 2 इंच लसूण – 4 पाकळ्या मिरच्या – 3 कणिक – 2 वाट्या डाळीचे पीठ – अर्धी वाटी हेही वाचा – Recipe…

