Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पालकांची जबाबदारी : शालेय सहली अन् स्नेहसंमेलन
    शैक्षणिक

    पालकांची जबाबदारी : शालेय सहली अन् स्नेहसंमेलन

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 1, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, Post admission, Parents Responsibility, पालकांची जबाबदारी, सहल, शाळा सहल, स्नेहसंमलन, गॅदरिंग, पिकनिक, Trip, school trip, social gathering, gathering, picnic,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रश्मी परांजपे

    भाग – 4

    मागील तीन लेखांमध्ये आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, याविषयी बरेच निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण या विषयावरील उर्वरित मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. शालेय वार्षिक सहल आणि स्नेहसंमेलन अशा दोन महत्त्वाच्या मुद्द्यांसंबंधी पालकांच्या जबाबदारीविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेऊया.

    शालेय वार्षिक सहल आणि मुलांचा सहभाग

    शाळा दरवर्षी मुलांसाठी सहल आयोजित करत असते. सहलीचे ठिकाण आपण पाहिलंय, तेव्हा मुलाने तिथं जायची गरज नाही, असा विचार पालकांनी कधीच करू नये. तसेच, मुलं लहान आहेत म्हणून अजिबात काळजी करू नये, कारण सर्वच मुलं समवयस्क असतात,  शिवाय शाळेच्या ताई आणि मावशी सहलीमधे सर्व मुलांची व्यवस्थित काळजी घेत असतात. त्यामुळे पालकांनी भीती न बाळगता मुलाला सहलीला अवश्य पाठवावे. यामुळे मुलांना इतर मुलांबरोबर सहलीचा आनंद लुटता येतो. मुलाला स्वतःची बॅग आणि इतर वस्तू सांभाळायची सवय लागायला सुरुवात होते.

    सहलीबाबत शाळेने दिलेल्या सूचना पालकांनी काटेकोरपणे पाळाव्यात. तसेच मुलाला इतर मुलांबरोबर राहण्यास आणि ताई-मावशींचे ऐकण्यास सांगावे. अशा रितीने सर्वांच्या सहकार्याने सहल व्यवस्थित पार पडते. (एकदा का सहल सुखरूप परतली आणि मुलांना पालकांच्या ताब्यात दिलं की, मुख्याध्यापिका, शिक्षिका तसेच सेविका ताणमुक्त होऊन त्यांना हायसं वाटतं, हे मी अनेक वर्षे अनुभवलं आहे.)

    शालेय वार्षिक स्नेहसंमेलन

    सहलीप्रमाणे शाळा दरवर्षी मुलांसाठी स्नेहसंमेलन आयोजित करत असते. शाळेसाठी स्नेहसंमेलन हा कार्यक्रम एखाद्या दिमाखदार सोहळ्यासारखा असतो. या कार्यक्रमात शाळेच्या शिक्षक-शिक्षिका, सर्व कर्मचारी, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य, मुलांचे पालक आणि आमंत्रित केलेले पाहुणे उपस्थित असतात. या सर्वांसमोर मुले विविध कार्यक्रम शानदारपणे सादर करत असतात.

    या कार्यक्रमाच्या सादरीकरणाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षिकावर्ग आणि सेविकावर्ग मेहनत घेत असतात. प्रत्येक मुलाने रंगमंचावर येऊन काहीतरी सादर करावे, यासाठी शिक्षिका प्रयत्नशील असतात. या उपक्रमात पालकांकडून सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. पालकांनी मुलाला  कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे तसेच आवश्यक सरावादरम्यान सदैव हजर ठेवावे.

    स्नेहसंमेलनात शाळेच्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा समावेश असलेला अहवाल सादर करण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम देखील असतो. अहवाल सादर करण्यासाठी शिक्षिका निरीक्षणातून काही मुलांची निवड करत असते. मुलांकडून अहवालाच्या विविध भागांचे पाठांतर करून घेतले जाते. यासाठी संबंधित पालकांचे सहाय्य घेतले जाते. पालकांनी मुलांकडून पाठांतर व्यवस्थित करून घ्यावे. सर्वांच्या सक्रिय सहभागातून मुलांनी सादर केलेले सर्व कार्यक्रम विशेष करून अहवालवाचन खरोखरच कौतुकास्पद होतात.

    शाळेच्या वार्षिक सहल आणि स्नेहसंमेलन या कार्यक्रमातून मुलांमधे विविध सद्गुण तसेच चांगल्या सवयी जोपासल्या जातात आणि यामुळे मुलाचा सर्वांगीण विकास साधणे सुकर होते.

    वास्तविक, शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी हा विषय व्यापक आहे. आपण एकूण चार लेखांच्या माध्यमातून पालकांच्या जबाबदारीविषयी निवडक मुद्दे जाणून घेतले. पालकांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास मुलाची शैक्षणिक प्रगती तसेच सर्वांगीण विकास निश्चित आहे.

    क्रमश:


    (लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले. तसेच लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)

    मोबाईल – 9881943593

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 23, 2026

    मागील तीन लेखांत आपण बालशाळेतील विज्ञान शिक्षण याविषयी सविस्तर माहिती घेतली. या आणि पुढील दोन…

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn