Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात
    फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 4, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, Recipe, रेसिपी, भरडाभात, विदर्भ स्पेशल, गोळेभात, भरडा गोळे, हरभरा गोळे, हरभरा भात, Bharda Bhat, Vidarbha Special, Gole Bhat, Bharda Gole, Gram Gole, Gram Rice
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    विदर्भातील अनेक नामांकीत खाद्यपदार्थांपैकी एक असलेला गोळाभात किंवा भरडा भात! याला भरडा भात म्हणण्याचे एक कारण असे की, यातील गोळे हे हरभऱ्याच्या डाळीचा भरडा काढून तयार करतात. हा पदार्थ करण्यासाठी खरंच कस लागतो. गोळे जर फुटले तर त्या भाताचा विचका होतो म्हणून अतिशय नजाकतीने आणि लक्षपूर्वक पद्धतीने गोळाभात तयार करावा लागतो.

    साहित्य

    • तांदूळ – 2 वाट्या
    • हरभरा डाळ – 2 वाट्या
    • हिरवी मिर्ची – 4 ते 5
    • आलं – एक इंच
    • कोथिंबीरीची पेस्ट – अर्धी वाटी
    • जिरं पावडर – 2 चमचे
    • मोहरी – 2 लहान चमचे
    • गोडा मसाला – 1 चमचा
    • हळद – एक चमचा
    • लाल तिखट – 2 चमचे
    • भरडलेले धणे – 1 चमचा
    • हिंग – 1 लहान चमचा
    • कढीपत्त्याची पाने – 3 ते 4
    • मीठ – चवीनुसार
    • तेल – आवश्यकतेनुसार
    • पाणी – 4 वाट्या (किंवा तांदळाच्या दुप्पट घ्यावे.)

    हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी

    कृती

    1. दोन वाट्या हरभऱ्याची डाळ दोन तास भिजत घालावी.
    2. दोन तासानंतर हरभऱ्याची डाळ पाण्यातून उपसून कोरड्या कपड्यावर थोडी वाळवून घ्यावी आणि नंतर त्याचा मिक्सरवर भरडा तयार करून घ्यावा. या भरड्यामधे पाणी राहता कामा नये.
    3. या भरड्यात लहान चमचा हळद, एक चमचा तिखट, कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीरीची पेस्ट, चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.
    4. नंतर या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यावेत.
    5. दुसरीकडे गॅसवर एक पसरट भांड्यात तेल टाकून ते गरम करावे.
    6. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची पाने टाकून फोडणी करावी.
    7. मग त्यात धण्याची भरड टाकावी. त्यानंतर नंतर लगेच आलं, हिरवी मिरची, कोथींबीरीची पेस्ट टाकून सर्व मिश्रण परतून घ्यावे.
    8. या मिश्रणात हळद, तिखट टाकून धुतलेले तांदूळ टाकावे आणि हलक्या हाताने सर्व परतून घ्यावे.
    9. तांदूळ किंचित भाजल्यावर त्यात तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे.
    10. नंतर त्यात एक लहान चमचा जिरेपूड आणि एक चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ टाकून तांदुळ शिजायला ठेवावा.
    11. तांदूळ अर्धा शिजत आला की, भाताच्या मधे जागा करून हरभऱ्याच्या भरडाचे तयार गोळे सोडावे आणि हा भात मंद आचेवर शिजू द्यावा.
    12. भरड्याचे गोळे हळूवार वाफवले जाऊन हा चवदार गोळाभात तयार होतो.

    हेही वाचा – Recipe : खमंग आणि रुचकर मूंगलेट

    टीप

    • जेवताना या गोळाभातावर चुरचुरीत लसूण आणि लाल मिरच्यांची फोडणी घ्यावी किंवा लाल मिरचीचा तडका द्यावा
    • कढी किंवा फोडणीच्या ताकासोबत याचा आस्वाद घ्यावा.
    • भरड्याचे गोळे तयार करताना भरडा सैलसर वाटला तर, त्याचे गोळे चाळणीवर वाफवून घेऊन मग भात शिजत आला की त्यात टाकावे.
    • मिरच्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावे.
    • यामध्ये अनेकदा लसूण तसेच तळलेला कांदाही वापरला जातो.

    पुरवठा संख्या – चार ते सहा जणांसाठी

    एकूण कालावधी – साधारणपणे अडीच तास (हरभरा डाळ भिजवायला दोन तास)


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सात्विक सुख… वरण भात तूप!

    July 24, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या अन् चटपटीत कॉर्न पॅटिस

    July 20, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    सात्विक सुख… वरण भात तूप!

    By माधवी जोशी माहुलकरJuly 24, 2026

    तुरीचं साधे वरण आणि गरम भाताची वाफाळलेली मूद, त्यावर साजूक तुपाची धार… हे केवळ स्वर्गसुख!…

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026

    Recipe : आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या अन् चटपटीत कॉर्न पॅटिस

    July 20, 2026

    पोई भाजी (मलबार स्पिनॅच, मायाळू) एक पौष्टिक प्रकार!

    July 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    July 25, 2026

     ज्योतिषशास्त्र… शुभ-अशुभ ग्रहांची माहिती

    July 25, 2026

    विठ्ठल विठ्ठल… दोन बहिणींची पंढरीची वारी

    July 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 373
    • अवांतर 199
    • आरोग्य 133
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 505
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 804
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.