Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe :  विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा
    फूड काॅर्नर

    Recipe :  विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 2, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, विदर्भ स्पेशल, दाणेभात ठेचा, तुरीचे दाणे, तुरीच्या दाण्यांचा भात, तुरीच्या दाण्यांचा ठेचा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    हिवाळा सुरू झाला की, विदर्भात बाजारामधे तुरीच्या शेंगा दिसायला लागतात. पावसाळा संपता संपता मुगाच्या शेंगाच्या दाण्यांची आमटी आणि हिवाळा सुरू झाला की, तुरीच्या दाण्यांचा ‘दाणेभात’ हे समीकरण विदर्भातील घराघरात ठरलेल असतं. विदर्भात तुरीच्या दाण्यांना सोले देखील म्हणतात. सीझनल भाज्या आणि कडधान्यांचे विविध पदार्थ करण्यात विदर्भातील गृहीणी नेहमी दक्ष असतात. तुरीचा दाणेभात चवीला भन्नाट आणि करायला अतिशय सोपा आहे!

    साहित्य

    • तांदूळ – दीड वाटी
    • तुरीचे ओले दाणे – 1 वाटी
    • मोहरी – अर्धा चमचा
    • जिरं – 1 चमचा
    • आलं, लसुण पेस्ट – 1 चमचा
    • हिरवी मिरची, कोथींबीरीची पेस्ट
    • धणे पुड – 1 चमचा
    • जिरेपुड – 1 चमचा
    • दालचिनी – एक तुकडा (फ्लेव्हरकरिता)
    • गोडा मसाला – 1 चमचा
    • लाल तिखट – 2 चमचे
    • कढीलिंबाची पाने – 6 ते 7
    • हिंग – 1 लहान चमचा
    • हळद – गरजेनुसार
    • मीठ – चवीनुसार
    • तेल – पळीभर

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले

    कृती

    1. तांदूळ स्वच्छ धुऊन पाणी निथळत ठेवावे.
    2. पातेल्यात पळीभर तेल टाकून तापवावे. तेल तापले की, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचे जिरे टाकावे.
    3. मोहरी, जिरं तडतडलं की, दालचिनीचा एक तुकडा टाकावा. अर्धा चमचा हिंग टाकून लगेच कढीलिंबाची पाने टाकावीत.
    4. त्यानंतर तेलात आले, लसणाची पेस्ट टाकून परतून घ्यावी. नंतर हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकावी आणि तीपण परतून घ्यावी.
    5. या मिश्रणात थोडेसे पाणी टाकावे आणि पाण्याला उकळी आली की, त्यामधे हळद, तिखट, धणे- जिरे पुड, गोडा मसाला टाकून ते छान ढवळून घ्यावे.
    6. लगेच धुतलेले तांदूळ टाकून हे मिश्रण छान परतवून घ्यावेत आणि साधारण तीन ते साडेतीन वाट्या पाणी घालून भात शिजायला ठेवावा.
    7. भात अर्धवट शिजला की, यामध्ये वाटीभर तुरीचे दाणे मिक्स करून तांदूळ परत एकदा छान परतून मंद आचेवर हा भात शिजू द्यावा.
    8. साधारणत: पंधरा मिनिटांत हा तुरीचा दाणेभात तयार होतो.

    टीप

    • गरमागरम वाफाळलेला, दाणा न दाणा मोकळा असलेला हा भात कढी किंवा ताक, मठ्ठा यासोबत सर्व्ह करा.
    • याच्यासोबत तुरीच्या दाण्यांचा ठेचा छान लागतो.

    पुरवठा संख्या – चार ते पाच व्यक्तींसाठी

    तयारीसाठी कालावधी – 15 मिनिटे

    शिजण्यासाठी – 25 मिनिटे

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात


    तुरीच्या दाण्यांचा ठेचा

    साहित्य

    • तुरीचे दाणे – 1 वाटी
    • लसूण पाकळ्या – 10 ते 12
    • हिरव्या मिरच्या – 7 ते 8 (आवडीनुसार घेऊ शकता)
    • बारीक चिरलेली कोथींबीर – मूठभर
    • जिरे – 1 चमचा
    • मीठ – चवीनुसार

    कृती

    1. प्रथम एका कढईत अगदी थोड्या तेलावर तुरीचे दाणे खमंग भाजून घ्यावेत.
    2. त्यानंतर त्याच कढईत तेलावर मिरच्या आणि लसूण देखील भाजून घ्यावा.
    3. मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये भाजलेले तुरीचे दाणे, लसूण, हिरव्या मिर्च्या, कोथिंबीर,  जिरे आणि मीठ घालून या मिश्रणाचा जाडसर ठेचा करावा.

    टीप

    • ठेचा किंवा चटणी जाडसर याकरिता करावा / करावी, जेणेकरून जेवताना अर्घवट क्रश झालेले तुरीचे दाणे जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा या ठेच्याला खरी लज्जत येते.
    • हा सीझनल ठेचा पोळी, पालक- मेथीचे पराठे, धिरडे, बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी यासोबत खा मस्तच लागतो.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn