Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : एऱ्हवीं विषयीं काइ सुख आहे, हे बोलणेंचि सारिखें नोहे…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एऱ्हवीं विषयीं काइ सुख आहे, हे बोलणेंचि सारिखें नोहे…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 1, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय पाचवा

    न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम् । स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥20॥

    तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलां जो ॥103॥ तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वता । हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥104॥

    ब्राह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् । स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय्यमश्नुते ॥21॥

    जया आपणपे सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणें नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥105॥ सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडें अंतरें । रचिला म्हणऊनि बाहिरें । पाऊल न घली ॥106॥ सांगे कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें । तो चकोरु काई वाळुवंटे । चुंबितु आहे ॥107॥ तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपांचिं फावलें । तया विषयो सहजे सांडवले । म्हणो काई ॥108॥ एऱ्हवीं तरी कौतुकें । विचारूनि पाहें पां निकें । या विषयांचेनि सुखें । झकविती कवण ॥109॥

    ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥22॥

    जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले । जैसें रंक कां आळुकैलें । तुषातें सेवी ॥110॥ नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें । मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥111॥ तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥112॥ एऱ्हवीं विषयीं काइ सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥113॥ सांगें वातवर्षआतपु धरे । ऐसें अभ्रछायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥114॥ म्हणोनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे । जैसें महुर कां म्हणिजे । विषकंदातें ॥115॥ नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥116॥ हे असो आघवी बोली । सांग पा सर्पफणीची साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ॥117॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरीं…

    अर्थ

    प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग पावू नय, (अशी समदृष्टी ज्यांची आहे) तोच स्थिरबुद्धी, मोहरहित, ब्रह्म आणि ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर आहेत. ॥20॥

    मृगजळाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत (किंचितही) ढकलला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता, ज्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत; ॥103॥ तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना, तोच ते ब्रह्म. ॥104॥

    बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्यांचे अंत:करण आसक्त झालेले नाही, त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे काय सुख आहे, ते मिळते. तो ब्रह्माशी समरस होऊन युक्त झालेला पुरुष अक्षय्य सुखाचा अनुभव घेतो. ॥21॥

    जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही, (म्हणजे इंद्रियांशी तादात्म्य करीत नाही), तो विषय सेवन करीत नाही, यात आश्चर्य ते काय आहे? ॥105॥ अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंत:करणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही. (विषयांकडे प्रवृत्त होत नाही.) ॥106॥ सांग, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो वाळूचे कण चाटत बसेल काय? ॥107॥ त्याप्रमाणे ज्याला स्वत:च आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले, त्याला सहजच विषय सुटले, हे काय सांगावयास पाहिजे? ॥108॥ एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात? ॥109॥

    विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे भोग, ते दु:खालाच कारण होतात. कारण, त्यांना आदि आहे आणि अंत आहे. हे कौंतेया, ज्ञानी पुरुष त्यांच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. ॥22॥

    ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात. ॥110॥ अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणे भ्रमाने खर्‍या पाण्याला विसरून (मृगजळाला) पाणी आहे, असे समजून माळरानावरच येऊन पोहोचतात. ॥111॥ तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, ज्याच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहेमी पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. ॥112॥ एरवी विषयांमधे काही सुख आहे, हे म्हणणे बोलण्याच्या देखील योग्यतेचे नाही. नाहीतर, विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही? ॥113॥ सांग, वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर तीन मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा (खटाटोप) का करावा? ॥114॥ म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला (बचनागाला) मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे, असे जे म्हणतात ती (विषयांचे खरे स्वरूप न जाणताच) व्यर्थ केलेली बडबड आहे (असे समज). ॥115॥ किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, (पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो) किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात, त्याप्रमाणे विषयांपासून येणार्‍या अनुभवाला ‘सुख’ म्हणणे व्यर्थ बडबड आहे. ॥116॥ हे सर्व प्रतिपादन राहू दे, तूच सांग, सर्पाच्या फणाची सावली आहे, ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे? ॥117॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari :  आपणचि अद्वय ब्रह्म, हें संपूर्ण जाणें वर्म…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    March 22, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    By Team AvaantarMarch 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । सोऽविकम्पेन योगेन…

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    March 22, 2026

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn