Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe :  खमंग शेगाव कचोरी
    फूड काॅर्नर

    Recipe :  खमंग शेगाव कचोरी

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 23, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, विदर्भ स्पेशल, शेगाव स्पेशल, कचोरी, शेगाव कचोरी, तीरथराम शर्मा कचोरी, खमंग कचोरी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    खरंतर शेगाव कचोरीचे सारण हे इतर कचोऱ्यापेक्षा (जसे मूगडाळ कचोरी, प्याज कचोरी, मटर कचोरी) वेगळे असते. शेगावच्या तीरथराम शर्मांची जी कचोरी आहे, तिची बातच निराळी! त्यांचे जे वंशज आहेत भूपेश शर्मा त्यांच्याकडे रोजच्या सुमारे अडीच हजार कचोऱ्या तयार होतात… 20 किलो मैदा याकरिता वापरला जातो. काय खप असेल नाही या कचोरीचा!! तीरथराम शर्मांच्या या कचोरीच्या सारणात आणि मसाल्यात ते वारंवार बदल करत असतात; परंतु ते नेमके काय असतात, त्याबाबत शर्मा बंधू किंवा त्यांचे कामगार याबाबतीत ताकास तूर लागू देत नाही. आता मला माहीत असलेल्या शेगाव कचोरीची रेसीपी देते…

    साहित्य

    • मैदा – 4 वाट्या
    • कणीक – 2 वाट्या
    • बेसन – 4 वाट्या
    • हिरव्या मिरच्या – 4 ते 5
    • लसूण – 4-5 पाकळ्या
    • बारीक चिरलेली कोथिंबीर – मूठभर
    • आले – 1 इंच
    • धणे – 1 चमचा
    • जिरे – 1 चमचा
    • बडीशेप – 1 चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • हळद – 1 चमचा
    • तिखट – दोन ते अडीच चमचे
    • गरम मसाला – 1 चमचा
    • हिंग – 1 लहान चमचा
    • आमचूर पावडर – अर्धा चमचा
    • साखर – चिमूटभर
    • तेल – तळणासाठी

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात

    कृती

    1. प्रथम मैदा, कणीक, किंचित मीठ एकत्र करावे आणि त्यामध्ये तेलाचे मोहन घालून लागेल तसे पाणी वापरत घट्टसर मळू घ्यावे. नंतर ते 10-15 मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
    2. हिरव्या मिरच्या, लसूण, आले आणि कोथिंबीर यांचा जाडसर ठेचा करून ठेवावा.
    3. बडीशेप, धणे यांचीही जाडसर पूड करून ठेवावी.
    4. कढईत एक पळीभर तेल टाकून ते तापले की, जिरे टाकून त्यामध्ये एक चमचा हिंग टाकावा.
    5. नंतर त्यात मिरची, लसूण, आले आणि कोथिंबीरीचा ठेचा टाकून तो परतून घ्यावा.
    6. लगेचच धणे, जिरे आणि बडीशेप यांची भरड टाकावी.
    7.  नंतर हळद, तिखट टाकून ते तेलावर परतुन घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ, आमचूर पावडर आणि साखर टाकावी.
    8. लगेच यामध्ये बेसन घालून ते या मसाल्यात छान परतून घ्यावे. थोडे पाणी शिंपडून बेसन एकसारखे करावे.
    9. बेसन छान खमंग भाजून झाले की गॅस बंद करून ते एखाद्या वाटीने मऊ होईपर्यंत रगडावे; जेणेकरून त्यामध्ये गाठी राहणार नाहीत. असे केल्याने बेसनाचा छान गोळा तयार होतो.
    10. हे सारण थंड होईपर्यंत भिजवलेल्या मैद्याला एकदा तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत.
    11. आता या गोळ्यांची थोडी जाडसर पुरी लाटून त्यामधे बेसनाचे सारण भरावे आणि हलक्या हाताने चारही कडा दाबत कचोऱ्या लाटून घ्याव्यात.
    12. कढईत तेल तापल्यावर मंद आचेवर लालसर होईपर्यंत या कचोऱ्या तळून घ्याव्यात.

    हेही वाचा – Recipe : नागपूरची खासियत… तर्री पोहे

    टीप

    • बेसन भाजताना पाण्याचा अगदी किंचित वापर करायचा आहे. पाणी फक्त बेसन मऊ होण्याकरिता वापरायचे आहे.
    • आमचूर पावडर आणि साखर ऐच्छिक आहे.

    एकूण कालावधी – एक तास


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    By Team AvaantarMay 29, 2026

    गोळ्यांचे सांबार साहित्य मसुराची डाळ – दोन वाट्या जिरे – दोन चमचे धणे – तीन…

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 314
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 438
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 665
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026
    Most Popular

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.