Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एवढी काय घाई आहे!

    June 1, 2026

    Dnyaneshwari : तया विश्वरूपायेवढी दशा, करितां प्रीतीचा वाढु कैसा

    June 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, June 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : झटपट स्वादिष्ट कॉर्न पुलाव
    फूड काॅर्नर

    Recipe : झटपट स्वादिष्ट कॉर्न पुलाव

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 15, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, रेसिपी, Recipe, Delicious, CornPulao, स्वादिष्ट, पुलाव, कॉर्नपुलाव,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सायली कान्हेरे

    रात्री जेवायला काय करू? हा प्रश्न जागतिक आहे, असं मला वाटते. पटकन होणारा आणि टेस्टी लागणार पदार्थ पाहिजे असतो, पण गाडी खिचडीवर अडते. म्हणून आज टेस्टी आणि कमीत कमी साहित्यात झटपट होणारा चविष्ट पदार्थ सांगणार आहे… तो आहे कॉर्न पुलाव (Corn Pulao)! हा भाताचाच प्रकार आहे आणि घरच्यांना नक्कीच आवडेल…

    साहित्य

    बासमती तांदूळ – 1 वाटी

    कॉर्न – 1 वाटी

    कांदा – 1 मध्यम आकाराचा

    टोमॅटो – 1 मध्यम आकाराचा

    लसूण – 3 पाकळ्या

    आले – 1 इंच

    हिरव्या मिरच्या – 2

    गरम मसाला – 2 टेबल स्पून

    हळद – 1/4 चमचा

    मीठ – चवीनुसार

    बटर – 2 मोठे चमचे

    हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड

    पुरवठा संख्या – दोघांसाठी

    तयारीसाठी लागणारा वेळ

    • तांदूळ 1 तास आधी भिजवून घ्यावा.
    • कांदा, टोमॅटो उभे चिरावेत आणि आलं, मिरची, लसूण मिक्सरमधून भरड वाटावेत – साधारण 5 मिनिटे.

    शिजायला लागणार वेळ

    • कॉर्न उकडून घ्यावेत (कुकरला 3 शिट्ट्या, मायक्रोव्हेवमध्ये 10 मिनिटांवर शिजवावेत.)
    • तांदूळ शिजायला 15 मिनिटे
    • एकूण वेळ – 30 मिनिटे.

    कृती

    1. कढई तापत ठेवावी; तापली की त्यात 1 चमचा बटर घालावे, मग त्यात आलं, मिरची, लसूण पेस्ट घालावी. ती थोडी ब्राऊन झाली की, गरम मसाला घालावा, हळद घालावी.
    2. मग चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालावा. मऊ होईपर्यंत परतावा.
    3. आता त्यात कॉर्न निथळून घालावेत.
    4. मग त्यात तांदूळ घालून परतून घ्यावेत. 2 वाट्या पाणी घालावे, चवीनुसार मीठ घालावे.
    5. 10 मिनिटे वाफ देऊन शिजवावे.
    6. शिजल्यावर सर्व्ह करताना वरून बटर घालून मिक्स करून वाढावे.

    हेही वाचा – Recipe : श्रावण स्पेशल… फराळी मिसळ

    टिप

    • यात बदल म्हणून मटार, मशरूम, पनीर घालू शकता.
    • याबरोबर तळलेले उडीद पापड आणि काकडी, टोमॅटो, कांदा यांचे दह्यातील रायते छान लागते.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    By Team AvaantarMay 29, 2026

    गोळ्यांचे सांबार साहित्य मसुराची डाळ – दोन वाट्या जिरे – दोन चमचे धणे – तीन…

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एवढी काय घाई आहे!

    June 1, 2026

    Dnyaneshwari : तया विश्वरूपायेवढी दशा, करितां प्रीतीचा वाढु कैसा

    June 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026

    पान खाये सैंया हमारो…

    May 31, 2026

    लीला आजीची रागीट नजर आरूवरच होती…

    May 31, 2026

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 315
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 439
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 668
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एवढी काय घाई आहे!

    June 1, 2026

    Dnyaneshwari : तया विश्वरूपायेवढी दशा, करितां प्रीतीचा वाढु कैसा

    June 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.