Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : तया विश्वरूपायेवढी दशा, करितां प्रीतीचा वाढु कैसा

    June 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026

    पान खाये सैंया हमारो…

    May 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, June 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : श्रावण स्पेशल… फराळी मिसळ
    फूड काॅर्नर

    Recipe : श्रावण स्पेशल… फराळी मिसळ

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 5, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, रेसिपी, फराळ, उपवास, फराळीमिसळ, मिसळ, Farali Misal, Upavas Misal
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सायली कान्हेरे

    श्रावण सुरू झाला की, उपासतापासही सुरू होतात. नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, मग सुरुवात होते, उपवासाचे नवनवे पदार्थ शोधायला. फराळी मिसळ हा नेहमीचाच, पण हॉटेलमध्ये मिळणारा उपवासाचा पदार्थ घेऊन आले आहे. हा पदार्थ करायला एकदम सोप्पा आहे आणि खूप स्वादिष्ट आहे.

    साहित्य

    साबुदाणा 1 वाटी, दाण्याचे कूट अडीच वाटी, उकडलेले बटाटे, मिरच्या 2, कोकम 5-6, साखर 4 चमचे, मीठ चवीनुसार, लाल तिखट 1 चमचा, तूप 4 चमचे, जिरं 2 चमचे, कोथिंबीर (चालत असेल तर) बारीक चिरलेली मूठभर, दाणे 1/4 वाटी, बटाट्याचा चिवडा 1 वाटी, ओलं खोबरं 1/2 वाटी.

    पुरवठा संख्या – दोघांसाठी

    तयारी साठी लागणारा वेळ – साबुदाणा 5 तास आधी भिजवून ठेवावा.

    बटाटे, दाणे दोन्ही उकडणे, खोबरं खोवून घेणे यासाठी 15 मिनिटे.

    कोकम पाण्यात 15 मिनिटे भिजवून मग त्याचा कोळ काढून घेणे.

    शिजवण्याचा कालावधी – खिचडीसाठी 10 मिनिटे.

    आमटीसाठी 15 मिनिटे

    एकूण वेळ – 25 मिनिटे.

    हेही वाचा – Recipe : भाजणीचे वडे…. मंगळागौर विशेष

    साबुदाण्याची खिचडी कृती

    • प्रथम कढईत 2 चमचे तूप गरम करायला ठेवा, त्यात 1 चमचा जिरं घाला. जिरं तडतडलं की मिरचीचे तुकडे घाला.
    • आता त्यात भिजलेला साबुदाणा घाला, मग 1/2 वाटी दाण्याचे कूट घाला, चवीप्रमाणे मीठ, साखर घालून नीट ढवळून घ्या.
    • ही खिचडी बाजूला ठेवा.

    आमटीची कृती

    • मिक्सरमध्ये कूट कोकमाचा कोळ, मीठ, साखर, तिखट आणि त्याचबरोबर ओलं खोबरं घाला. नंतर थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये नीट फिरवून घ्या.
    • आता कढईमध्ये राहिलेले तूप घ्या, तूप गरम झालं की, त्यात जिरं घाला, जिरं तडतडलं की, त्यात मिक्सरमधील मिश्रण घाला.
    • मिक्सरमध्ये अजून थोडं पाणी घेऊन ते नीट ढवळून ते पाणी सुद्धा कढईमध्ये घाला.
    • ही आमटी छान उकळून घ्या.

    कसे सर्व्ह कराल?

    1. बाऊलमध्ये थोडी खिचडी घ्या, त्यावर आमटी घाला (आमटी जास्त घालावी).
    2. आता त्यावर शिजवून घेतलेले दाणे आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला.
    3. त्यावर बटाट्याचा चिवडा घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
    4. आणि गरमागाराम सर्व्ह करा.

    टीप

    • आमटीमध्ये कोकम भिजवून घालण्याऐवजी तुम्ही कोकम सरबताचा एक्सट्रॅक्ट घालू शकता. ते घातलंत तर साखर अजिबात घालायची नाही. साधारण 3 चमचे घालावे.
    • आमटीची चव कमी-अधिक गोड हवी. हवे त्या प्रमाणात तिखट घालू शकता
    • बटाट्याऐवजी तुम्ही बारीक चिरलेली काकडी घालू शकता.

    हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    By Team AvaantarMay 29, 2026

    गोळ्यांचे सांबार साहित्य मसुराची डाळ – दोन वाट्या जिरे – दोन चमचे धणे – तीन…

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : तया विश्वरूपायेवढी दशा, करितां प्रीतीचा वाढु कैसा

    June 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026

    पान खाये सैंया हमारो…

    May 31, 2026

    लीला आजीची रागीट नजर आरूवरच होती…

    May 31, 2026

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 315
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 439
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 667
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : तया विश्वरूपायेवढी दशा, करितां प्रीतीचा वाढु कैसा

    June 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026

    पान खाये सैंया हमारो…

    May 31, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.