Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ब्लँकेट अन् म्हातारा भिकारी!
    ललित

    ब्लँकेट अन् म्हातारा भिकारी!

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 22, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, भिकारी, ब्लँकेट, नवे ब्लँकेट, भिकाऱ्याचे ब्लँकेट, भिकाऱ्याचा मृत्यू,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    विवेक वैद्य

    दवाखान्यात गर्दी नसली की (ती कधी असते म्हणा!) मी जवळच असलेल्या मन्नूभाईच्या किराणा दुकानात गप्पा मारायला जातो. समोरच फ्लायओव्हर आहे. आम्ही पुलाखालचे व्यावसायिक… त्यामुळे लिमिटेड धंदा असणारे! पुढे पूल खाली उतरतो तिथे जागा असते, आडोसा असतो तिथे काही टपऱ्या आहेत… पान, चहा वगैरे. रात्री तिथे 1-2 भिकारी झोपतात. त्यातला एक वयस्कर किंचित स्थूल म्हातारा मन्नूभाईकडे किरकोळ माल घ्यायला येतो म्हणून मी ओळखतो.

    तर त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे गप्पा मारत होतो. थंडीचे दिवस होते. तो म्हातारा दुकानात आला. त्याच्याकडे एक नवेकोरे ब्लँकेट होते.

    “हे विकायचे आहे.”

    मी आणि मन्नूभाईने ब्लँकेट बघितले, खरोखच ते उत्तम होते… ऊबदार. बहुदा कोणीतरी दानशूर माणसाने किंवा एखाद्या स्वयंसेवी संघटनेने ते भिकाऱ्यांना वाटले असावे.

    “केवढ्याला?”

    तिथेच उभ्या असलेल्या एका गिऱ्हाईकाने विचारले.

    “चार-पाचशे रुपयांचे असेल. पण तुम्ही (इथे मन्नू भाईकडे इशारा करत) माझ्या कामाची माणसे आहेत. मला 200 पुरे…”

    “पण बाबा… थंडीचे दिवस आहेत. तुम्ही ब्लँकेट विकलं तर थंडी वाजेल ना!” मी म्हणालो.

    “आहेत माझ्याकडे पांघरायचे आधीचे…”

    हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!

    “…तुम्हाला पैसे कशासाठी पाहिजेत?”

    “साहेब, लोक पैसे देतात… जेवण बी भेटतं… पण तरी बी काहीतरी लागते. सकाळचा चहा टपरीवाला देतो मोफत… पण नंतर पैसे लागतात. विडी आहे, तंबाकू आहे. जास्त नाही पण लोक पैसे देतात ते पुरत नाहीत. वरती बी लागतात!”

    “पण बाबा, हे दोनशे रुपये किती दिवस पुरतील?”

    “महिनाभर पुरतील!”

    बाबाकडे अगोदरचे पांघरूण मी पहिले होते. ते मला इतके जाड आणि ऊबदार वाटले नव्हते. ते जुनेही होते खूप! मन्नूभाई आणि मी एकमेकाकडे पहिले…

    “बाबा, हे ब्लँकेट सध्या विकू नका. आम्ही म्हणजे मी आणि हे डॉक्टरसाहेब मिळून तुम्हाला 200 रुपये देऊ दर महिन्याला… पण आता थंडी आहे तोपर्यंत राहू द्या.”

    म्हाताऱ्याने मला बघून हात जोडले.

    “बाबा अजून काही लागले तर मागा…”

    “नाही लागणार साहेब… पुरतील तेवढे…” म्हाताऱ्याने प्रामाणिकपणे सांगितले.

    मी आणि मन्नूभाईने लगेच 100-100 रुपये काढून दिले. म्हाताऱ्याने पुन्हा हात जोडले आणि निघाला. तेवढ्यात मी पुन्हा म्हणालो,

    “बाबा, मी रोज रात्री बघणार की, तुम्ही हे ब्लॅंकेट घेऊन झोपता की नाही ते?”

    म्हातारा मनमोकळ हसला.

    हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!

    त्यानंतर काही दिवस मी दवाखाना रात्री 10 वाजता बंद करून जायचो, तेव्हा मुद्दाम म्हातारा झोपायचा तिथे नजर टाकायचो. म्हातारा त्या नवीन ब्लँकेट घेऊन झोपलेला दिसायचा.

    4-5 दिवस खात्री झाल्यावर मी नजर टाकायचे विसरलो… म्हातारा बिडी-काडीसाठी मन्नूभाईच्या दुकानात येत असल्याने पैसे संपले तर, मागेल हे माहीत होते. महिना संपल्यावर पैसे द्यायचे हे ठरवलेच होते! पण पुढच्या महिन्यात पैसे द्यायची वेळच आली नाही…

    एकदा सकाळी सकाळी मन्नूभाईचा फोन आला… “डॉक्टर साहेब, तो म्हातारा गेला हो!”

    “गेला..? कसं काय?”

    “माहीत नाही, मलाही आतच समजले.. चला येता का?”

    आम्ही गेलो तेव्हा तिथे काही लोक उभे होते गर्दी करून. त्यांच्याशी बोलल्यानंतर समजले असे की, म्हातारा दोन-तीन दिवसापासून काही खात-पीत नव्हता. गल्लीतल्या पोरांनी, टपरीवाल्यांनी त्याच्यासाठी मग ताजा मऊ भात, सफरचंद वगैरे आणले. पण म्हाताऱ्याने फारसे काही खाल्लेच नाही. दवाखान्यात यायलाही नकार दिला आणि काल रात्री झोपला तर सकाळी उठलाच नाही… मी आणि मन्नूभाई भराभर पुढे गेलो. म्हातारा पडलेला होता शांतपणे आणि त्याने अंगाभोवती गुरफटून घेतलेले ब्लँकेट तेच होते… नवे मिळालेले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026 ललित

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026 ललित

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    By डॉ. अस्मिता हवालदारMay 19, 2026

    लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि…

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    Recipe : खमंग सुरळीच्या वड्या अन् स्वादिष्ट गव्हाचे वडे

    May 19, 2026

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 302
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 425
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 211
    • मैत्रीण 19
    • ललित 637
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.