Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!

    May 26, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता

    May 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, May 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : मिरच्यांच्या ठेच्याचा हिरवेगारपणा अन् पनीर, साजूक तूप, दही
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : मिरच्यांच्या ठेच्याचा हिरवेगारपणा अन् पनीर, साजूक तूप, दही

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 21, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मिरच्यांचा ठेचा, ठेच्याचा हिरवेपणा अन् पनीर, साजूक तूप, दही,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – मिरच्यांच्या ठेच्याचा हिरवेगारपणा अन् पनीर, साजूक तूप, दही

    • नोकरी करणाऱ्या स्त्रिया सकाळी रात्रीसाठीची किंवा रात्री सकाळसाठीची कणीक भिजवून गोळा फ्रीजमध्ये ठेवतात; परंतु ज्या वेळी पोळ्या करायच्या, त्या वेळी फ्रीजमधील कणीक रूम टेंपरेचरला येण्यास बराच कालावधी लागतो. त्यानंतर पोळ्या केल्या जातात. त्यासाठी कणकेचा उंडा लाटून त्याला तेल लावून चौघडी लाटावी. अशा अवस्थेत चौघड्या स्थितीत, तर वेळ वाचेल.
    • चिंच स्वच्छ करून घ्यावी. थोडेसे पाणी आणि चिंच पातेल्यात घेऊन गॅसवर उकळून घ्यावे. नंतर त्याचा कोळ काढून त्यात गूळ, धणे, जिरे, तिखट, मीठ, खजुराची पेस्ट, व्हिनेगर घालून चांगले हलवून बाटलीत भरून ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्ती दिवस टिकते. पदार्थाबरोबर खाण्यास छान लागते किंवा पदार्थाला आंबटपणा यावा म्हणून पदार्थात घालण्यास पटकन सोयीचे ठरते. ऐन वेळी याचा उपयोग होतो. उपवासालाही चालते, तोंडाला चांगली चव येते.

    हेही वाचा – Kitchen Tips :  कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही

    • बऱ्याच वेळा आपणास हिरव्या मिरच्यांचा ठेचा लागतो. मिरच्यांचा ठेचा हिरवा राहावा म्हणून त्यात सायट्रिक अॅसिड पावडर किंवा लिंबाचा रस घालून मिरच्या वाटून घ्या. अगदी शेवटचा चमचा उरेपर्यंत तो ठेचा हिरवागार राहतो.
    • डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये शिजविण्याआधी अर्धा तास उन्हात भिजवून ठेवावे. म्हणजे इंधनबचत होऊन पदार्थ लवकर शिजतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : कांद्याची पेस्ट, वाटणाच्या वड्या अन् खोबऱ्याचा किस…

    • घरी पनीर बनविताना, दूध उकळत असताना लिंबू न पिळता, आधी लिंबू पिळून मग गॅसवर दूध ठेवावे. चोथा पटकन बनतो. नंतर निघालेल्या चोथ्यात किंचित मैदा मिसळून तो गोळा हवा तो आकार देऊन फ्रीजमध्ये ठेवावा.
    • विरजणाचे दही नसताना साजूक तूप हवे असल्यास साठवलेली साय जाड बुडाच्या पातेल्यामध्ये कढवण्यास ठेवावी. पारदर्शक तूप आणि चॉकलेटी रंगाची बेरी दिसावयास लागली की गाळून घ्यावे. दहीवड्यासाठी पुढील पद्धतीने दही केल्यास उत्तम होते. एक लीटर कच्चे दूध थोडे कोमट करून घ्या. एक वाटी दूध जास्त गरम करा. दोन ते तीन चमचे मिल्क पावडर टाकून पेस्ट करा. हे गरम दूध गाळून एक लीटर कोमट कच्च्या दुधात टाका. ज्या भांड्यात दही लावायचे त्यात चार-पाच टी स्पून दही टाका. नीट ढवळून ते पातेल्याला पूर्ण लावून घ्या. नंतर दूध टाकून खालीवर करा किंवा एकच दिशेने ढवळा. फ्रीजवर भांडे ठेवल्यास चार-पाच तासांत दही तयार होते; अगदी हॉटेलप्रमाणे दही लागते.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026 फूड काॅर्नर

    साजूक तुपाची धार आणि इतिहासाची फोडणी… आजचा बेत दाल-बाटीचा!

    May 22, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : मसालेभात, मुगाची उसळ, सांबार, भिशीभेळ बनविताना…

    May 21, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    By Team AvaantarMay 26, 2026

    रावण भातासाठी साहित्य तांदूळ – दोन वाट्या तीळ – पाऊण वाटी चण्याची डाळ – पाव…

    साजूक तुपाची धार आणि इतिहासाची फोडणी… आजचा बेत दाल-बाटीचा!

    May 22, 2026

    Kitchen Tips : मसालेभात, मुगाची उसळ, सांबार, भिशीभेळ बनविताना…

    May 21, 2026

    Recipe : खमंग सुरळीच्या वड्या अन् गव्हाचे स्वादिष्ट वडे

    May 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!

    May 26, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता

    May 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मे 2026

    May 26, 2026

    स्नेहल रेल्वेपुलावरून गडगडत खाली आली…

    May 26, 2026

    …म्हणून मी मरणार नाही!

    May 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 309
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 432
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 214
    • मैत्रीण 19
    • ललित 653
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!

    May 26, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता

    May 26, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.