साहित्य
- हरभरे – एक वाटी
- मोठी चवळी – एक वाटी
- वाटाणे – एक वाटी
- चिरलेली फरसबी – अर्धी वाटी
- टोमॅटो – 2 (चकत्या कराव्यात)
- कांदे – 2 (बारीक चिरलेले)
- शेव – तीन वाट्या
- ओले खोबरे – अर्धी वाटी
- कोथिंबीर – पाव वाटी (बारीक चिरलेली)
- धणे – एक टीस्पून
- जिरे – एक टीस्पून
- धणे पावडर – एक टीस्पून
- जिरे पावडर – एक टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
- हिरवी मिरची – चार – पाच
- चिंच किंवा आंबोशी – अंदाजाने
- खजूर – अंदाजाने
- लाल तिखट – एक चमचा
- डाळे – अर्धी वाटी
- लसूण – सात-आठ पाकळ्या
- सुके खोबरे – अर्धी वाटी किस
आधी तीन प्रकारच्या चटण्या करून घ्याव्यात. त्याची रेसिपी पुढीलप्रमाणे आहे.
चटणी – प्रकार 1
- अर्धी वाटी ओले खोबरे, चार-पाच ओल्या मिरच्या, कोथिंबीर, पाव चमचा धने, पाव चमचा जिरे आणि चवीपुरते मीठ. हे सर्व एकत्र वाटून चटणी करावी.
चटणी – प्रकार 2
- चिंच अगर आंबोशी आणि खजूर हे सर्व अंदाजाने घ्यावे. चिंच आणि खजूर पाण्यात घालून, कोळून, गाळून घ्यावे. त्यात लाल तिखट, मीठ आणि धणे-जिऱ्याची पूड घालावी.
चटणी – प्रकार 3
- डाळे कुटून घेऊन, त्यात चवीप्रमाणे मीठ आणि साखर, लसूण वाटून आणि खोबऱ्याचा कीस भाजून घालून, एकत्र कालवावे.
हेही वाचा – Recipe : अशी वरी तांदळाची खिचडी करून पाहिली आहे का?
कृती
- चणे, चवळी आणि वाटाणे एक संपूर्ण दिवस भिजत घालून मोड आणावेत.
- नंतर त्यात फरसबी चिरून घालावी आणि कुकरमध्ये सर्व शिजवून घ्यावे.
- त्यात थोडे मीठ घालून ढवळावे.
- नंतर डिशमध्ये प्रथम शिजवलेली कडधान्ये आणि फरसबी घ्यावीत, त्यांच्यावर वरील तीनही चटण्या पातळसर करून घालाव्यात.
- नंतर त्यावर टोमॅटोच्या बारीक चकत्या, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि शेव घालून मिसळ सर्व्ह करावी.
- या मिसळीवर गोड दही घालून त्याची लज्जत वाढवू शकता.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
हेही वाचा – Recipe : तंदुरी पनीर कबाब अन् कुरकुरीत भेंडी
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


